उरण - बामणडोंगरी गावाजवळ सातत्याने रस्त्यावर नागरीक कचरा टाकत होते. कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरून त्याचा उग्र वास सर्वत्र पसरत होता.त्यामुळे तिथे राहत असलेल्या लोकांना त्याचा त्रास होत होता. शिवाय नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले होते.म्हणून मनसेचे पनवेल तालुका उपाध्यक्ष निर्दोष केशव गोंधळी यांनी पाठपुरावा करून तो कचरा पुर्ण साफ करून तिथे सिडको मार्फत बोर्ड लावुन घेतले. यावेळी गव्हाण विभाग अध्यक्ष तुषार सुनिल म्हात्रे,उरण विधानसभा उपाध्यक्ष श्रीमत रविंद्र घरत, उलवे शहर उपाध्यक्ष-आकाश देशमुख, उलवे शहर शाखाध्यक्ष -अशोक वडांगले आदी मान्यवर उपस्थित होते.कचरा साफसफाई केल्याने सदर परिसर स्वच्छ व सुंदर झाला आहे. येणारे जाणारे ग्रामस्थ, नागरिक, प्रवाशी वर्गांनी निर्दोष गोंधळी यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचे आभार मानले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान
मुंबई (गणेश हिरवे) दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई दि. २० (अधिराज्य) प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली पक्षाची जी पुनर्बांधणी झाली तेव्हापासून बाळासाहेबांच्या ...
-
मुंबई(उदय दणदणे) महाराष्ट्रातील लोककला परंपरेतील कोकणातील कलगी तुरा लोककला व लोककलावंतांची मातृसंस्था- "कलगी तुरा समाज उन्न...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा