आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

गौराई आली घरा..


       गणपती पुजा व आगमन हे सर्व प्रांतात थोड्याफार फरकाने सारखेच असते. परंतु गौरीचे आगमन हे तसे नसते. त्या येतातच मुळात लेकुरवाळया माहेरवाशीणी म्हणून .. गौरी आगमन अगदी वाजत गाजत होते. कुमारिका गौरीचे आगमन करते आणि संपूर्ण घरात त्यांना फिरवून मग चौरंगावर गौरी स्थापन करतात. विधीवत पूजा करून प्राणप्रतिष्ठा करतात. या दिवशी सासरी गेलेल्या लेकुरवाळया माहेरवाशीणी घरी येतात तसेच गोड पदार्थ नैवेद्य अर्पण करतात. दुसरा दिवस फार महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी नव्या नवरीला तिच्या माहेराहून सौभाग्यलेणी , साडी - चोळी अन् गोड पदार्थ भरलेले सूप तिची आई देते . त्याला ' ओवसा ' असे म्हणतात. हा ओवसा त्या दिवशी गौरीसमोर पुजला जातो. गौरी साधारणपणे तेरडयाच्या रोपांच्या असतात. त्यांनाच आघाडा, शेवंती , मोगरा अशा अनेक फुलांनी सजवले जाते. अलंकारांनी सुशोभित केले जाते. आगरी - कोळी समाज खास पध्दतीचा नैवेद्य दाखवतात. त्या दिवशी गोड वडे, चिंबोरी चाट ( खेकडे ) रस्सा व तांदळाची भाकरी असा नैवेद्य असतो. प्रत्येकाच्या घरी नैवेद्यासाठी विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. रात्री घरातील सर्व स्त्रीयां  गौरीपुढे जागरण करतात. पारंपरिक नृत्य, खेळ खेळून, गाणी म्हणत ही रात्र जागवली जाते. तिसऱ्या दिवशी प्रथेनुसार गौरीचे विसर्जन होते. गौरी जशा वाजत गाजत येतात तशाच वाजत गाजतच जातात. अशी ही गौरी आपल्यासोबत येताना सुख -  शांती - समाधान घेऊन येते व जातांना भरभरून आशीर्वाद देत हसऱ्या चेहऱ्याने, मुखाने आपल्या घरी परतते.. 


       गौरी साठी गाणं...

     सरव गेला नि भादवा उगवला
     आता रं देवा , देवा दि मना रजा
      तुझ्या माहेराची काय तुला गोरी 
       रं काय काय तुला गौरी...
           गौराई चालली माहेरी 
            गौराई चालली माहेरी
             जाती तशी जाऊ द्या
              गळ्यातलं मंगळसूत्र लेऊ द्या...

          
- सौ. स्नेहा मुकुंद शिंपी
  नाशिक 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...