आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

भांडुपसह पूर्व उपनगरात दिड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन निर्विघ्न पार..



भांडुप / शेखर भोसले - भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग व पवईसह पालिकेच्या एस वार्डात दीड दिवसाच्या बाप्पाचे अत्यंत शिष्ठबद्ध पद्धतीने व शांतपणे विसर्जन पार पडले असून, एस वार्डातील भाविकांनी साश्रुनयनांनी आपल्या लाडक्या बाप्पाला यावेळी निरोप दिला. प्रत्येक विसर्जन स्थळी कडेकोट बंदोबस्तात व कोणत्याही प्रकारे गर्दी न करता गणपती विसर्जन करण्यात आले. पालिकेने बनवलेल्या कृत्रिम तलावात विसर्जन करून तसेच संकलन केंद्रात मूर्ती देवून व दारी आलेल्या महापालिकेचे वाहनात गणेश मूर्ती ठेवून  गणेश भक्तांनी भरभरून प्रतिसाद देत पालिकेला सहकार्य केल्याचे पाहण्यात आले.
      दरवर्षी दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जना दरम्यान विसर्जनस्थळी तुडुंब गर्दी करत गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत असत, परंतु यंदा कोरोनाचं  संकट असताना प्रशासनाच्या वतीने योजलेली नियमावली पाळत आज मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गणेश भक्तांनी गर्दी टाळत लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
      एस विभागात एकून २९५५ गणेश मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले असून त्यापैकी ४४ सार्वजनिक तर २९११ घरगुती मुर्त्यांचा समावेश होता. येथील १७ तलावांपैकी कृत्रिम तलावात सार्वजनिक १०४७ तर घरगुती ३६ अशा एकूण १०८३ मूर्त्यांचे विसर्जन तसेच, नैसर्गिक तलावात १८६४ घरगुती तर, ८ सार्वजनिक मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले.
   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने कडक निर्बंध लावले असून विसर्जन स्थळी गर्दी होवू नये यासाठी विभागनिहाय कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती.  पालिके तर्फे उपलब्ध करण्यात आलेली वाहने विभागनुसार फिरत बाप्पांच्या मुर्ती घेत थेट तलावात विसर्जन करत होते. भाविकांनी आपल्या गणेश मूर्ती पालिका कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देत प्रशासनाला उत्तम प्रतिसाद दिल्याने पालिका तसेच मुंबई पोलिसांनी भक्तांचे आभार मानले आहे.

तक्ता: 

घरगुती- २९११

सार्वजनिक- ४४

प्रभागनिहाय माहिती: 

प्रभाग१०९: ५१

प्रभाग ११०: ५९

प्रभाग१११: निरंक

प्रभाग ११२: ४६

प्रभाग ११३: २३

प्रभाग ११४: ७७

प्रभाग ११५: २९

प्रभाग ११६: ९७

प्रभाग ११७: १५८

प्रभाग ११८: दोन तलावांमध्ये अनुक्रमे, २१४ व १५५

प्रभाग ११९: ६८

प्रभाग १२०: निरंक

प्रभाग १२१: ४८

प्रभाग १२२: ५९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...