आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२०

ऑप्टिकल फायबर केबल प्रकल्प अंदमान निकोबारसाठी वरदान

         चेन्नई ते अंदमान निकोबार द्वीपसमूहाला  वेगवान डिजिटल कनेक्टिव्हिटीने जोडणारा ऑप्टिकल फायबर केबल कनेक्टिव्हिटी प्रकल्प  आता कार्यन्वित झाला आहे. समुद्रात खोल पाण्यातुन जवळपास २३०० किलोमीटर ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम दीड वर्षांपासून सुरू होते. खवळलेला समुद्र, उसळणाऱ्या लाटा, सतत पडणारा पाऊस यावर मात करुन हा प्रकल्प पूर्ण करण्यात शास्त्रज्ञ- तंत्रज्ञांनी यश मिळवले. हा प्रकल्प अंदमान निकोबार द्वीपसमूहासाठी वरदान ठरणार आहे. या प्रकल्पामुळे अंदमान निकोबार द्वीपसमूहाला वेगवान इंटरनेट व मोबाईलची सेवा मिळणार आहे. भारताच्या समुद्री वर्चस्वासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे. येथून अनेक गोष्टींवर नियंत्रण ठेवणे भारताला शक्य होणार आहे. विशेष म्हणजे या द्वीपसमूहाजवळ इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार हे देश आहेत. दक्षिण आशिआई देशांशी व्यापारी आणि इतर प्रकारच्या सहकार्यासाठी सतत संपर्कात राहण्याच्या दृष्टीने ही बेटे खूप महत्वाची मानली जातात. विशेष म्हणजे अनेक देशांची जहाजे बंगालचा उपसागर व अंदमान निकोबारचा समुद्र या चॅनलचा वापर करतात. सध्या भारताने या बेटांवर  महाकाय तरंगत्या जेटी, तरंगते विमानतळ तसेच जहाज दुरुस्तीच्या सुविधा निर्माण करण्याचा सपाटा लावला  आहे. त्यामुळे भविष्यात अंदमान निकोबारला व्यापाराच्या दृष्टीनेही मोठे महत्व प्राप्त होणार आहे. अंदमान निकोबार द्वीपसमूहांतर्गत ५७२ बेटे आहेत. पैकी ३८ बेटांवर मानवी वस्ती आहे. या बेटांवर सुमारे ४ लाख आदिवासी लोक वास्तव्य करतात. या प्रकल्पामुळे या बेटांवरील हे आदिवासी मुख्य प्रवाहात येऊ शकतात. तसेच या प्रकल्पामुळे  उर्वरित भारताशी या बेटांचा दळणवळणाचा वेग आणखी वाढणार आहे. अंदमान निकोबार द्वीपसमूह हा पर्यटकांच्या दृष्टीने मोठी संधी असलेला प्रदेश आहे. सध्याच्या मर्यादित सुविधांमध्येही या बेटांवर देशविदेशातील हजारो पर्यटक जात असतात या प्रकल्पामुळे या द्वीपसमूहावरील परदेशी पर्यटकांची संख्या आणखी वाढणार आहे. व्यापार, पर्यटन, मत्स्यशेती, संरक्षण यांच्या विकासाला देखील या प्रकल्पामुळे चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे  अंदमान निकोबार द्वीपसमूह भारताच्या व्यापारी आणि समुद्री सामर्थ्याचे मुख्य केंद्र बनणार आहे. 

-श्याम बसप्पा ठाणेदार
 दौंड, जिल्हा पुणे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...