आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

मिठागर कोविड सेंटर मध्ये रुग्णांना मिळते निकृष्ट दर्जाचे जेवण

मुलुंड/ शेखर भोसले -मुलुंड पूर्व, मिठागर रोड येथील महापालिका शाळेत असलेल्या कोविड उपचार केंद्रातील रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याची तक्रार पालिकेत दाखल करण्यात आली आहे. जेवण पुरवणारा ठेकेदार रुग्णांना अर्धवट शिजलेले अन्न देत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर तसेच सोशल मीडियावरून हा प्रकार व्हायरल झाल्याने पालिकेने या ठेकेदाराला नोटीस पाठवून समज दिली आहे. 
    अर्धवट शिजलेले अन्न मिळत असल्याने मिठागर कोविड सेंटरमधील अनेक रुग्णांना उपाशीपोटी राहावे लागत असल्याने रुग्णांनी व रुग्णांच्या नातेवाईकांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार केली असून सोशल मीडियावर याबाबतचे फोटो व्हायरल देखील केल्याने हा प्रकार उघडकीस आला असून त्यामुळे पालिकेविरोधात अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. पालिकेने या प्रकरणी तातडीने लक्ष घालून जेवण पुरविणाऱ्या ठेकेदाराला इशारा देवून यापुढे काळजी घेण्यास सांगितले आहे. 
    याबाबत अधिक माहिती देताना टी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांनी सांगितले की, 'ठेकेदारासोबत बैठक घेवून याबाबत त्याला वॉर्निंग देण्यात आली असून दुसऱयांदा अशी तक्रार आल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा ठेकेदाराला देण्यात आला आहे. यापुढे रुग्णांना चागले जेवण मिळेल याकडे आमचे लक्ष असेल'. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...