आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

वनिता फाऊंडेशनचे संस्थापक व गुणवंत कामगार श्री. प्रभाकर कांबळे याना " आंतरराष्ट्रीय ग्लोबल गोल्ड आयकॉन पुरस्कार " जाहीर ; दि. ५ सप्टेंबर रोजी नवी मुंबई येथे होणार गौरव ..

मुंबई ( प्रतिनिधी) - विक्रोळी टागोर नगर येथील ज्येष्ठ समाजसेवक, वनिता फाऊंडेशनचे संस्थापक व गुणवंत कामगार, महाराष्ट्ररत्न श्री. प्रभाकर तुकाराम कांबळे यांच्या  समाजकार्याची दखल " ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड " या संस्थेने घेतली असून त्यांना दिनांक 5 सप्टेंबर 2021  रोजी शिक्षक दिनानिमित्त खारघर नवी मुंबई येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात विधान परिषद सदस्य शिक्षक आमदार मान. बाळाराम पाटील व झी मीडियाच्या सीनियर पत्रकार अनुपमा खानविलकर - शितोळे यांच्या हस्ते सन 2021 चा " आंतरराष्ट्रीय ग्लोबल गोल्ड आयकॉन अवार्ड "  देऊन गौरवण्यात येणार असल्याचे श्रीराम महाजन यांनी  लेखी पत्रकाद्वारे कळविले आहे.

     गुणवंत कामगार व ज्येष्ठ समाजसेवक तसेच वनिता फाऊंडेशनचे संस्थापक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार विजेते श्री. प्रभाकर तुकाराम कांबळे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व सर्वांना बरोबर घेऊन जाणारे सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून कार्य करणारे सामाजिक शैक्षणिक कला साहित्य सहकार कामगार आरोग्य व पत्रकारिता क्षेत्रात अनेक वर्ष झोकून देऊन महाराष्ट्र शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रत्यक्ष कृतीच्या तसेच वृत्तपत्र लेखांच्या माध्यमातून तळागाळातील समाजात सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे महान कार्य करत आहेत. तसेच सामाजिक, शैक्षणिक, कामगार सहकार संबंधी परिवर्तनवादी स्तंभलेखन करून जनतेला जागे करण्याचा प्रयत्न सतत करत आहेत समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन समाज परिवर्तन घडवत आहे. सन 2013 महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार तसेच अनेक संस्था संघटनेकडून दोनशेहून अधिक पुरस्कार मिळालेले आहेत.                       

   सह्याद्रीच्या पायथ्याशी असणाऱ्या कोल्हापूर  जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील छोट्याशा गावात भूमिहीन शेतमजूर यांच्या पोटी जन्माला आल्यानंतर गरिबी आणि भूक याची जाणीव करून देणार्‍या संघर्ष खूप जवळून अनुभवला आहे सामाजिक प्रश्नाची जाण असल्यामुळेच आज पर्यंतचा प्रवास हा संघर्षमय सुरू आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या शिका ' संघटित व्हा व संघर्ष करा याचा अवलंब करून समाजकार्य सुरू आहे.                                     

   प्रभाकर कांबळे अनेक सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता व सहकारी संस्था संघटनेच्या विविध पदावर काम करीत आहेत. त्यांचे सामाजिक, कला, सांस्कृतिक, आरोग्य कामगार, सहकार व पत्रकारिता क्षेत्राशी त्यांचे जवळचे नाते असून मुंबईच्या झोपडपट्टी भागात राहून " वनिता फाउंडेशन"  या सामाजिक संस्थेची स्थापना करून " मानव सेवा हीच ईश्वर सेवा " मानून समाज कार्य सुरू केले आहे . त्यांच्या पुढील कार्याच्या  वाटचालीसाठी " ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड " या संस्थेने दखल घेऊन त्यांना " ग्लोबल गोल्ड आयकॉन अवार्ड " देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...