मुलुंड /शेखर भोसले -मुलुंड पोलिसांनी काल सर्वोदय नगर मधील एका रूमवर धाड टाकून तीन पत्ते जुगार खेळणाऱ्या व्यक्तींना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल केलेल्या ७ आरोपींपैकी एक आरोपी हा तडीपार असताना कोणतीही परवानगी न घेता सदर ठिकाणी प्राणघातक हत्यार (तलवार) सह मिळून आला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस शिपाई सचिन चव्हाण (क्र. ०९०३२९) या सरकारी फिर्यादीनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार बुधवार दि २६ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजून ५ मिनिटाच्या सुमारास रूम क्र 11 च्या वरील रूम, रामचंद्र पाटील चाळ, गांधी नगर, सर्वोदय नगर, मुलुंड पश्चिम येथून आरोपी वनिता ठाकूर उर्फ झरीना, जयश्री घुमे, राकेश माळकर, विकास त्रिभुवन, गणेश बजंत्री, राकेश मागडे हे पैसे लावून तीन पत्ते नावाचा जुगार खेळताना मिळून आल्याने तक्रार नोंद करण्यात आली आहे. यांच्यावर मुलुंड पोलीस ठाणे गुन्हा रजि. न. ५७६/२०२० कलम १८८, २६९ भा.द.वि. सह कलम ५१ बी आ.व्या.का सह कलम १४२ मपोका सह कलम ४, २५ भा.ह.का. सह कलम ४अ, ५ जुगार प्रतिबंध कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांच्याकडून रू. १,४५,६००/- एवढी रोख रक्कम, ५२ पत्ते असलेले कॅट आणि लोखंडी तलवार, इत्यादी मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील आरोपी गणेश बजंत्री हा तडीपार असतानाही कोणतीही परवानगी न घेता सदर ठिकाणी प्राणघातक हत्यार (तलवार) सह मिळून आला. तसेच अमित पवार या आरोपीवर देखील गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष कांबळे व प्रभारी पो.नि.रमेश ढसाळ हे तपास अधिकारी अधिकचा तपास करत असल्याचे समजले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा