आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ३० ऑगस्ट, २०२०

गणेशोत्सवाच्या सहाव्या दिवशी मुलुंडमध्ये शांततेत गौरी, गणपतींचे विसर्जन


मुलुंड /शेखर भोसले - दि २७ ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाच्या ६ व्या दिवशी मुलुंड पूर्व व पश्चिम मधील एकूण ६ तलावात मिळून १३४५ घरगुती गणपती विसर्जन झाले तर २२ सार्वजनिक गणरायांचे विसर्जन झाले तसेच २०३ गौरींचे विसर्जन झाले. प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत भाविकांनी अत्यंत शांततेत श्री गणरायांचे व गौरींचे विसर्जन केले.  
     मुंबई महानगर पालिका व मुलुंड पोलिसांनी केलेल्या चोख व्यवस्थेमुळे गौरी-गणपतीला घेवून विसर्जनासाठी येणार्या भाविकांचे कोणत्याही अडथळ्याशिवाय तसेच गर्दीचा सामना न करता थोड्याच वेळात विसर्जनाचे सोपस्कार पार होत होते. घरातूनच श्री गणेशाची शेवटची आरती करून आल्यामुळे विसर्जन स्थळी गर्दी होत नव्हती. पोलिसांचा उत्तम बदोबस्तामुळे परिस्थिती सर्वत्र नियंत्रणात होती. 
       मुलुंड पश्चिम येथील कालिदास नाट्यगृहाजवळील कृत्रिम तलावात ८८ घरगुती, ६ सार्वजनिक, १२ गौरींचे विसर्जन झाले. जकात नाक्याजवळील कृत्रिम तलावात ५५ घरगुती, २ सार्वजनिक, ३ गौरींचे विसर्जन झाले. स्वप्ननगरीतील कृत्रिम तलावात २२० घरगुती, ३ सार्वजनिक, १५ गौरींचे विसर्जन झाले. मुलुंड पूर्व येथील वामनराव शाळेच्या बाजूला बनविण्यात आलेल्या कृत्रिम तलावात १२९ घरगुती, ० सार्वजनिक, ३० गौरींचे विसर्जन झाले. पूर्व द्रुतगती महामार्गावरील मोरया तलावात ५७९ घरगुती, ९ सार्वजनिक, ९० गौरींचे विसर्जन झाले. मिठागर रोड येथील गणेश घाटावरील तलावात २७४ घरगुती, २ सार्वजनिक, ५३ गौरींचे विसर्जन झाले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...