आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२०

ड्रॅगनला वेळीच वेसण घालावे


गेल्या तीन महिन्यांपासून चालू असलेला चिनी तणाव निवळण्याची चिन्हे दिसत नाही आहेत.म्हणूनच, सीमा सुरक्षा दलाचे तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्याचे काम जोरात चालू आहे.यात बीएसएफ च्या १९२३ सीमा चौक्या सेन्सर, सीसीटीव्ही,ड्रोन इत्यादींनी सज्ज करण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे.दोन्ही शेजारील राष्ट्रे ही शत्रू राष्ट्रे असल्यामुळे या पुढे अधिक सतर्कता बाळगावीच लागणार आहे.भारतीय लष्कराला चीनच्या कुरापतीला सडेतोड उत्तर देण्याचे आदेश आहेतच.त्याच बरोबर लष्करीपातळीवर चर्चा सुद्धा चालु आहेत.परंतु,मागील इतिहास पाहता चीन हा खूप घातक बेभरवशाचा शत्रू आहे.आणि म्हणूनच एप्रिल- मे महिन्यात जी स्थिती होती तशी स्थिती ठेवण्यास चिनी ड्रॅगन तयार नाही आहे. तसेच,चीनने फिंगर-५ ते फिंगर-८ भागात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केलेले आहे.दोन्ही देशात १९९३ आणि १९९६ मध्ये झालेल्या करारानुसार या भागात बांधकाम करता येत नाही पण,चिनी ड्रॅगन कराराचे उल्लंघन करून या फिंगर भागात बांधकाम करीत आहे.सर्व पातळीवर जरी चीनला रोखण्याचे प्रयत्न चालू असले तरी,सतर्कता आणि मुत्सद्दीपणा दाखवून आगीचे फुत्कार फेकणाऱ्या आणि भारतीय भूभाग बळकावनाऱ्या चिनी ड्रॅगनला वेळीच वेसण घातले पाहिजे.

-दत्तप्रसाद शिरोडकर
मुलुंड. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...