आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२०

शिवसेना मुलुंड विधानसभेच्या सदस्यता अभियानाला सुरुवात



मुलुंड /शेखर भोसले - शिवसेना प्राथमिक सदस्य अभियानास मुंलुंङ विधानसभा मतदारसंघात सोमवार दिनांक २४ ऑगस्ट पासून सुरुवात करण्यात आली. मुलुंड विभागातील शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकाऱयांना याबाबतची माहिती देण्यासाठी मुलुंड पूर्व येथील दत्तात्रय अनेक्स इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात एक सभा २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४ वाजता आयोजिण्यात आली होती. ईशान्य मुंबईचे विभागप्रमुख, आमदार रमेश कोरगावकर व महिला संघटिका संध्या वढावकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सभेत मुलुंड मधील शिवसेनेचे अनेक आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. मंचावर मुलुंड विधानसभा संघटक नितीन सावंत हे देखील उपस्थित होते. 
       उपस्थितांना शिवसेनेचे उपविभागप्रमुख दिनेश जाधव, सुनिल गारे, महेंद्र वैती यांनी सुरुवातीला मार्गदर्शन केले. तर आपल्या उत्तम वक्तृत्वशैलीने उपस्थित प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे मुलुंड विधानसभा कार्यालय प्रमुख सीताराम खांडेकर यांनी प्रभावीपणे सभेचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक करून शिवसैनिकांना या सदस्य नोंदणी अभियानाची विस्तृत कल्पना दिली. विभाग संघटिका संध्या वढावकर यांनी मार्गदर्शन करून महिलांना जास्तीत जास्त संख्येने सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन केले तर विभागप्रमुख, आमदार रमेश कोरगावकर यांनी आपल्या भाषणात मुलुंड विधानसभेने कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याचा उल्लेख करून सर्वांचे कौतुक केले व मुलुंड विधानसभेतील प्रत्येक शाखेमार्फत कमीत कमी ५००० सदस्य नोंदवण्याची जबाबदारी प्रत्येक शाखाप्रमुखांना दिली. 
         यावेळी विभागप्रमुखांच्या उपस्थितीत उपविभाग प्रमुख महेंद्र वैती व शाखाप्रमुख अमोल संसारे यांचे सदस्य नोंदणी अर्ज भरून या सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...