आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

सर्पमित्र मयुर कदमने पकडला भला मोठा अजगर


चाळीसगाव - घाटारोड वरील पटेल ढाब्यासमोर असलेल्या तालुक्यातील सांगवी फाट्याजवळ विनायक दवे यांच्या शेतात असलेला भला मोठा अजगर सर्पमित्र मयुर कदम याने आज दि 30 ऑगस्ट रोजी दुपारी 2-30 वाजेच्या सुमारास पकडला असून त्यास लागलीच जंगलात सोडून दिला आहे.
         विनायक दवे यांच्या शेतात अजगर दिसल्याने तेथील कामगारांची एकाच धांदल उडाली लागलीच याची माहिती पंचशील नगर चाळीसगाव येथील सर्पमित्र मयुर कदम (9158241685) याला दिल्यावर त्याने क्षणाचाही विलंब न करता त्याठिकाणी जाऊन अथक परिश्रमानंतर भला मोठा वजनदार व लांबलचक अजगर मोठ्या शिताफीने पकडला व लागलीच त्याला जंगलात सोडून दिला व त्याचे प्राण वाचवले त्याच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पं. दीनदयाळ उपाध्याय मार्ग व नाहूर पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य

मुलुंड /शेखर भोसले : दरवर्षी पावसामुळे पडणारे खड्डे गणेशोत्सव काळात बुजविण्यात येतात मात्र यावर्षी पालिकेच्या टी वॉर्डने अद्यापही खड्डे बुजविले नसल्यामुळे मुलुंड टी वॉर्ड हद्दीतील नाहूर ब्रिजवरील रस्ता व पंडित दीनदयाळ उपाध्याय मार्ग येथून प्रवास करणारे वाहनचालक हैराण झाले आहेत. येथील खोल खड्ड्यात धक्के खात व गाडीचे टायर आपटत वाहनचालकांना प्रवास करावा लागत असल्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहेच, त्याशिवाय वाहनचालक व प्रवाशांना देखील शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथून प्रवास करणाऱयांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, रस्ते दुरुस्त न करता संबंधित रस्ते विभाग एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहात आहे का? असा सवाल संतप्त स्वरात प्रवाशांनी विचारला आहे.
       यासंदर्भात अधिक माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते अनिल म्हस्के यांनी सांगितले की, नाहूर पुलावरील रस्ता व पंडित दीनदयाळ उपाध्याय मार्ग या दोन्ही रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. काही खड्डे तर खोल आहेत. कित्येक वेळा संबंधित अधिकाऱयांना सांगूनही येथील खड्डे बुजवले जात नाही आहेत. खड्ड्यात पेव्हर ब्लॉक टाकून तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. दररोज वाहनचालकांना येथून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. तसेच येथील खड्ड्यांमुळे रस्त्यावरील वाहतूक मंद होत असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. नाहूर पूल आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील खड्ड्यांमुळे गंभीर अपघात होऊन जीवितहानी होवू शकते, त्यामुळे टी वॉर्ड पालिका अधिकाऱयांनी तातडीने याप्रश्नी लक्ष घालून रस्ते दुरुस्त करून घ्यावेत, अशी मागणी अनिल म्हस्के यांनी यानिमित्ताने केली आहे. 
      पालिका रस्त्यावरील खड्ड्यात पेव्हर ब्लॉक्स टाकून तात्पुरती मलमपट्टी करत आहे, परंतु हे पेव्हर ब्लॉक्स पुन्हा उखडले जात असल्यामुळे सदर ठिकाणी पुन्हा खड्डे निर्माण होत आहेत. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला असून लवकरच रस्ते शास्त्रोत्त पद्धतीने दुरुस्त नाही झाले तर या असंतोषाचा स्फोट होऊन भडका होवू शकतो, असेही काही वाहनचालकांनी सांगितले.   

लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन च्या मुंबई जिल्हा पदाधिकाऱ्यांचे चर्चासत्र संपन्न..!

मुंबई / महेश्वर तेटांबे -सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षांत घेता सोशल डिस्टन्स हा एक महत्वाचा भाग बनला आहे आणि याच पार्श्वभूमीवर संस्थापक अभिजित खरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या 
लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन , भारत या संस्थेच्या माध्यमातून मुंबई शाखेतील पदाधिकारी यांचे चर्चासत्र शनिवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथील प्रसिद्ध राशी स्टुडिओ, करिरोड येथे संपन्न झाले. या चर्चासत्रात कलाकार , तंत्रज्ञ,  बँकस्टेज कलाकार यांच्यावर होणारा अन्याय, त्यांच्या समस्या, यांचे निवारण कशाप्रकारे करू शकतो या संदर्भात साधकबाधक चर्चा झाली.त्याचप्रमाणे ज्येष्ठ कलावंताना पेन्शन योजना चालू करणे, त्यांच्यासाठी वृद्धाश्रम उभारणीसाठी प्रयत्न करणे, कलावंतांच्या आरोग्यविषयक शिबिराचे आयोजन करणे आणि नवनवीन उपक्रम राबविणे यासंदर्भात महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
        याप्रसंगी लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन,भारत ., गणेश तळेकर - मुंबई जिल्हा अध्यक्ष, डॉ प्रेमसागर बैरागी सर - उपाध्यक्ष, रश्मी शहा - उपाध्यक्ष - (संचालिका रश्मी कला ऍक्टींग अकँडमी), दत्तात्रय (आबा) पेडणेकर - (निर्माता - रसिका कला थिएटर आणि रसिका कला अकँडमी) - सचिव, वीणा शिखरे (अभिनेत्री) - सहसचिव, शितल माने (राशी स्टुडिओ संचालिका आणि नृत्य दिग्दर्शिका) - तक्रार निवारण प्रमुख , राकेश शेळके (वास्तू तज्ज्ञ आणि कला दिग्दर्शक) - तक्रार निवारण उपप्रमुख , सुहास रुके (अभिनेता) - तक्रार निवारण उपप्रमुख , राहुल (साईराज) किशोर मौजे - (दिग्दर्शक) - जनसंपर्क प्रमुख, महेश भिकाजी तेटांबे (दिग्दर्शक-पत्रकार), मिनल घाग (समाजसेविका) - जनसंपर्क उपप्रमुख...आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. तसेच या चर्चासत्रात कलाकारांच्या ज्या काही समस्या किंवा अडचणी असतील तर त्यासाठी त्यांनी मुंबई कार्यालय राशी स्टुडिओ, माने वखार, त्रिवेणी सदन, करिरोड, लालबाग, मुंबई 12 याठिकाणी वेळ 11 ते 5 यावेळेत राहुल किशोर मौजे - संपर्क प्रमुख मुंबई जिल्हा  9137117400 आणि शितल माने - तक्रार निवारण प्रमुख मुंबई जिल्हा 76665 79934 यांच्याशी संपर्क साधणे असेही सर्वानुमते ठरले.त्याचप्रमाणे कलाकारांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या कार्यशील प्रगतीसाठी लोकस्वराज्य संस्था तसेच मुंबई जिल्ह्यातील पदाधिकारी नेहमीच प्रयत्नशील राहील असाही ठराव या सत्रांत संमत झाला आणि याच अनुषंगानं मुंबई जिल्हा पदाधिकारी यांनी आपआपल्या परीने मतविभाजन केले. तसेच कलावंत, तंत्रज्ञ यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना न्याय कसा मिळवून देता येईल या दृष्टीने  संस्था नक्की सक्षम राहील ,अशीही अध्यक्ष गणेश तळेकर यांनी ग्वाही दिली. अशा तऱ्हेने खेळीमेळीच्या वातावरणात हे चर्चासत्र संपन्न झाले..!

अशोक नगर येथे एका युवकावर प्राणघातक हल्ला

मुलुंड : शेखर भोसले 
       मुलुंडमध्ये एका तरुणावर पूर्ववैमनस्यातून जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोघा भावांना मुलुंड पोलिसांनी बेडया ठोकल्या असून हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाला पोलिसांनी रुग्णालयात दाखल करून घेतले आहे. जखमी युवकाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. पोलिसांनी वेळीच दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे या तरुणाचा जीव वाचला असून मुलुंड पोलिस याबाबतीत अधिक तपास करीत आहेत.
      पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २१ ऑगस्ट रोजी रात्री १२ च्या सुमारास मुलुंड पश्चिमेकडील अशोक नगर परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय सुरज कसबे याला लकी दोंदे नामक युवकाने घराबाहेर बोलावून घेतले. तो घराबाहेर येताच त्याला हमिदिया मजिदीजवळ नेण्यात आले. तेथे उभ्या असलेल्या लकीचा भाऊ चिकूने व लकीने सुरज सोबत असलेला जुना वाद उकरून काढून भांडण चालू केले. या भांडणात त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. लकी आणि चिकू या दोघांनी मिळून सुरजच्या डोक्यावर आणि छातीवर जोरदार प्रहार केले. दरम्यान सुरजने त्यांच्या तावडीतून सुटून त्याच्या नातेवाईकांचे घर गाठले व नातेवाईकांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. रक्तबंबाळ झालेल्या सूरजला पाहून नातेवाईक देखील घाबरून गेले. इतक्यात रात्री गस्त घालणारी पोलिसांची वायरलेस वॅन तेथील रस्त्यावरून जात असता एका महिलेने त्यांना हात दाखवून थांबवले व एका तरुणाला मारहाण झाली असल्याचे सांगितले. पोलिसांनी सुरज जवळ पोहचून त्याला वॅनमधून अग्रवाल रुग्णालयात नेवून दाखल करून घेण्यात आले. सुरजने दिलेल्या जबाबावरून लकी दोंदे आणि चिकू दोंदे या दोघा भावांना अटक करण्यात आली. 

दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोरटयांनी एका युवकाला लुटले

मुलुंड /शेखर भोसले - मोटर सायकल वरून आलेल्या दोघा चोरटयांनी मुलुंड मधील जठा शंकर रोडवर एका २४ वर्षीय युवकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला असून मुलुंड पोलिस या चोरटयांचा शोध घेत आहेत.
       पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवार दि २३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता अक्षय रहाटे हा युवक जटा शंकर रोडवरील फिश वर्ल्ड या दुकानाजवळ उभा असता मोटरसायकल वरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी अक्षयच्या गळ्यातील ८०००० रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. ही घटना घडताच अक्षयने आरडाओरडा केला परंतु दरम्यानच्या काळात चोरटे पसार होण्यास यशस्वी झाले.
        अक्षयने ताबडतोब मुलुंड पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली असता, मुलुंड पोलिसांनी भारतीय दंड विधान ३९२ आणि ३४ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे तेथील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम मुलुंड पोलिसांनी चालू केले असून सोनसाखळी चोरटयांना पकडण्यासाठी वेगाने तपासाची चक्रे फिरत आहेत. 
       मुलुंडमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना वाढू लागल्या असल्याने मुलुंड पोलिसांनी नाकाबंदी करून
सोनसाखळी चोरट्यांवर नजर ठेवायला सुरुवात केली आहे. नाकाबंदीच्या ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची अधिक कडक तपासणी करण्यात सुरुवात केली आहे. 

मिठागर कोविड सेंटर मध्ये रुग्णांना मिळते निकृष्ट दर्जाचे जेवण

मुलुंड/ शेखर भोसले -मुलुंड पूर्व, मिठागर रोड येथील महापालिका शाळेत असलेल्या कोविड उपचार केंद्रातील रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याची तक्रार पालिकेत दाखल करण्यात आली आहे. जेवण पुरवणारा ठेकेदार रुग्णांना अर्धवट शिजलेले अन्न देत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर तसेच सोशल मीडियावरून हा प्रकार व्हायरल झाल्याने पालिकेने या ठेकेदाराला नोटीस पाठवून समज दिली आहे. 
    अर्धवट शिजलेले अन्न मिळत असल्याने मिठागर कोविड सेंटरमधील अनेक रुग्णांना उपाशीपोटी राहावे लागत असल्याने रुग्णांनी व रुग्णांच्या नातेवाईकांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार केली असून सोशल मीडियावर याबाबतचे फोटो व्हायरल देखील केल्याने हा प्रकार उघडकीस आला असून त्यामुळे पालिकेविरोधात अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. पालिकेने या प्रकरणी तातडीने लक्ष घालून जेवण पुरविणाऱ्या ठेकेदाराला इशारा देवून यापुढे काळजी घेण्यास सांगितले आहे. 
    याबाबत अधिक माहिती देताना टी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांनी सांगितले की, 'ठेकेदारासोबत बैठक घेवून याबाबत त्याला वॉर्निंग देण्यात आली असून दुसऱयांदा अशी तक्रार आल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा ठेकेदाराला देण्यात आला आहे. यापुढे रुग्णांना चागले जेवण मिळेल याकडे आमचे लक्ष असेल'. 

मुलुंड पोलिसांची कमाल, रिक्षा चोराला एका दिवसात अटक

मुलुंड /शेखर भोसले -मुलुंड कॉलनी येथे राहणाऱ्या मुस्ताक रजाक शेख यांची कॉलनी परिसरातील रस्त्यावर उभी केलेली रिक्षा कोण्या अज्ञात चोरटयांनी चोरी केली असल्याची तक्रार त्यांनी मुलुंड पोलिस ठाण्यात शनिवारी नोंदवली असता तक्रार मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून रिक्षा चोराला अवध्या एका दिवसांत अटक केल्याची कमाल मुलुंड पोलिसांनी केली आहे.
   कोरोना काळात पोलिसांचे संख्याबळ कमी पडत असताना देखील मुलुंड कॉलनी येथील रिपाई कार्यालयासमोर पार्क केलेली रिक्षा चोरीस गेल्याची तक्रार मुस्ताक रजाक शेख यांनी मुलुंड पोलिस ठाण्यात करताना पोलिसांनी ताबडतोब सूत्रे हलवून रिक्षा चोराला अटक केली आहे. दिनकर चिंतामण घोडे (वय ३० वर्षे) असे रिक्षा चोरट्याचे नाव असून हा देखील मुलुंड कॉलनी परिसरात राहणारा आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरी केलेली रिक्षा क्र एम.एच.०३ बी एन २७८४ जप्त केली असून पुढील कारवाईसाठी दिनकर घोडेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.  

रविवार, ३० ऑगस्ट, २०२०

कॅरेबियन प्रीमियर लीग मध्ये खेळणारा मुलुंडचा ४८ वर्षीय प्रवीण तांबे

मुलुंड /शेखर भोसले : मुलुंडमध्ये राहणारा फिरकी गोलंदाज ४८ वर्षीय प्रवीण तांबे कॅरेबियन प्रीमियर लीग मध्ये खेळणारा पहिलावहिला भारतीय खेळाडू ठरला. सुनिल नारायण जखमी झाल्याने प्रवीण तांबेला किएरॉन पोलार्ड नेतृत्व करत असलेल्या त्रिंबागो नाईट रायडर्सच्या अंतिम संघात खेळण्याची संधी मिळाली. 
    तांबेने आपले पदार्पण अविस्मरणीय करताना पहिल्याच षटकात विकेट मिळवली. प्रतिस्पर्धी लुसिया झोक्स संघाचा डाव पावसामुळे १८ व्या षटकात थांबवण्यात आल्याने तांबेला एकच षटक गोलंदाजी करता आली. या अगोदर भारताचा १९ वर्षाखालील खेळाडू सनी सोहल कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळलेला आहे; परंतु त्यावेळी त्याने अमेरिकेतील राष्ट्रीयत्वाचा पुरावा सादर केला होता. प्रवीण तांबे ४१ व्या वर्षी २०१३ मध्ये आयपीएल खेळला होता. २०१६ नंतर त्याला आयपीएलमध्ये स्थान मिळालेले नाही. यंदाच्या स्पर्धेसाठी तांबेला कोलकत्ता संघाने आपल्या संघात घेतले होते, परंतु निवृत्ती न जाहीर करता दुबईतील लीगमध्ये आपली नोंदणी करून त्याने बीसीसीआयच्या नियमांचा भंग केला होता.  

युवक प्रतिष्ठानच्या कार्यालयाच्या आवारात अस्वच्छता तसेच तळीरामांचा वावर



मुलुंड /शेखर भोसले - मुलुंड पूर्व-पश्चिम वाहन उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या माजी खासदार डॉ किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानच्या कार्यालयाच्या आवारात अस्वछतेचे साम्राज्य पसरलेले असून येथील मोकळ्या जागेत दारूच्या रिकाम्या बाटल्या, सिगारेटची थोटके व इतर कचरा मोठया प्रमाणात पडला असल्याचे आढळून आले आहे. युवक प्रतिष्ठानच्या या कार्यालयाच्या आवाराचा दरवाजा सतत उघडाच असल्याने तसेच कार्यालयाच्या सभोवतालची सुरक्षा भिंत देखील दुरावस्थेत असल्याने या आवाराचा वापर गर्दुल्ले व तळीराम आपल्या व्यसनाची तळप भागविण्यासाठी तर काही समाजकंटक इतर गैरकृत्य करण्यासाठी करत आहेत असे आढळून आले आहे. 
    मुलुंडमधील सामाजिक कार्यकर्ते शूलभ जैन यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, मुलुंडमधील  वाहन उड्डाण पुलाच्या खाली असलेल्या युवक प्रतिष्ठानच्या कार्यालयाच्या आवारात सर्वत्र दारूच्या रिकाम्या बाटल्या, कपडे व इतर कचरा पडलेला असून काही समाजकंटक, गर्दुल्ले, दारुडे या जागेचा वापर गैरकृत्यासाठी करीत आहेत. या कार्यालयाच्या देखभालीकडे कोणीही लक्ष देत नसल्यामुळे येथे सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. येथे सुरक्षा रक्षक नसल्यामुळे तसेच या कार्यालयाच्या आवाराचा दरवाजा सतत खुला असल्यामुळे काही दिवसांपूर्वी येथे एक अज्ञात मृतदेह आढळून आला आहे. पाठीमागच्या बाजूने देखील भिंत नसल्यामुळे गर्दुल्ले, तळीराम तसेच समाजकंटकांचा वावर येथे वाढला असून दारू पिण्यासाठी व इतर गैरकृत्य करण्यासाठी सर्रास या आवाराचा वापर केला जात आहे. खासदार किरीट सोमय्या व त्यांचे नगरसेवक सुपुत्र नील सोमय्या कोणीही येथे फिरकत नाही आहेत. त्यामुळे युवक प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱयांनी आणि प्रशासनाने वेळीच लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अन्यथा भविष्यात येथे मोठा अनर्थ घडू शकतो, अशी भीती शूलभ जैन व काही जागरूक नागरिकांनी व्यक्त करण्यात आली आहे.
     युवक प्रतिष्ठानच्या समाजोपयोगी कार्यासाठी दिलेल्या या जागेची योग्यरीत्या देखभाल केली जात नसेल तसेच दारुडे व समाजकंटक जर या आवारात गैरकृत्य करत असतील तर प्रशासनाने ही जागा ताब्यात घ्यावी व परिसर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवावा, अशी मागणी यानिमित्ताने मुलुंड परिसरात जोर धरत आहे.  

मंदिरे उघडण्यासाठी भाजपाने मुलुंडमध्ये केले घंटानाद आंदोलन

मुलुंड / शेखर भोसले -'दार उघड उद्धवा, दार उघड' अश्या घोषणा देत, महाराष्ट्रातील मंदिरे सुरु करा या मागणी करिता महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संघटना, धर्माचार्य आणि प्रमुख देवस्थाने यांनी एकत्र येऊन कुंभकर्णापेक्षाही गाढ झोपलेल्या ठाकरे सरकारला इशारा देण्यासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे आज मुलुंडमध्ये ठीकठिकाणी विविध मंदिरासमोर सकाळी ११ वाजता घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घंटा वाजवून ठाकरे सरकारला मंदिर सुरु करण्यासाठी इशारा देण्यात आला. 
    ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक आणि आमदार मिहीर कोटेचा यांच्या नेतृत्वाखाली मुलुंड पश्चिम येथील अंबाजी धाम मंदिरासमोर आज सकाळी ११ वाजता झालेल्या घंटानाद आंदोलनात भाजपाचे मुलुंड विधानसभा अध्यक्ष मनिष तिवारी, नगरसेविका समिता कांबळे, नगरसेवक नील सोमय्या व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 
      भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुलुंड पूर्व येथील हनुमान चौकातील हनुमान मंदिरासमोर झालेल्या घंटानाद आंदोलनात नगरसेविका रजनी केणी, माजी नगरसेवक नंदकुमार वैती व इतर भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग झाले होते. आघाडी सरकारने राज्यातील सर्व मंदिरे तातडीने उघडावी यासाठी हे घंटानाद आंदोलन करण्यात आले. 

मुंबई महानगरपालिका मुद्रणालय सेवा निवृत्त बांधणी विभाग प्रमुख सुरेंद्र पावसकर यांचे निधन

मुंबई / महादेव गोळवसकर - मुंबई महानगरपालिका मुद्रणालयातील बांधणी विभाग प्रमुख सेवा निवृत्त सुरेंद्र धोंडू पावसकर वय ६१ वर्षे यांचे शुक्रवार दि २८ ऑगस्ट रोजी  सकाळी अल्प आजाराने विक्रोळी येथील त्यांच्या घरी दु:खद निधन झाले.   
   सुरेंद्र पावसकर मुंबई महानगरपालिका मुद्रणालयात सन १९८१ साली बांधणी विभागात कामगार म्हणून सेवेत दाखल झाले होते. त्यांनी मुद्रणालयात ३७ वर्षे सेवा केली. मुद्रणालयात त्यांनी विविध पदांवर काम केले .ते चार वर्षे बांधणी विभाग खाते होते त्याच पदावरून २०१७ साली सेवा निवृत्त झाले होते. त्यांच्यावर मुञपिंडाच्या आजाराचे उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.
    त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलगे आहेत. संध्याकाळी त्यांच्यावर विक्रोळी येथील हिंदु स्मशानभूमीत अंतसंस्कार करण्यात आले .पावसकर यांच्या निधनाची बातमी मुद्रणालयातील कामगारांना समजताच मुद्रणालयात  शोकाकुल वातावरण निर्माण झाले.त्यांच्या बरोबरीच्या सेवा निवृत्त अधिकारी ,कर्मचार्यानी शोक व्यक्त केला. 
          सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो अशी  प्रार्थना व्यक्त केली. 

मुलुंड पश्चिमेतील रहिवासी सोसायटयांना थर्मलगण आणि ऑक्सिमीटरचे मोफत वाटप

मुलुंड/ शेखर भोसले - दि २७ ऑगस्ट रोजी मुलुंड पश्चिमचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्या वतीने विभागातील सोसायटयांना,  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व रहिवासी कोरोनासंबंधित अलर्ट राहावेत या उद्देशाने थर्मलगण आणि ऑक्सिमीटरचे मोफत वाटप करण्यात आले. सोसायटीतील रहिवाशांचे तसेच सोसायटीत येणारे पाहुणे, कामगार, सफाई कामगार, दूधवाले, पेपर टाकणारे यासर्वांचे तापमान आणि ऑक्सिजन लेवल चेक केल्याने कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही याची बेसिक माहिती होते व त्यासाठी हे वाटप करण्यात आले.
     मुलुंड पश्चिम येथील सुधीर कॉम्प्लेक्समध्ये भेट देऊन नगरसेवक गंगाधरे यांनी येथील श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि कोविड १९ च्या रोगराई विरोधात लढणाऱ्यांसाठी, कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी सुधीर कॉम्प्लेक्समध्ये येणार्‍या प्रत्येक भाविकांचे आणि कार्यकर्त्यांचे तापमान तपासण्यासाठी यावेळी थर्मोमीटर आणि ऑक्सिमीटरचे वितरण करण्यात केले. यावेळी भाजपाचे महिला आणि पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

मुलुंड पूर्व संभाजी राजे मैदान मागील काही दिवसांपासून अंधारात


मुलुंड /शेखर भोसले -मुलुंड पूर्व येथील संभाजी राजे पार्क अंधारात असून येथील विजेचे सर्व पोल गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने येथे फेरफटका मारण्यासाठी येणार्या नागरिकांना अंधाराचा सामना लागत आहे. जेष्ठ नागरिक व महिला वर्गांना याचा विशेष त्रास होत आहे तसेच या अंधाराचा फायदा घेवून पार्कात काही प्रेमी युगुल अनैतिक चाळे करताना आढळून येत असल्याने जेष्ठ नागरिक तक्रार करताना दिसत आहेत . 
    येथील जेष्ठ नागरिकांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे मैदानातील सर्व दिवे बंद आहेत त्यामुळे येथे फेरफटका मारण्यासाठी येणार्या नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. पावसात या पार्कात गवत वाढते व त्या वाढलेल्या गवतात सरपटणारे प्राण्यांचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे अंधारात येथे फेरफटका मारताना पायाखाली हे सरपटणारे प्राणी येण्याची भीती असल्याने जेष्ठ नागरिकांना व महिलांना विशेष काळजी घ्यावी लागत आहे. त्यातच या अंधाऱ्यात काही प्रेमी युगुल कोपऱ्यात बसून अनैतिक चाळे करत असतात. त्यामुळे पालिकेने येथील विजेचे दिवे लवकरात लवकर चालू करण्याची मागणी या जेष्ठ नागरिकांनी केली आहे.

खासदार मनोज कोटक यांनी गुजरातच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्षांचा केला सत्कार


मुलुंड /शेखर भोसले -खासदार सी आर पाटील यांची गुजरातचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी दिल्लीत सी आर पाटील यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. तसेच त्यांना मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराचा प्रसाद व गणेश मुर्ती भेटीदाखल दिल्या. मनोज कोटक यांनी यावेळी खासदार सी आर पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

बुंध्यात मातीऐवजी सिमेंट मिश्रित खडी टाकल्याने झाडांच्या वाढीला अडथळे

मुलुंड /शेखर भोसले -मुलुंड पूर्व येथील टाटा कॉलनीतील पदपथालगत पालिकेतर्फे लावण्यात आलेल्या झाडांच्या बुंध्यात मातीऐवजी सिमेंटमिश्रित खडी, रेती टाकण्यात आल्याने झाडांच्या वाढीला अडथळे निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून लवकरच ही झाडे सुकण्याची शक्यता निर्माण झाली आहेत. तसेच झाडांच्या चारही बाजूने बांधण्यात येत असलेला चौथरा देखील न बांधण्यात आल्याने वाहनचालक या झाडांना चिटकून गाडी लावत आहेत त्यामुळे एकंदरीत या  झाडांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 
     यासंदर्भात अधिक माहिती देताना येथील सामाजिक कार्यकर्ते साहेबराव घोलप यांनी सांगितले की,  पालिकेने लावलेल्या झाडांच्या बुंध्यात सिमेंटमिश्रित खडी व माती टाकण्यात आली असल्याने परिसरातील नागरिक व तरुण वर्ग संतापला आहे. अश्या प्रकारे सिमेंटमिश्रित खडी टाकल्याने झाडांची वाढ़ न होता झाड सुकून मरून जाईल. तसेच झाडांच्या बाजूने चौथरा बांधून झाडांना सुरक्षितता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. पालिकेच्या उद्यान विभागाने सदर प्रश्नी ताबडतोब लक्ष घालून बुंध्यातील खडी काढून टाकावी व झाडांच्या वाढी व सुरक्षेसाठी आवश्यक ती पाऊले उचलावीत, अशी मागणी साहेबराव घोलप यांनी केली आहे.  
      पालिकेच्या उद्यान विभागात यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता तेथे कोणीही उपलब्ध नव्हते. तसेच तेथील वरिष्ठ अधिकाऱयांना फोन केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही परंतु रस्त्याच्या कडेने लावलेल्या झाडांच्या देखभालीकडे पालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱयांचे दुर्लक्षच असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. 

मुलुंड तहसील कार्यालयात सॅनिटायझर व सॅनिटायझर होल्डिंग स्टँडचे वाटप

मुलुंड /शेखर भोसले - मुलुंड पश्चिम येथील शासकीय तहसील कार्यालयात असलेल्या आधार केंद्रात रोज शेकडो नागरिक आधार कार्ड काढण्यास अथवा त्यातील तांत्रिक बदल करण्यास येत असतात. कोरोना महामारीच्या काळात या शासकीय कामासाठी तेथे येणार्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी मात्र सॅनिटायजर किंवा इतर कोणतीही सुरक्षेची साधने उपलब्ध नसल्यामुळे कोरोना प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक होती. ही बाब लक्षात आल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी, मुलुंड तहसील कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते, शिवसैनिक अभिजीत क. चव्हाण, मुलुंड विधानसभा कार्यालय प्रमुख सीताराम खांडेकर व शाखाप्रमुख संजय दळवी यांच्या माध्यमातून मोफत ५ लिटर सॅनिटायझर व सॅनिटायझर होल्डिंग स्टँड नागरिकांसाठी २८ ऑगस्ट रोजी उपलब्ध करून देण्यात आला. मुलुंड तहसील कार्यालयातील कर्मचाऱयांनी व सरकारी कार्यालयात येणार्या नागरिकांनी शिवसेनेच्या या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. 

गणेशोत्सवाच्या सहाव्या दिवशी मुलुंडमध्ये शांततेत गौरी, गणपतींचे विसर्जन


मुलुंड /शेखर भोसले - दि २७ ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाच्या ६ व्या दिवशी मुलुंड पूर्व व पश्चिम मधील एकूण ६ तलावात मिळून १३४५ घरगुती गणपती विसर्जन झाले तर २२ सार्वजनिक गणरायांचे विसर्जन झाले तसेच २०३ गौरींचे विसर्जन झाले. प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत भाविकांनी अत्यंत शांततेत श्री गणरायांचे व गौरींचे विसर्जन केले.  
     मुंबई महानगर पालिका व मुलुंड पोलिसांनी केलेल्या चोख व्यवस्थेमुळे गौरी-गणपतीला घेवून विसर्जनासाठी येणार्या भाविकांचे कोणत्याही अडथळ्याशिवाय तसेच गर्दीचा सामना न करता थोड्याच वेळात विसर्जनाचे सोपस्कार पार होत होते. घरातूनच श्री गणेशाची शेवटची आरती करून आल्यामुळे विसर्जन स्थळी गर्दी होत नव्हती. पोलिसांचा उत्तम बदोबस्तामुळे परिस्थिती सर्वत्र नियंत्रणात होती. 
       मुलुंड पश्चिम येथील कालिदास नाट्यगृहाजवळील कृत्रिम तलावात ८८ घरगुती, ६ सार्वजनिक, १२ गौरींचे विसर्जन झाले. जकात नाक्याजवळील कृत्रिम तलावात ५५ घरगुती, २ सार्वजनिक, ३ गौरींचे विसर्जन झाले. स्वप्ननगरीतील कृत्रिम तलावात २२० घरगुती, ३ सार्वजनिक, १५ गौरींचे विसर्जन झाले. मुलुंड पूर्व येथील वामनराव शाळेच्या बाजूला बनविण्यात आलेल्या कृत्रिम तलावात १२९ घरगुती, ० सार्वजनिक, ३० गौरींचे विसर्जन झाले. पूर्व द्रुतगती महामार्गावरील मोरया तलावात ५७९ घरगुती, ९ सार्वजनिक, ९० गौरींचे विसर्जन झाले. मिठागर रोड येथील गणेश घाटावरील तलावात २७४ घरगुती, २ सार्वजनिक, ५३ गौरींचे विसर्जन झाले. 

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२०

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या ईशान्य मुंबईतील पहिल्या अभ्यास केंद्राला मान्यता

मुलुंड /शेखर भोसले -मुलुंड खिंडीपाडा येथील सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाच्या आर. के. बी. एड. व डी. एड कॉलेज यांस टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यास केंद्राची मान्यता मिळाली असून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे ईशान्य मुंबईत अभ्यास केंद्र असलेले हे पहिलेच कॉलेज आहे.
     यासंदर्भात प्रतिक्रिया देताना या कॉलेज संस्थापक, संचालक रमेश खानविलकर यांनी सांगितले की ईशान्य मुंबईतील या पहिल्या अभ्यास केंद्राला टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने मान्यता दिल्याने परिसरातील विद्यार्थ्यांसाठी हे खूपच सोयीचे केंद्र होणार आहे व याचा लाभ दूरस्थ पद्धतीने शिक्षण घेणाऱया अनेक विद्यार्थ्यांना होणार आहे. लवकरच या कॉलेजमध्ये बी.ए, बी. कॉम, एम. ए, एम. कॉम, बी. लिब, एम. लिब, एम. ए.(भाषा), बी.बी.ए. या अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ ला लवकरच सुरवात होणार असल्याचे रमेश खानविलकर यांनी यानिमित्ताने सांगितले.

महावितरणने केबल दुरुस्तीसाठी खोदलेला रस्ता दुरुस्तीच्या प्रतिक्षेत

मुलुंड/ शेखर भोसले - मुलुंड पूर्व येथील बबनराव कुलकर्णी मार्गावरील कानपिळे सदन समोरील रस्ता दोन महिन्यांपूर्वी महावितरणने केबल दुरुस्तीच्या कामासाठी खोदून ठेवला असल्याने सध्या तेथे कचरा जमा व्हायला लागला आहे. त्यामुळे परिसर अस्वच्छ होत आहे तसेच रस्ताच्या कडेने जाणाऱया वाहनांना व पादचाऱयांना देखील या खड्ड्यांमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथील व्यावसायिक बाळू साटम यांनी सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महावितरणशी संपर्क साधला परंतु महावितरण पालिकेच्या टी वॉर्ड वर जबाबदारी ढकलत असल्याने अद्याप येथील रस्ता दुरुस्ती होवू शकली नाही आहे.
    पालिकेचे रस्ता दुरुस्ती खाते व महावितरणने एकमेकांशी योग्य रित्या समन्वय साधून सदर रस्ता तातडीने दुरुस्त करणे आवश्यक होते परंतु यात चालढकल पणा होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असे मत बाळू साटम यांनी मांडले आहे. पालिकेच्या दुरुस्ती खात्याच्या अधिकाऱयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता काहीच प्रतिसाद मिळाला नाही. 

अष्टविनायक मित्र मंडळातर्फे आयोजित श्री गणेशोत्सवाचे ४६ व्या वर्षात पदार्पण


मुलुंड /शेखर भोसले - सरोजिनी नायडू रोडमुलुंड पश्चिम येथील अशोकनगर परिसरातील अष्टविनायक मित्र मंडळातर्फे श्री गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १९७५ साली स्थापना झालेल्या या मंडळाच्या गणेशोत्सवाचे हे ४६ वे वर्ष असून यंदाच्या वर्षी ११ दिवसांसाठी श्री गणेशाच्या मनमोहक मूर्तीची प्रतिष्ठापना दि २२ ऑगस्ट रोजी येथे करण्यात आली आहे. शिवसेना उपविभाग प्रमुख सुनिल गारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात या उत्सावात ११ दिवस वैविध्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून यात आरोग्यशिबीर व रक्तदान शिबिराचा समावेश आहे. महिलांसाठी हळदी कुंकूलहान मुलांसाठी क्रीडा स्पर्धा, सत्यनारायण महापूजा तसेच इतर अनेक प्रेरणादायक उपक्रमाचे आयोजन येथे करण्यात आले आहे. 
   लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना जनजागृती करण्याचे आवाहन केले होते. लोकमान्यांना अभिप्रेत असलेला उत्सव व समाजप्रबोधनाचे कार्य येथील गणेशोत्सवात सातत्याने होत आले आहे. प्रमुख सल्लागार सुनिल गारे यांच्या मार्गदर्शनाखाली अष्टविनायक मित्र मंडळाचे अध्यक्ष विजय रोटे, उपाध्यक्ष दुष्यंत गोसावी, सचिव दिपक गांगुर्डे, खजिनदार विनोद वाघमारे, सहखजिनदार सचिन कदम व इतर अनेक कार्यकर्ते हा गणेशोत्सव उत्साहात व दिमाखात साजरा करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. मुलुंड मधील अनेक भक्तांनी येथील गणेशोत्सवाला भेट देवून श्री गणेशाच्या दर्शनाचा लाभ घेतला असून मुलुंडमधील अनेक प्रतिष्ठित नागरिक देखील येथील गणेशाचे दर्शन घेण्यासाठी येताना दिसत आहे.

सेवाभावी डॉक्टर कुशल सावंत यांचा शिवप्रेरणा मित्र मंडळाने केला सत्कार

मुलुंड /शेखर भोसले - कोरोना काळातही स्वतःचा खाजगी दवाखाना बंद न ठेवता अहोरात्र रुग्णांशी सेवा करणाऱ्या मुलुंड पूर्व येथील म्हाडा वसाहतीतील सेवाभावी डॉक्टर कुशल सावंत यांच्या समाजोपयोगी कार्याबद्दल त्यांचा सत्कार टाटा कॉलनीतील शिवप्रेरणा मित्र मंडळातर्फे रविवार दि २३ ऑगस्ट रोजी करण्यात आला. 
       प्रशासनाने केलेल्या आवाहनाचा मान राखत यंदाच्या वर्षी टाटा कॉलनीतील शिवप्रेरणा मित्र मंडळातर्फे दीड दिवसाच्या गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या मंडळातर्फे गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते तसेच समाजोपयोगी कार्य करणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींचा सत्कार करण्यात येतो. त्याच अनुषंगाने गेल्या ५ महिन्यांपासूनच्या कोरोना महामारीच्या काळात इतर खाजगी दवाखान्यातील डॉक्टरांनी कोरोनाच्या भीतीने आपलें दवाखाने बंद ठेवले असतानाही म्हाडातील सेवाभावी डॉक्टर कुशल सावंत यांनी आपला दवाखाना बंद न ठेवता सर्वसामान्य रुग्णांना अल्प दरात अहोरात्र सेवा दिल्याने डॉ कुशल सावंत यांचा शाल व श्रीफळ देवून शिवप्रेरणा मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 
       मंडळाचे सल्लागार दीपक सावंत, साहेबराव घोलप यांच्या हस्ते झालेल्या या सत्कार सोहळा कार्यक्रम प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष रमेश बनबे, उपाध्यक्ष मयूर दाभोलकर, सल्लागार प्रदीप शिरगांवकर, वसंत पवार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

मुलुंड पोलिसांनी धाड टाकून तीन पत्ते जुगार खेळणाऱ्या ७ आरोपींवर वर केला गुन्हा दाखल

मुलुंड /शेखर भोसले -मुलुंड पोलिसांनी काल सर्वोदय नगर मधील एका रूमवर धाड टाकून तीन पत्ते जुगार खेळणाऱ्या व्यक्तींना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल केलेल्या ७ आरोपींपैकी एक आरोपी हा तडीपार असताना कोणतीही परवानगी न घेता सदर ठिकाणी प्राणघातक हत्यार (तलवार) सह मिळून आला आहे.
         पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस शिपाई सचिन चव्हाण (क्र. ०९०३२९) या सरकारी फिर्यादीनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार बुधवार दि २६ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजून ५ मिनिटाच्या सुमारास रूम क्र 11 च्या वरील रूम, रामचंद्र पाटील चाळ, गांधी नगर, सर्वोदय नगर, मुलुंड पश्चिम येथून आरोपी वनिता ठाकूर उर्फ झरीनाजयश्री घुमेराकेश माळकरविकास त्रिभुवनगणेश बजंत्रीराकेश मागडे हे पैसे लावून तीन पत्ते नावाचा जुगार खेळताना मिळून आल्याने तक्रार नोंद करण्यात आली आहे. यांच्यावर मुलुंड पोलीस ठाणे गुन्हा रजि. न. ५७६/२०२० कलम १८८, २६९ भा.द.वि. सह कलम ५१ बी आ.व्या.का सह कलम १४२ मपोका सह कलम ४, २५ भा.ह.का. सह कलम ४अ, ५ जुगार प्रतिबंध कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांच्याकडून रू. १,४५,६००/-  एवढी रोख रक्कम, ५२ पत्ते असलेले कॅट आणि लोखंडी तलवार, इत्यादी मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील आरोपी गणेश बजंत्री हा तडीपार असतानाही कोणतीही परवानगी न घेता सदर ठिकाणी प्राणघातक हत्यार (तलवार) सह मिळून आला. तसेच अमित पवार या आरोपीवर देखील गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
        याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष कांबळे व प्रभारी पो.नि.रमेश ढसाळ हे तपास अधिकारी अधिकचा तपास करत असल्याचे समजले आहे.

बाप्पा दर्शन -२०२०

महापौर किशोरीताई पेडणेकर समवेत महापौर बंगल्यातील गणरायाचे
 दर्शन घेताना मराठी वृत्तपत्रलेखक संघाचे माजी अध्यक्ष विजय कदम,
कार्यकारिणी सदस्य अरुण खटावकर आणि राहुल कदम

बुधवार, २६ ऑगस्ट, २०२०

अष्टविनायक मित्र मंडळातर्फे मुलुंडमध्ये मोफत आरोग्य शिबीर


मुलुंड / शेखर भोसले : शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागातील जनतेसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले होते त्याला अनुसरून बीजेएस आणि एमसीएचआय यांच्या सौजन्याने शिवसेना मुलुंड आणि अष्टविनायक मित्र मंडळ यांच्या वतीने विभागप्रमुख, आमदार रमेश कोरगावकर आणि विभाग संघटिका संध्या वढावकर यांच्या सूचनेनुसार शिवसेना उपविभाग प्रमुख सुनिल गारे यांच्या प्रयत्नाने अशोक नगर मधील नागरिकांसाठी बुधवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी इत्यादी साथीच्या आजारावर डॉक्टरांमार्फत तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली. साधारण १५० नागरिकांनी या वैद्यकीय शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराच्या आयोजनासाठी अष्टविनायक मित्र मंडळाचे अध्यक्ष विजय रोटेउपाध्यक्ष दुष्यंत गोसावी, सचिव दिपक गांगुर्डे, खजिनदार विनोद वाघमारे,  सहखजिनदार सचिन कदम व इतर कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

ट्रम्प तात्यांना निवडणूक जड जाणार

          अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होऊ घातली आहे. अमेरिकेत सध्या या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. केवळ अमेरिकेचे  नव्हे तर जगाचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे काय होईल? ते पुन्हा निवडणूक येतील की पराभूत होतील? याची चर्चा जगभर सुरु  आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. सहा महिन्यांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प हे ही निवडणूक सहज जिंकतील अशी स्थिती होती. पण कोरोना आला आणि दुर्दैवाने फासे त्यांच्या उलटे पडले. अमेरिकेत कोरोनाचा कहर जसा वाढत गेला तशा  ट्रम्प यांच्या समस्या वाढत गेल्या. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात ट्रम्प प्रशासन अपयशी ठरल्याने अमेरिकन जनतेची ट्रम्प यांच्याविषयी नाराजी वाढत गेली. कोरोना सारख्या आपत्तीच्या काळात ट्रम्प यांच्या उलटसुलट विधानांनी त्यात भरच पडली.  कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला खीळ बसत गेली. या परिस्थितीचा सामना करताना ट्रम्प यांच्या तोंडाला फेस येऊ लागला आहे तरीही ट्रम्प यांनी चिकाटी सोडली नाही ते त्यांचे विरोधक जो बिडेन यांच्या  विरोधात तुटून पडत आहे. तरीही सध्यस्थीतीत डोनाल्ड ट्रम्प जो बिडेन यांच्यापेक्षा मागे पडत चालले आहे. जो बिडेन यांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिमी कार्टर, बिल क्लिंटन व बराक ओबामा हे तीन माजी राष्ट्राध्यक्ष बिडेन यांच्या पाठीशी असून ते उघडपणे बिडेन यांचा प्रचार करीत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा भर भारतीय मतदारांवर होता या मतांवर डोळा ठेवूनच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलावून हाऊ डी मोदी हा कार्यक्रम घेतला. नरेंद्र मोदी यांनी अब की बार ट्रम्प सरकार म्हणून त्यांना पाठिंबा दर्शवला. भारतीय मतदारांची मते आपल्या पारड्यात पडतील अशा अविर्भावात असणाऱ्या ट्रम्प यांना जो बिडेन यांनी  झटका देत कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या महिलेला उपाध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. जो बिडेन यांच्या खेळीने ट्रम्प यांना चांगलाच झटका बसला आहे. कारण कमला हॅरिस यांच्या उमेदवारीमुळे ट्रम्प यांना मिळणारी भारतीय मते विभागली जाणार आहे. सगळेच फासे उलट पडत चाललेल्या ट्रम्प यांना त्यांच्या घरातूनही विरोध होऊ लागला आहे. ट्रम्प यांच्या पुतनीने ट्रम्प यांच्या विरोधात उघड भूमिका घेऊन बिडेन यांचे समर्थन केले आहे. ट्रम्प यांची सख्खी थोरली बहीण, माजी फेडरल न्यायाधीश मरियम ट्रम्प यांनीही आपला भाऊ तत्वहीन, अखंड बडबड करणारा आणि खोटारडा आहे असे म्हटले आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत सख्ख्या थोरल्या बहिणीने ट्रम्प यांना अशी ओवाळणी दिल्याने ट्रम्प यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.अर्थात  ट्रम्प यांचा खोटारडेपणा जगजाहीर आहे. मूळ मुद्द्याला सोडून नको त्या मुद्द्यांवर चर्चा करुन जनतेला मूर्ख बनवायचे हे ट्रम्प यांचे धोरण आता त्यांच्याच अंगलट आले आहे. त्यामुळेच जो बिडेन यांना मिळणारा जनतेचा प्रतिसाद वाढत चालला आहे. अमेरिकन प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या निष्कर्षानुसार डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांना जवळपास सर्व प्रमुख राज्यांमध्ये ट्रम्प यांच्यावर आघाडी मिळाली आहे. एकूणच डोनाल्ड  ट्रम्प यांच्याविषयी अमेरीकन जनतेचे मत पालटत आहे. ही  स्थिती अशीच कायम राहिली तर डोनाल्ड ट्रम्प यांचे सलग दुसऱ्यांदा अमेरिकेचे बनायचे स्वप्न स्वप्नच राहील. 

-श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे

मूळ फेरीवाल्यांना धंदा करण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी पालिकेला देण्यात आले निवेदन

मुलुंड /शेखर भोसले -कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी पालिकेच्या टी वॉर्डने रस्त्याच्या कडेने बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करून रस्त्यावर बसण्यास मनाई केली त्यामुळे गेल्या ५ महिन्यांपासून बरेचसे फेरीवाले अजुनही घरीच बसुन आहे. काहींनी थोडा फार प्रमाणात आपला धंदा सुरु केला आहे परंतु पालिकेची अतिक्रमण विरोधी गाडी येऊन त्यांचा धंदा उचलून नेत आहे तसेच मुळ फेरीवाले बाजारात दिसत नसुन, या मूळ फेरीवाल्यांच्या जागी नवीन फेरीवाले येऊन बसल्याने मूळ फेरीवाल्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याअनुषंगाने फेरीवाल्यांच्या प्रतिनिधींनी शिवसेना मुलुंड विधानसभेचे उपविभाग प्रमुख सुनिल गारे यांना साकडे घालून हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. त्याला अनुसरून सुनिल गारे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मूळ फेरीवाल्यांना न्याय मिळावा आणि त्यांना आपल्या जागी धंदा करण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी टी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांना मंगळवार दि २५ ऑगस्ट रोजी भेटून फेरीवाल्यांच्या मागणीचे एक निवेदन सादर केले. 
    यावेळी सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांच्याशी चर्चा करताना गेल्या ५ महिन्यांपासून मूळ फेरीवाले घरी बसल्यामुळे, कित्येक फेरीवाल्यांना घर, कुटुंब चालवणेही कठीण होऊन बसले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच मुलांच्या शाळेचा खर्च व इतर दैनंदिन खर्च करताना नाकीनऊ येत असल्याचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांच्या लक्षात आणून दिले तसेच मूळ फेरीवाल्यांच्या जागी नवीन फेरीवाले येऊन बसत आहेत त्यामुळे मूळ फेरीवाल्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, हे देखील त्यांना सांगून लवकरात लवकर मूळ फेरीवाल्यांना धंदा करण्याची परवानगी देण्याची मागणी केली. 
     टी वॉर्ड महानगर पालिका सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांनी भेटीस आलेल्या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत आठवडा भरात योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन यावेळी दिले. निवेदन देताना सुनिल गारे यांच्या सोबत फेरीवाले प्रतिनिधी म्हणून कोंडाजी जाधव, शांताराम चौधरी, तुषार शिंदे उपस्थित होते.

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२०

मुलुंडमधून उद मांजरीची सुटका

मुलुंड /शेखर भोसले -मुलुंड पश्चिमेकडील पंचशील नगरमध्ये रविवारी रात्री कुत्रांना घाबरत एका घरात घुसलेल्या उद मांजराला पकडण्यात रॉ संस्थेच्या स्वयंसेवकांना यश मिळाले असून रेस्क्यू केल्यानंतर या मांजराला पिंजर्यात ठेवण्यात आले आहे. डॉ रीना देव यांच्यामार्फत या उद मांजराची तपासणी करण्यात आली असून मांजरीला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. वनविभागाच्या  समन्वयाने या उद मांजराला जंगलात सोडण्यात येईल अशी माहिती रॉ संस्थेचे संस्थापक पवन शर्मा यांनी दिली आहे.
     कुत्रांपासून सुटकेसाठी एक उद मांजर रात्री ११-३० च्या सुमारास मुलुंड पश्चिमेकडील पंचशील नगरमधील एका इमारतीच्या घरात घुसल्याने तिला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते.  मात्र घाबरल्याने हे उद मांजर घरात दडून बसले होते.  ते बाहेर निघत नाही, हे पाहून येथील एका नागरिकाने रात्री १२ च्या सुमारास रॉ संस्थेशी संपर्क साधला असता रॉ संस्थेचे पाच स्वयंसेवक घटनास्थळी पोहचले व दडून बसलेल्या उद मांजराला अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर रेस्क्यू करण्यात यश मिळवले

शिवसेना मुलुंड विधानसभेच्या सदस्यता अभियानाला सुरुवात



मुलुंड /शेखर भोसले - शिवसेना प्राथमिक सदस्य अभियानास मुंलुंङ विधानसभा मतदारसंघात सोमवार दिनांक २४ ऑगस्ट पासून सुरुवात करण्यात आली. मुलुंड विभागातील शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकाऱयांना याबाबतची माहिती देण्यासाठी मुलुंड पूर्व येथील दत्तात्रय अनेक्स इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात एक सभा २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४ वाजता आयोजिण्यात आली होती. ईशान्य मुंबईचे विभागप्रमुख, आमदार रमेश कोरगावकर व महिला संघटिका संध्या वढावकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सभेत मुलुंड मधील शिवसेनेचे अनेक आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. मंचावर मुलुंड विधानसभा संघटक नितीन सावंत हे देखील उपस्थित होते. 
       उपस्थितांना शिवसेनेचे उपविभागप्रमुख दिनेश जाधव, सुनिल गारे, महेंद्र वैती यांनी सुरुवातीला मार्गदर्शन केले. तर आपल्या उत्तम वक्तृत्वशैलीने उपस्थित प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे मुलुंड विधानसभा कार्यालय प्रमुख सीताराम खांडेकर यांनी प्रभावीपणे सभेचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक करून शिवसैनिकांना या सदस्य नोंदणी अभियानाची विस्तृत कल्पना दिली. विभाग संघटिका संध्या वढावकर यांनी मार्गदर्शन करून महिलांना जास्तीत जास्त संख्येने सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन केले तर विभागप्रमुख, आमदार रमेश कोरगावकर यांनी आपल्या भाषणात मुलुंड विधानसभेने कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याचा उल्लेख करून सर्वांचे कौतुक केले व मुलुंड विधानसभेतील प्रत्येक शाखेमार्फत कमीत कमी ५००० सदस्य नोंदवण्याची जबाबदारी प्रत्येक शाखाप्रमुखांना दिली. 
         यावेळी विभागप्रमुखांच्या उपस्थितीत उपविभाग प्रमुख महेंद्र वैती व शाखाप्रमुख अमोल संसारे यांचे सदस्य नोंदणी अर्ज भरून या सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली.  

रस्त्यावरील अंधारामुळे नागरिकांना जीव मुठीत घेवून ओलांडावा लागतो रस्ता

मुलुंड /शेखर भोसले - मुलुंड पश्चिमच्या ऐसीसी रोड वरील अशोकनगर येथील अलिबहादूर चाल जवळील ३ ते ४ स्ट्रीट लाईटचे पोल गेल्या १५ दिवसांपासून बंद असल्याने रस्त्यावर अंधार पडला असून परिसरात येणाऱ्या -  जाणाऱया गाड्यां दिसत नाही आहेत त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महावितरणचे कर्मचाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आली असून विद्युत पोल दुरुस्तीसाठी काहीच हालचाल होताना दिसत नाही आहे.
     याबाबत अधिक माहिती देताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए ) मुलुंड तालुका सचिव उमेश खरात यांनी सांगितले की महावितरणच्या अधिकाऱयांना येथील विद्युत पोल बंद असल्याची तक्रार करण्यात आली.  परंतु अद्यापही काहीच कारवाई करण्यात आली नाही आहे. रस्त्यावरून सुसाट वाहणाऱ्या वाहनांना रस्त्यावरील अंधारात पादचारी व दुकानात खरेदीसाठी जाणारी नागरिक, लहान मुले दिसत नाही आहेत त्यामुळे मागील आठवड्यात दोन वेळा येथील रहिवाशांचे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती सुदैवाने ते थोडक्यात वाचले. परंतु लवकरच येथील विद्युत पोल दुरुस्त केले नाही तर भविष्यात अपघात होवून मोठी दुर्घटना घडू शकते, त्यामुळे लवकरात लवकर सर्व विद्युत पोल दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

ऑप्टिकल फायबर केबल प्रकल्प अंदमान निकोबारसाठी वरदान

         चेन्नई ते अंदमान निकोबार द्वीपसमूहाला  वेगवान डिजिटल कनेक्टिव्हिटीने जोडणारा ऑप्टिकल फायबर केबल कनेक्टिव्हिटी प्रकल्प  आता कार्यन्वित झाला आहे. समुद्रात खोल पाण्यातुन जवळपास २३०० किलोमीटर ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम दीड वर्षांपासून सुरू होते. खवळलेला समुद्र, उसळणाऱ्या लाटा, सतत पडणारा पाऊस यावर मात करुन हा प्रकल्प पूर्ण करण्यात शास्त्रज्ञ- तंत्रज्ञांनी यश मिळवले. हा प्रकल्प अंदमान निकोबार द्वीपसमूहासाठी वरदान ठरणार आहे. या प्रकल्पामुळे अंदमान निकोबार द्वीपसमूहाला वेगवान इंटरनेट व मोबाईलची सेवा मिळणार आहे. भारताच्या समुद्री वर्चस्वासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे. येथून अनेक गोष्टींवर नियंत्रण ठेवणे भारताला शक्य होणार आहे. विशेष म्हणजे या द्वीपसमूहाजवळ इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार हे देश आहेत. दक्षिण आशिआई देशांशी व्यापारी आणि इतर प्रकारच्या सहकार्यासाठी सतत संपर्कात राहण्याच्या दृष्टीने ही बेटे खूप महत्वाची मानली जातात. विशेष म्हणजे अनेक देशांची जहाजे बंगालचा उपसागर व अंदमान निकोबारचा समुद्र या चॅनलचा वापर करतात. सध्या भारताने या बेटांवर  महाकाय तरंगत्या जेटी, तरंगते विमानतळ तसेच जहाज दुरुस्तीच्या सुविधा निर्माण करण्याचा सपाटा लावला  आहे. त्यामुळे भविष्यात अंदमान निकोबारला व्यापाराच्या दृष्टीनेही मोठे महत्व प्राप्त होणार आहे. अंदमान निकोबार द्वीपसमूहांतर्गत ५७२ बेटे आहेत. पैकी ३८ बेटांवर मानवी वस्ती आहे. या बेटांवर सुमारे ४ लाख आदिवासी लोक वास्तव्य करतात. या प्रकल्पामुळे या बेटांवरील हे आदिवासी मुख्य प्रवाहात येऊ शकतात. तसेच या प्रकल्पामुळे  उर्वरित भारताशी या बेटांचा दळणवळणाचा वेग आणखी वाढणार आहे. अंदमान निकोबार द्वीपसमूह हा पर्यटकांच्या दृष्टीने मोठी संधी असलेला प्रदेश आहे. सध्याच्या मर्यादित सुविधांमध्येही या बेटांवर देशविदेशातील हजारो पर्यटक जात असतात या प्रकल्पामुळे या द्वीपसमूहावरील परदेशी पर्यटकांची संख्या आणखी वाढणार आहे. व्यापार, पर्यटन, मत्स्यशेती, संरक्षण यांच्या विकासाला देखील या प्रकल्पामुळे चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे  अंदमान निकोबार द्वीपसमूह भारताच्या व्यापारी आणि समुद्री सामर्थ्याचे मुख्य केंद्र बनणार आहे. 

-श्याम बसप्पा ठाणेदार
 दौंड, जिल्हा पुणे 

ड्रॅगनला वेळीच वेसण घालावे


गेल्या तीन महिन्यांपासून चालू असलेला चिनी तणाव निवळण्याची चिन्हे दिसत नाही आहेत.म्हणूनच, सीमा सुरक्षा दलाचे तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्याचे काम जोरात चालू आहे.यात बीएसएफ च्या १९२३ सीमा चौक्या सेन्सर, सीसीटीव्ही,ड्रोन इत्यादींनी सज्ज करण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे.दोन्ही शेजारील राष्ट्रे ही शत्रू राष्ट्रे असल्यामुळे या पुढे अधिक सतर्कता बाळगावीच लागणार आहे.भारतीय लष्कराला चीनच्या कुरापतीला सडेतोड उत्तर देण्याचे आदेश आहेतच.त्याच बरोबर लष्करीपातळीवर चर्चा सुद्धा चालु आहेत.परंतु,मागील इतिहास पाहता चीन हा खूप घातक बेभरवशाचा शत्रू आहे.आणि म्हणूनच एप्रिल- मे महिन्यात जी स्थिती होती तशी स्थिती ठेवण्यास चिनी ड्रॅगन तयार नाही आहे. तसेच,चीनने फिंगर-५ ते फिंगर-८ भागात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केलेले आहे.दोन्ही देशात १९९३ आणि १९९६ मध्ये झालेल्या करारानुसार या भागात बांधकाम करता येत नाही पण,चिनी ड्रॅगन कराराचे उल्लंघन करून या फिंगर भागात बांधकाम करीत आहे.सर्व पातळीवर जरी चीनला रोखण्याचे प्रयत्न चालू असले तरी,सतर्कता आणि मुत्सद्दीपणा दाखवून आगीचे फुत्कार फेकणाऱ्या आणि भारतीय भूभाग बळकावनाऱ्या चिनी ड्रॅगनला वेळीच वेसण घातले पाहिजे.

-दत्तप्रसाद शिरोडकर
मुलुंड. 

पाकिस्तानची कबुली; दाऊद कराचीत !


दाऊद इब्राहिमचा मुक्काम कराचीतच असल्याचे पाकिस्तान सरकारने मान्य केले आहे. पाकिस्तान सरकारने देशातल्या ८८ कट्टरतावादी नेते आणि संबंधित संघटनांवर निर्बंध लादले आहेत. या यादीमध्ये दाऊद इब्राहिमचा समावेश केला आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारने पहिल्यांदाच अप्रत्यक्षपणे का होईना दाऊद आपल्याच देशात असल्याचे कबूल केले आहे. त्याचा कराचीचा पत्ता या यादीत नमूद करण्यात आल्याचे वृत्त आहे. १९९३च्या बॉम्बस्फोटांपासून दाऊद इब्राहिम भारतासाठी 'मोस्ट वाँटेड डॉन' आहे, हे जागतिक सत्य सर्वांना माहीत आहे. दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचा आरोप यापूर्वी अनेकदा करण्यात आला होता. पण पाकिस्तानने हे आरोप फेटाळून लावले होते. थोडक्यात, ज्या देशात गुंड प्रवृत्तीला संरक्षण देण्यासाठी राज्यकर्तेच खोटे बोलत आहेत, अशा देशाकडून जागतिक पातळीवर शांती आणि ब॔धुत्वाची अपेक्षा बाळगणे मूर्खपणा आहे.

 - सुधीर कनगुटकर
   दिवा (पूर्व), ४०० ६१२.

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

गौराई आली घरा..


       गणपती पुजा व आगमन हे सर्व प्रांतात थोड्याफार फरकाने सारखेच असते. परंतु गौरीचे आगमन हे तसे नसते. त्या येतातच मुळात लेकुरवाळया माहेरवाशीणी म्हणून .. गौरी आगमन अगदी वाजत गाजत होते. कुमारिका गौरीचे आगमन करते आणि संपूर्ण घरात त्यांना फिरवून मग चौरंगावर गौरी स्थापन करतात. विधीवत पूजा करून प्राणप्रतिष्ठा करतात. या दिवशी सासरी गेलेल्या लेकुरवाळया माहेरवाशीणी घरी येतात तसेच गोड पदार्थ नैवेद्य अर्पण करतात. दुसरा दिवस फार महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी नव्या नवरीला तिच्या माहेराहून सौभाग्यलेणी , साडी - चोळी अन् गोड पदार्थ भरलेले सूप तिची आई देते . त्याला ' ओवसा ' असे म्हणतात. हा ओवसा त्या दिवशी गौरीसमोर पुजला जातो. गौरी साधारणपणे तेरडयाच्या रोपांच्या असतात. त्यांनाच आघाडा, शेवंती , मोगरा अशा अनेक फुलांनी सजवले जाते. अलंकारांनी सुशोभित केले जाते. आगरी - कोळी समाज खास पध्दतीचा नैवेद्य दाखवतात. त्या दिवशी गोड वडे, चिंबोरी चाट ( खेकडे ) रस्सा व तांदळाची भाकरी असा नैवेद्य असतो. प्रत्येकाच्या घरी नैवेद्यासाठी विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. रात्री घरातील सर्व स्त्रीयां  गौरीपुढे जागरण करतात. पारंपरिक नृत्य, खेळ खेळून, गाणी म्हणत ही रात्र जागवली जाते. तिसऱ्या दिवशी प्रथेनुसार गौरीचे विसर्जन होते. गौरी जशा वाजत गाजत येतात तशाच वाजत गाजतच जातात. अशी ही गौरी आपल्यासोबत येताना सुख -  शांती - समाधान घेऊन येते व जातांना भरभरून आशीर्वाद देत हसऱ्या चेहऱ्याने, मुखाने आपल्या घरी परतते.. 


       गौरी साठी गाणं...

     सरव गेला नि भादवा उगवला
     आता रं देवा , देवा दि मना रजा
      तुझ्या माहेराची काय तुला गोरी 
       रं काय काय तुला गौरी...
           गौराई चालली माहेरी 
            गौराई चालली माहेरी
             जाती तशी जाऊ द्या
              गळ्यातलं मंगळसूत्र लेऊ द्या...

          
- सौ. स्नेहा मुकुंद शिंपी
  नाशिक 

गणेशोत्सव २०२०....गणेशोत्सव दर्शन विशेष....मुंबई- कोकण विभाग...संकलन- शांत्ताराम गुडेकर

                 डोंबवली पश्चिम येथील बि-२०७, धर्मा हाइट्स, गायकवाड वाडी येथील विराजमान
                 झालेल्या गणपतीचे दर्शन घेताना पत्रकार/महाराष्ट्र हरित सेना वन विभाग महाराष्ट्र 
              शासन सदस्या सौ.मणस्वी महेंद्र मणवे,पती महेंद्र मणवे व चि.रुद्र मणवे.


पारशीवाडी मित्र मंडळाचा गणेशोत्सव शांततेत

 मुंबई / बाळ पंडित - लोकमान्य टिळकांनी स्वातंत्रपूर्व काळात ज्या राष्ट्रीय एकात्मतेच्या ध्येयाने प्रेरित होऊन सार्वजनिक गणेशोत्सवाला चालना दिली त्याच सामाजिक बाधिलकीच्या ध्येयाला मंडळाने अग्रक्रमाने प्राध्यान्य दिले. हिंदू, मुस्लीम, गुजराथी, ख्रिचन, शीख अश्या नाना धर्माचे-जातीचे लोक गणेशाच्या दर्शनाला येतात व गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतात.. पारशीवाडी मित्र मंडळाचा गणेशोत्सव मुंबईतील अग्रगण्य, नवसाला पावणारा, सामाजिक बांधीलकी जपणारा व आर्थर रोडचा राजा म्हणून  सुपरिचित आहे.  या वर्षी मंडळाचे गौरव चव्हाण  यांच्या संकल्पनेतून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी साधेपणात गणेश सजावट साकारली आहे.
       आज मंडळाचे हे ४८  वे वर्ष असून मंडळाने कोविड १९ च्या प्रादुर्भाव असल्याने, शासनाच्या आदेशानुसार उत्सव साधेपणाने व शांततेत सुरू आहे. मंडळाने वर्गणी- देणगी जमा केली नाही.उत्सव काळात होम-हवन, कोरोना योध्याचा सत्कार करण्यात येणार आहे. मंडळ सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे.
      शेकडो पारितोषिकांचा मानकरी म्हणून पारशीवाडी मित्र मंडळाचा गणराज 'आर्थर रोड चा  राजा' म्हणून परिचीत आहे. यावेळेस  दानपेटीतील सर्व रक्कम आदिवासी पाड्यातील अनाथ मुलांना शिक्षणासाठी देण्यात येणार आहे.यावर्षी श्री भास्कर साळूके,  (अध्यक्ष), अजित चाळके (सरचिटणीस), संकेत येरम  (कार्याध्यक्ष ), परेश परब (कोषाध्यक्ष) हे पदाधिकारी आहेत.

गणेशोत्सव २०२०....गणेशोत्सव दर्शन विशेष....मुंबई- कोकण विभाग...संकलन- शांत्ताराम गुडेकर

पत्रकार सौ. श्रावणी श्रीकांत गावडे  मु. पोस्ट- हेदुळ, जिल्हा सिंधदुर्ग,
 तालुका मालवण यांच्या घरी विराजमान झालेली आकर्षक गणेश मुर्ती


श्री.अनंत कृष्णा भोवड,गाव - देवीहसोळ, लिंगवाडी, तालुका-राजापूर, जिल्हा - रत्नागिरी
यांच्या घरी विराजमान झालेली गणेशाची आकर्षक मुर्ती..गणेशाचे दर्शन घेताना भोवड कुटूंब.
सौजन्य- शाहिर कुमारी प्रिती अनंत भोवड निर्मित आर्यादुर्गा नृत्यकलापथक मुंबई



दिव्यातील दातिवली भागातील सामाजिक कार्यकर्ते अरुण फणसे 
यांच्या घरी विराजमान झालेली आकर्षक बाप्पाची मूर्ती






शिवसेना शाखा क्र १०७ मध्ये श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

मुलुंड/ शेखर भोसले - मुलुंड पश्चिम येथील शिवसेना शाखा क्र १०७ मध्ये शाखाप्रमुख चंद्रकांत शेलार यांच्या वतीने श्री गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ५ दिवसांसाठी श्री गणेशाच्या आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना दि २२ ऑगस्ट रोजी येथे करण्यात आली आहे. यंदाचे हे दुसरे वर्ष असून या गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी शाखा क्र १०७ च्या महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. 
   दि २३ ऑगस्ट रोजी येथे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अनेक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. मुलुंडच्या अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी यावेळी भेट घेवून श्री गणेशाचे दर्शन घेतले व सत्यनारायण महापुजेचा प्रसाद घेतला. 

भांडुपसह पूर्व उपनगरात दिड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन निर्विघ्न पार..



भांडुप / शेखर भोसले - भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग व पवईसह पालिकेच्या एस वार्डात दीड दिवसाच्या बाप्पाचे अत्यंत शिष्ठबद्ध पद्धतीने व शांतपणे विसर्जन पार पडले असून, एस वार्डातील भाविकांनी साश्रुनयनांनी आपल्या लाडक्या बाप्पाला यावेळी निरोप दिला. प्रत्येक विसर्जन स्थळी कडेकोट बंदोबस्तात व कोणत्याही प्रकारे गर्दी न करता गणपती विसर्जन करण्यात आले. पालिकेने बनवलेल्या कृत्रिम तलावात विसर्जन करून तसेच संकलन केंद्रात मूर्ती देवून व दारी आलेल्या महापालिकेचे वाहनात गणेश मूर्ती ठेवून  गणेश भक्तांनी भरभरून प्रतिसाद देत पालिकेला सहकार्य केल्याचे पाहण्यात आले.
      दरवर्षी दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जना दरम्यान विसर्जनस्थळी तुडुंब गर्दी करत गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत असत, परंतु यंदा कोरोनाचं  संकट असताना प्रशासनाच्या वतीने योजलेली नियमावली पाळत आज मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गणेश भक्तांनी गर्दी टाळत लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
      एस विभागात एकून २९५५ गणेश मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले असून त्यापैकी ४४ सार्वजनिक तर २९११ घरगुती मुर्त्यांचा समावेश होता. येथील १७ तलावांपैकी कृत्रिम तलावात सार्वजनिक १०४७ तर घरगुती ३६ अशा एकूण १०८३ मूर्त्यांचे विसर्जन तसेच, नैसर्गिक तलावात १८६४ घरगुती तर, ८ सार्वजनिक मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले.
   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने कडक निर्बंध लावले असून विसर्जन स्थळी गर्दी होवू नये यासाठी विभागनिहाय कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती.  पालिके तर्फे उपलब्ध करण्यात आलेली वाहने विभागनुसार फिरत बाप्पांच्या मुर्ती घेत थेट तलावात विसर्जन करत होते. भाविकांनी आपल्या गणेश मूर्ती पालिका कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देत प्रशासनाला उत्तम प्रतिसाद दिल्याने पालिका तसेच मुंबई पोलिसांनी भक्तांचे आभार मानले आहे.

तक्ता: 

घरगुती- २९११

सार्वजनिक- ४४

प्रभागनिहाय माहिती: 

प्रभाग१०९: ५१

प्रभाग ११०: ५९

प्रभाग१११: निरंक

प्रभाग ११२: ४६

प्रभाग ११३: २३

प्रभाग ११४: ७७

प्रभाग ११५: २९

प्रभाग ११६: ९७

प्रभाग ११७: १५८

प्रभाग ११८: दोन तलावांमध्ये अनुक्रमे, २१४ व १५५

प्रभाग ११९: ६८

प्रभाग १२०: निरंक

प्रभाग १२१: ४८

प्रभाग १२२: ५९

प्रसिद्ध अभिनेते, साहित्यिक, कवी आणि पत्रकार यांच्या उपस्थितीत आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार सोहळा संपन्न..!

मुंबई-दादर (प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर)  आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार वितरण सो...