आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

दीड दिवसांच्या गणपतीचे मुलुंडमध्ये शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन

 मुलुंड /शेखर भोसले - मुलुंड पूर्वच्या नगरसेविका रजनी केणी यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्र. १०५ मध्ये गणपती विसर्जना साठी वामनराव शाळेच्या बाजूला, स्वामी समर्थ उद्यानासमोरील मोकळ्या जागेत बनविण्यात आलेल्या ८ फूट रुंद, १५ फूट लांबी आणि ८ फूट खोल कृत्रिम तलावात दीड दिवसाच्या २०३ घरगुती गणपतीच्या मूर्तींचे तर ३ सार्वजनिक गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन रविवार दि २३ ऑगस्ट रोजी करण्यात आले. दुपारी २ वाजल्यापासून येथे दीड दिवसाच्या श्री गणेशाच्या मुर्तींचे विसर्जनासाठी आगमन सुरु झाले ते रात्री ११ वाजेपर्यंत चालू होते. 
   मुलुंडच्या पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या सरदार तारासिंग मोरया तलावात ६७४ घरगुती गणपतीचे तर १८ सार्वजनिक गणपतीचे विसर्जन करण्यात आले तर मिठागरच्या गणेश घाट येथील विसर्जन तलावात ३३७ घरगुती गणपतीचे आणि ३ सार्वजनिक गणपतीचे विसर्जन करण्यात आले. शासनाने काढलेल्या आदेशानुसार घरातच श्री गणेशाची विसर्जनापूर्वीची आरती करून आल्याने विसर्जन स्थळी भक्तांची गर्दी कमी होती. गणेशाची मूर्ती टेबलावर ठेवल्यावर हापालिकेचे कर्मचारी लगेचच या मूर्त्यांना उचलून तलावात विसर्जन करत होते. 



    आमदार मिहीर कोटेचा, नगरसेवक प्रभाकर शिंदे, नगरसेविका रजनी केणी, माजी नगरसेवक नंदकुमार वैती यांनी सर्व विसर्जन तलावाच्या ठिकाणी व संकलन केंद्रांना भेट देवून चोख व्यवस्था असल्याची व विसर्जन सुरळीत होत आहे याचे निरीक्षण केले. कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर विसर्जनास्थळी भक्तांनी गर्दी टाळल्याने व दीड दिवसांच्या गणपतीचे शिस्तबद्ध पद्धतीने व शांतपणे विसर्जन झाल्याने महापालिकेच्या टी वॉर्डच्या प्रशासनाने व मुलुंड नवघर पोलिस स्टेशनचे व.पो.नि. पुष्कराज सूर्यवंशी यांनी मुलुंडकरांचे यानिमित्ताने आभार मानले आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आंगवली -रेवाळे वाडी भावकिचा भैरी भवानीचा गोंधळ थाटामाटात संपन्न

कोकण (शांताराम गुडेकर )रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसर...