आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ३० ऑगस्ट, २०२०

बुंध्यात मातीऐवजी सिमेंट मिश्रित खडी टाकल्याने झाडांच्या वाढीला अडथळे

मुलुंड /शेखर भोसले -मुलुंड पूर्व येथील टाटा कॉलनीतील पदपथालगत पालिकेतर्फे लावण्यात आलेल्या झाडांच्या बुंध्यात मातीऐवजी सिमेंटमिश्रित खडी, रेती टाकण्यात आल्याने झाडांच्या वाढीला अडथळे निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून लवकरच ही झाडे सुकण्याची शक्यता निर्माण झाली आहेत. तसेच झाडांच्या चारही बाजूने बांधण्यात येत असलेला चौथरा देखील न बांधण्यात आल्याने वाहनचालक या झाडांना चिटकून गाडी लावत आहेत त्यामुळे एकंदरीत या  झाडांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 
     यासंदर्भात अधिक माहिती देताना येथील सामाजिक कार्यकर्ते साहेबराव घोलप यांनी सांगितले की,  पालिकेने लावलेल्या झाडांच्या बुंध्यात सिमेंटमिश्रित खडी व माती टाकण्यात आली असल्याने परिसरातील नागरिक व तरुण वर्ग संतापला आहे. अश्या प्रकारे सिमेंटमिश्रित खडी टाकल्याने झाडांची वाढ़ न होता झाड सुकून मरून जाईल. तसेच झाडांच्या बाजूने चौथरा बांधून झाडांना सुरक्षितता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. पालिकेच्या उद्यान विभागाने सदर प्रश्नी ताबडतोब लक्ष घालून बुंध्यातील खडी काढून टाकावी व झाडांच्या वाढी व सुरक्षेसाठी आवश्यक ती पाऊले उचलावीत, अशी मागणी साहेबराव घोलप यांनी केली आहे.  
      पालिकेच्या उद्यान विभागात यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता तेथे कोणीही उपलब्ध नव्हते. तसेच तेथील वरिष्ठ अधिकाऱयांना फोन केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही परंतु रस्त्याच्या कडेने लावलेल्या झाडांच्या देखभालीकडे पालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱयांचे दुर्लक्षच असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...