आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

नाथ वास्तु एंटरप्राईजेस आणि यूथकौन्सिल नेरुळ यांच्या सहयोगाने तुळशी रोपांचे वाटप

आदर्श वार्ताहर वृत्तसेवा,नेरुळ : नाथ वास्तु एंटरप्राईजेस आणि यूथकौन्सिल नेरुळ यांच्या सहयोगाने श्रीनाथ वास्तु ज्योतिष कार्यालय यांच्या बेलापूर येथील व्दितिय शाखेत दिनांक २६.८.२०२१ रोजी आयोजित श्री सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने तुळशी वृंदावन सप्रेम भेट व दाते पंचांगचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय किर्तनकार चारुदत्त आफळे बुवा यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळुन संपन्न झालेल्या या कार्यक्रमास मा. नगरसेवक रविंद्र इथापे, साई मंदिर वहाळचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र पाटील, अभिनेते प्रकाश राणे, अभिनेत्री नयन पवार, यूथकौन्सिल नेरुळचे सुभाष हांडेदेशमुख, भालचंद्र माने, आर. एस. नाईक, जेष्ठ नागरिक संघ नेरुळ चे उपाध्यक्ष प्रभाकर गुमास्ते, पत्रकार प्रियाताई मालवणकर, सामान्य नागरिक वृत्तपत्राचे संपादक साबीर शेख आदि मान्यवर उपस्थित होते.

     आप आपल्या परीने दिवा लावत गेले तर सूर्य उगवायची वाट पहावी लागत नाही. तसेच काहीसे यूथकौन्सिल नेरुळ च्या तुळशी संवर्धन उपक्रमाचे आहे. अशा प्रकारच्या विविध उपक्रमांतून तुळशी रोपे वाटत गेले तर त्याची व्याप्ती अधिक वाढून त्याचा वैज्ञानिक तसेच धार्मिक लाभ  जनसामान्यास होऊ शकतो. असे सांगुन आफळे बुवा पुढे म्हणाले की, उपासना ही प्रत्येक क्षेत्रात आहे. आणि संसार सुखी करण्यासाठी ती आवश्यक आहे. धर्मशास्त्राच महत्व आपल्या जीवनात खूप आहे. आपल्या धर्मशास्त्राने आयुर्वेदालाच धर्मशास्राच रुप दिल आहे. म्हणूनच ज्योतिष शास्त्राबरोबरच धार्मिक साधनेतून सर्वार्थानं समाज उन्नती साधण्याचा पंडीत जितेंद्र कुलकर्णी यांचा प्रयत्न खूप चांगला आहे. यातून ते त्यांच्या ज्ञानाचा उपयोग चांगल्या कामासाठी करत आहेत. सगळ्यांच्या मनामध्ये मांगल्याची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. 

         पंडीत जितेंद्र कुलकर्णी यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुभाष हांडे देशमुख यांनी केले तर ज्योतिष कार्यालयातील कर्मचारीवर्गाने खूप मेहनत घेऊन सत्यनारायण पुजेचे मांगल्य जपत तो यशस्वी केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...