आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

अशोक नगर येथे एका युवकावर प्राणघातक हल्ला

मुलुंड : शेखर भोसले 
       मुलुंडमध्ये एका तरुणावर पूर्ववैमनस्यातून जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोघा भावांना मुलुंड पोलिसांनी बेडया ठोकल्या असून हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाला पोलिसांनी रुग्णालयात दाखल करून घेतले आहे. जखमी युवकाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. पोलिसांनी वेळीच दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे या तरुणाचा जीव वाचला असून मुलुंड पोलिस याबाबतीत अधिक तपास करीत आहेत.
      पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २१ ऑगस्ट रोजी रात्री १२ च्या सुमारास मुलुंड पश्चिमेकडील अशोक नगर परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय सुरज कसबे याला लकी दोंदे नामक युवकाने घराबाहेर बोलावून घेतले. तो घराबाहेर येताच त्याला हमिदिया मजिदीजवळ नेण्यात आले. तेथे उभ्या असलेल्या लकीचा भाऊ चिकूने व लकीने सुरज सोबत असलेला जुना वाद उकरून काढून भांडण चालू केले. या भांडणात त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. लकी आणि चिकू या दोघांनी मिळून सुरजच्या डोक्यावर आणि छातीवर जोरदार प्रहार केले. दरम्यान सुरजने त्यांच्या तावडीतून सुटून त्याच्या नातेवाईकांचे घर गाठले व नातेवाईकांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. रक्तबंबाळ झालेल्या सूरजला पाहून नातेवाईक देखील घाबरून गेले. इतक्यात रात्री गस्त घालणारी पोलिसांची वायरलेस वॅन तेथील रस्त्यावरून जात असता एका महिलेने त्यांना हात दाखवून थांबवले व एका तरुणाला मारहाण झाली असल्याचे सांगितले. पोलिसांनी सुरज जवळ पोहचून त्याला वॅनमधून अग्रवाल रुग्णालयात नेवून दाखल करून घेण्यात आले. सुरजने दिलेल्या जबाबावरून लकी दोंदे आणि चिकू दोंदे या दोघा भावांना अटक करण्यात आली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...