आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ३० ऑगस्ट, २०२०

युवक प्रतिष्ठानच्या कार्यालयाच्या आवारात अस्वच्छता तसेच तळीरामांचा वावर



मुलुंड /शेखर भोसले - मुलुंड पूर्व-पश्चिम वाहन उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या माजी खासदार डॉ किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानच्या कार्यालयाच्या आवारात अस्वछतेचे साम्राज्य पसरलेले असून येथील मोकळ्या जागेत दारूच्या रिकाम्या बाटल्या, सिगारेटची थोटके व इतर कचरा मोठया प्रमाणात पडला असल्याचे आढळून आले आहे. युवक प्रतिष्ठानच्या या कार्यालयाच्या आवाराचा दरवाजा सतत उघडाच असल्याने तसेच कार्यालयाच्या सभोवतालची सुरक्षा भिंत देखील दुरावस्थेत असल्याने या आवाराचा वापर गर्दुल्ले व तळीराम आपल्या व्यसनाची तळप भागविण्यासाठी तर काही समाजकंटक इतर गैरकृत्य करण्यासाठी करत आहेत असे आढळून आले आहे. 
    मुलुंडमधील सामाजिक कार्यकर्ते शूलभ जैन यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, मुलुंडमधील  वाहन उड्डाण पुलाच्या खाली असलेल्या युवक प्रतिष्ठानच्या कार्यालयाच्या आवारात सर्वत्र दारूच्या रिकाम्या बाटल्या, कपडे व इतर कचरा पडलेला असून काही समाजकंटक, गर्दुल्ले, दारुडे या जागेचा वापर गैरकृत्यासाठी करीत आहेत. या कार्यालयाच्या देखभालीकडे कोणीही लक्ष देत नसल्यामुळे येथे सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. येथे सुरक्षा रक्षक नसल्यामुळे तसेच या कार्यालयाच्या आवाराचा दरवाजा सतत खुला असल्यामुळे काही दिवसांपूर्वी येथे एक अज्ञात मृतदेह आढळून आला आहे. पाठीमागच्या बाजूने देखील भिंत नसल्यामुळे गर्दुल्ले, तळीराम तसेच समाजकंटकांचा वावर येथे वाढला असून दारू पिण्यासाठी व इतर गैरकृत्य करण्यासाठी सर्रास या आवाराचा वापर केला जात आहे. खासदार किरीट सोमय्या व त्यांचे नगरसेवक सुपुत्र नील सोमय्या कोणीही येथे फिरकत नाही आहेत. त्यामुळे युवक प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱयांनी आणि प्रशासनाने वेळीच लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अन्यथा भविष्यात येथे मोठा अनर्थ घडू शकतो, अशी भीती शूलभ जैन व काही जागरूक नागरिकांनी व्यक्त करण्यात आली आहे.
     युवक प्रतिष्ठानच्या समाजोपयोगी कार्यासाठी दिलेल्या या जागेची योग्यरीत्या देखभाल केली जात नसेल तसेच दारुडे व समाजकंटक जर या आवारात गैरकृत्य करत असतील तर प्रशासनाने ही जागा ताब्यात घ्यावी व परिसर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवावा, अशी मागणी यानिमित्ताने मुलुंड परिसरात जोर धरत आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...