आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २९ जुलै, २०२१

वरळीकडे जाणा-या बसचा मार्ग बदलावा : करिरोड चिंचपोळी ब्रिज ऐवजी करीरोड ब्रिज वरून बसेस नेण्याची नागरिकांची मागणी

मुंबई : डिलाईल रोड येथील ना. म. जोशी मार्ग पोलीस स्टेशन बस स्थानक असून तेथे वरळीला जाणा-या बस क्र.४४,५०, ५७, १६६ साठी थांबा आहे. परंतु त्या मार्गाने वरळी ची एकही बस जात नाही. परिणामी प्रवासी मात्र बस थांब्या वर लिहिल्या प्रमाणे तासन तास बस साठी वाट पहात असतात. शेवटी कंटाळून जातात.
        बस क्र. ५०, ४४, ५७, १६६ या बसेस चा मार्ग लालबाग, भारतमाता, करिरोड , ना म जोशी मार्ग, आर्थर रोड, सात रस्ता, महालक्ष्मी स्टेशन मार्गे वरळी असा आहे. परंतु बस चालक मार्ग बदलून चिंचपोकळी स्टेशन- आर्थर रोड नाका मार्गे वरळी साठी बसेस नेतात. 
      लालबाग, भारतमाता, करी रोड, डिलाईल रोड परिसरातील नागरिकांना याचा फारच त्रास सहन करावा लागत आहे.
        बेस्ट प्रशासनाने याची दखल घेऊन  वरळी येथे जाणा-या बसेस दिलेल्या मार्गानेच न्याव्यात असे आदेश पारित करून बस प्रवाश्याना दिलासा द्यावा .अशी विभागातील नागरिकांची मागणी आहे.

ऑनलाईन भजन/अभंग गायन स्पर्धेत आबीटगांवची ईश्वरी भागडे प्रथम !

मुंबई :  (दिपक कारकर)- कोव्हिड-१९ सारख्या भीषण महामारीने असंख्य कलाकारांना घरी बसवले.महाराष्ट्रातील विविध लोककला जवळजवळ दोन वर्षे व्हायला आली तरी या कलेचं प्रत्येक्षपणे सादरीकरण नाट्यगृह किंवा अन्य खुल्या रंगमंचावर पाहता आलेच नाही.यातून वेगळा मार्ग शोधत कलाकारांच्या कलाकृतीला त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं कार्य अनेक मंडळे/कलामंच/ संस्था मार्फत कोव्हिड-१९ च्या काळातही पहायला मिळाले.
      नुकतीच आषाढी एकादशी संपन्न झाली या निमित्ताने ध्रुव सिने मॅजिक्स प्रस्तुत ऑनलाईन भजन/अभंग गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेच्या नियमअटी नुसार व्हिडीओ करून स्पर्धा संयोजकांना पाठवणे.यातून अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.स्पर्धेचा निकाल जाहीर झाला.या स्पर्धेत सहभागी होणारी चिपळूण तालुक्यातील आबीटगांवची सुकन्या कु.ईश्वरी संजय भागडे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला.
      ईश्वरी भागडे हि नमन कलेतील गायक/संगीतकार म्हणून प्रसिद्ध असणारे संजय ( बावा ) भागडे यांची कन्या होय.ईश्वरी शिवाजी उर्फ बाबासाहेब सुर्वे माध्यमिक विद्यालय,निवळी या विद्यालयात  इयत्ता ८ वी.मध्ये शिक्षण घेतेय. वडिलांकडून गायनाचे धडे गिरवणाऱ्या ईश्वरीला लहानपणीच गायनाची आवड आहे.ईश्वरीच्या या यशाचे अनेकांकडून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

राज्याचे मुंखमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डोंबिवलीत दिव्यांगाची नोंदणी आणि घरेलू कामगार महिलांची नोंदणी सुरू

आ.वा वृत्तसेवा, डोंबिवली - महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्व समान्यापर्यंत पोचवण्याच्या उद्देशाने महिला घरेलु कामगार संघटना आणि दिव्यांग संघटनेची स्थापना शिवसेनेत करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेच्यावतीने घरेलु कामगार आणि दिव्यांगांची नोंदणी करण्यात आली

यावेळी शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, राजेश कदम, संघटनेचे डोंबिवलीच्या अध्यक्षा स्वाती हिरवे, डोंबिवली पूर्व महिला संघटक मंगला सुळे, ग्रामीण महिला संघटक कविता गावंड, कार्यालयीन प्रमुख सतीश मोडक, विवेक खामकर इत्यादी पदाधिकारी, शिवसैनिक आणि शेकडो घरेलु कामगार आणि दिव्यांग उपस्थित होते.
  राजेश मोरे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपस्थित घरेलु कामगार आणि दिव्यांग यांना मार्गदर्शन केले. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसेना शाखा मदत करेल असे सांगितले व घरेलू कामगार महिला संघटना व दिव्यांग संघटना स्थापन करण्यात आली तसेच या उपक्रमात दीडशे घरेलु कामगार व दिव्यानगांची नोंदणी केली असुन गुरुवारी देखील शाखेतून नोंदणी  केली जाईल असे मध्यवर्ती शाखेच्या वतीने सांगण्यात आले.

जि प शाळा वायरलेसफाटा येथे घरोघरी शाळा उपक्रम सुरू ; घरातच तयार झाल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शाळा

आदर्श वार्ताहर वृत्तसेवा,पुणे :कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावीपणे सुरू राहण्यासाठी जि. प. प्राथ. शाळा वायरलेस फाटा तालुका दौंड येथील उपक्रमशील मुख्याध्यापिका सौ. मनिषा विश्वनाथ शिंदे यांनी राबवलेल्या घरोघरी शाळा या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद प्राथ शाळा वायरलेसफाटा ची विधार्थिनी कु श्रेया शरद जाधव(इ १ली) हिच्या घरी( बारव वस्ती वायरलेस फाटा) येथे दौंड पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी मा. श्री. नवनाथ वणवे यांच्या शुभहस्ते तसेच शिक्षण विस्ताराधिकारी(पुणे जि प) मा श्री गोरक्षनाथ हिंगणे, बेटवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख मा श्री शिवाजी गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले.

सदर उद्घाटन कार्यक्रमासाठी विद्यार्थिनी च्या घरासमोर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती तसेच फुग्यांची सजावट करण्यात आली होती. मान्यवरांचे स्वागत कु श्रेया हिने गुलाबपुष्प देऊन व औक्षण करून केले. घरातील शाळेचे उद्घाटन ग शि अ मा श्री वणवे यांनी रिबिन कापून केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवीन गार शाळेचे मुख्याधापक श्री बबन शेलार यांनी केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनिषा शिंदे यांनी उपस्थितांना उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. ऑनलाईन शिक्षणात येणाऱ्या विविध अडचणींवर मात करून शिक्षणाची ज्ञानगंगा सर्व विद्यार्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थाच्या घरी स्वतंत्र शाळा निर्माण करून प्रत्येक विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याचा मोफत संच दिला. जि प शाळा वडगाव ता माण जि सातारा येथील शिक्षक श्री संजय लक्ष्मण खरात यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या घरोघरी शाळा
   उपक्रमामुळे विधार्थी अव्याहतपणे शिक्षण घेऊ शकतो. पालक व in प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमास श्री कुंभार व श्री पठण विषय साधन व्यक्ती BRC दौंड, केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, गोपाळवाडी केंद्रातील उपशिक्षिका सौ दरेकर व सौ मेमाणे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संजय साबळे इ. मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी सौ शिंदे मॅडम व श्री कुलांगे सर यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. वायरलेसफाटा शाळेचे उपशिक्षक श्री अमोल कुलांगे यांनी आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला.

बुधवार, २८ जुलै, २०२१

‘शासनाच्या सर्व विभागांनी रिक्त पदांचा प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत एमपीएससी’कडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश : ‘एमपीएसएसी’च्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा

आ.वा वृत्तसेवा,मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून दिनांक ४ मे २०२१ आणि दिनांक २४ जून २०२१ च्या शासन निर्णयातून सूट देण्यात यावी. ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. ही रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक १५ ऑगस्टपर्यंत ‘एमपीएससी’कडे संबंधित विभागांनी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. 
   मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती सभागृहात राज्य शासनातील एमपीएससीकडील पदांच्या भरतीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 
    बैठकीला सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक, लेखा व कोषागार विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबईच्या सचिव स्वाती म्हसे-पाटील आदी उपस्थित होते. 
‘  'कोरोना’च्या संकटामुळे केवळ सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील पदांच्या भरतीला मंजूरी देण्यात आली आहे. दिनांक ४ मे २०२१ आणि दिनांक २४ जून २०२१ च्या शासननिर्णयानुसार राज्यातील इतर विभागातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला निर्बंध लावण्यात आले होते. मात्र विशेष बाब म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनातील विविध विभागांतील रिक्त असणाऱ्या पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदासह उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून दिनांक ४ मे २०२१ आणि दिनांक २४ जून २०२१ च्या शासन निर्णयातून सूट देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन राज्यातील कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.ही रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक १५ ऑगस्टपर्यंत संबंधित विभागांनी ‘एमपीएससी’कडे रिक्तपदांचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्यामुळे ‘एमपीएससी’ ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्ह्यातील पूरबाधित सार्वजनिक क्षेत्रातील कचरा व ढिगारे उचलण्यासाठी व मदत छावण्यांकरिता एकूण 2 कोटी रुपयांच्या निधीस शासनाची मंजूरी

आ.वा वृत्तसेवा,रायगड :-  जुलै, 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील 7 जिल्हयांमध्ये पूर परिस्थिती उद्भवली आहे. या पूर परिस्थितीमुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करून त्यांच्यासाठी मदत छावण्या सुरू करणे व त्यांना अन्न, पाणी, वैद्यकीय सुविधा देणे आवश्यक आहे. तसेच पूरस्थिती आटोक्यात आल्यानंतर व पूराचे पाणी ओसरल्यानंतर रोगराई पसरू नये म्हणून सार्वजनिक ठिकाणचा कचरा हटविणे, मृतदेहांची विल्हेवाट लावणे, पूरग्रस्त क्षेत्रातून पाण्याचा निचरा करणे, याकरिता विभागीय आयुक्तांमार्फत संबंधित जिल्हयांना आगाऊ स्वरुपात निधी वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
        याबाबींकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून एकूण रुपये सहा कोटी पन्नास लक्ष इतका निधी विभागीय आयुक्त, कोकण व पुणे यांच्यामार्फत संबंधित जिल्हयांना आगाऊ स्वरूपात वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात आली आहे.
         रायगड जिल्ह्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील जमा झालेला कचरा व ढिगारे उचलण्यासाठी व मदत छावण्यांकरिता प्रत्येकी रुपये 1 कोटी असे एकूण 2 कोटी रुपयांच्या निधीस मंजूरी देण्यात आली आहे, असे शासनाच्या दि.23 जुलै 2021 च्या शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
         हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यांचा सांकेतांक क्रमांक 202107231833243319 हा आहे.

अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या कुटुंबांना प्रति कुटुंब 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ ;5 लिटर केरोसीन तसेच 5 किलो तूरडाळ शासन देणार मोफत

आ.वा वृत्तसेवा, रायगड :- राज्यात माहे जुलै,2021 मध्ये विशेषत : दि.22 व 23 जुलै, 2021 रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक कुटुंबे बाधीत झाली आहेत. अशा बाधीत कुटुंबांना आपत्तकालीन परिस्थितीमध्ये किमान उदरनिर्वाहाचे साधन म्हणून राज्य शासनातर्फे अन्नधान्य (गहू व तांदूळ), केरोसीन व तूरडाळ उपलब्ध करुन देण्याचा  निर्णय घेण्यात आला आहे.  
           रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यांमधील माहे जुलै, 2021 मध्ये विशेषतः दि. 22 व 23 जुलै, 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या कुटुंबांना प्रति कुटुंब 10 किलो गहू व 10 किलो तांदूळ (बाधीत कुटुंबाकडून मागणी झाल्यास तांदळाचे प्रमाण वाढवून एकूण 20 किलो अन्नधान्य) व 5 लिटर केरोसीन तसेच 5 किलो तूरडाळ मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
          शासन निर्णयानुसार बाधीत कुटुंबांची संख्या / यादी जिल्ह्यातील संबंधित जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी उपलब्ध करुन द्यावी. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्हा स्तरावरील शासकीय गोदामामध्ये इतर योजनांमधील शिल्लक असलेल्या अन्नधान्यामधून तात्काळ वाटप सुरु करावे. अन्नधान्याच्या आवश्यकतेबाबतचे एकूण परिमाण त्यांनी शासनास कळविल्यानंतर या परिमाणाएवढया अन्नधान्याची मागणी MSP / MSP DERIVED RATE ने केंद्र शासनाकडे करण्यात येईल व त्याकरिता आवश्यक असलेला निधी वित्त विभागाकडून उपलब्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांना उपलब्ध करुन दिला जाईल, असे कळविण्यात आले आहे.
           बाधीत कुटुंबांसाठी आवश्यक असलेले केरोसीन जिल्हाधिकारी यांना तात्काळ मोफत उपलब्ध करुन देण्याबाबत BPCL, IOC व HPCL या ऑईल कंपन्यांना शासन स्तरावरुन कळविण्यत यावे. याकरिता आवश्यक असलेला निधी वित्त विभागाकडून उपलब्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांना उपलब्ध करुन दिला जाईल.
          बाधीत कुटुंबांसाठी आवश्यक असलेली तूरडाळ संबंधित जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील घाऊक बाजारातून खरेदी करुन त्याचे प्रति कुटुंब 5 किलो या परिमाणात तात्काळ वाटप सुरु करावे. या तूरडाळीसाठी आवश्यक असलेला निधी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या आपत्ती निवारण निधी मधून उपलब्ध करुन घ्यावा. किती परिमाणात तूरडाळ खरेदी करण्यात आली, या बाबतची आकडेवारी जिल्हाधिकारी यांनी शासनास कळविल्यानंतर या तूरडाळीकरिता खर्च करण्यात आलेल्या रक्कमेएवढा निधी वित्त विभागाकडून उपलब्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांना उपलब्ध करुन दिला जाईल.
          अन्नधान्य, डाळी व केरोसीन यांचे वाटप झाल्यानंतर किती परिमाणात वाटप करण्यात आले व त्या करिता किती खर्च झाला ही आकडेवारी सर्व जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर या बाबींसाठी आवश्यक असलेला निधी वित्त विभागाने तात्काळ उपलब्ध करुन द्यावा, असेही शासन निर्णयाद्वारे सूचित करण्यात आले आहे.
           हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्रमांक 202107261141426106 हा आहे.

महाड शहरात जिल्हा प्रशासनाकडून रोग निदान शिबिर, औषधोपचार ; तसेच कोविड-19 अँटिजेन टेस्टची मोफत सुविधा

आ.वा वृत्तसेवा, महाड :- महाड शहरातील सर्व नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वरोग निदान शिबीर, औषधोपचार तसेच कोविड-19 च्या अँटीजेन टेस्ट  सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
       अतिवृष्टीमुळे महाड शहरात आलेल्या पुरामुळे सर्वत्र अस्वच्छता व दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे साथरोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी दि.27 जुलै 2021 पासून जिल्हा प्रशासनाकडून महाड शहरात सर्व प्रकारचे रोग निदान शिबिर, औषधोपचार तसेच कोविड-19 च्या अँटीजेन टेस्ट  सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच प्रशासनातर्फे 2 फिरते दवाखानेही महाड शहरामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.   हे दवाखाने सकाळी 11.00 ते संध्याकाळी 7.00 या वेळेत 1) महाड नगर परिषद, नवीन इमारत, तळमजला. 2) काजळपूरा समाज मंदिर. 3) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, चवदार तळे. 4) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी सुरू राहतील.
          तरी नागरिकांनी या वैद्यकीय सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
00

रायगड जिल्ह्यात आदिम जमातीचे बहुउद्देशीय संकुल उभारणीची प्रक्रिया प्रगतीपथावर ;मौजे जांभूळपाडा येथील बहुउद्देशीय संकुलाच्या प्राथमिक प्रारुप आराखड्यास शासनाची मान्यता-पालकमंत्री कु. आदिती तटकरे

आ.वा वृत्तसेवा,अलिबाग:  जिल्ह्यातील सुधागड-पाली तालुक्यातील मौजे जांभूळपाडा येथे आदिम जमाती (PVTG) (कातकरी) यांच्याकरिता बहुद्देशीय संकुल उभारण्यासाठी शासनाची मान्यता प्राप्त आहे. याबाबत उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांच्याकडे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री महोदयांनी 2021 च्या अर्थसंकल्पात रायगड जिल्ह्यातील आदिम जमातीसाठी बहुउद्देशीय संकुल उभारण्याची घोषणा केली होती. 
               राज्य शासनाची मान्यताप्राप्त असलेल्या या बहुउद्देशीय संकुलासाठी मौजे जांभूळपाडा, ता. सुधागड येथील सुमारे 50 एकर शासकीय जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार आदिवासी विकास विभागाने या बहुउद्देशीय संकुलाच्या प्राथमिक प्रारुप आराखड्यास तत्वत: मान्यता प्रदान केली आहे. या आराखड्यानुसार 1 हजार विद्यार्थ्यांसाठी  निवासी शाळा 1 ली ते 12 वी, 500 मुलांच्या राहण्याची  क्षमता असलेले वसतिगृह, 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय, 200 खाटांचे  बहुउद्देशीय रुग्णालय, 500 लोकांच्या क्षमतेचे सभागृह, तंत्रशिक्षण- कौशल्य विकास, 1 हजार मे.टन क्षमतेचे साठवणूक गोदाम, 200 कर्मचारी निवासस्थाने, शेती व शेळीपालनासाठी कृषी कौशल्य विकास केंद्र, वनधन प्रक्रिया केंद्र, बागबगीचा- खेळ मैदाने, संरक्षक भिंत, पाणीपुरवठा, विद्युतीकरण, सोलार संयंत्रे, मलनि:स्सारण केंद्र, वाहनतळ, संकुलासाठी अंतर्गत रस्ते व इतर सुविधांसह आदिवासी  निर्मित वस्तूंचे प्रदर्शन केंद्र आदी विविध सुविधांचा समावेश यामध्ये आहे.
       रायगड जिल्ह्यातील  कातकरी या आदिम जमातीमधील सुमारे 37 हजारांहून अधिक कुटुंबांचा विकास यामुळे होणार आहे. केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल मंत्रालयाच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाच्या मान्यतेसाठी हा आराखडा पाठविण्यात येणार आहे. त्यानुसार मौजे जांभूळपाडा येथील शासकीय जागा आदिवासी विकास विभागास हस्तांतरीत करण्यात येणार आहे. या बहुउद्देशीय संकुलाच्या उभारणीसाठी अनुकूल असलेली शासकीय जागा पर्यावरण मंत्रालयाची मान्यता मिळाल्यावर आदिवासी विकास विभागास हस्तांतरीत करुन या संकुल उभारणीची प्रक्रिया विभागामार्फत सुरू करण्यात येईल.
                 रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध असून सातत्यपूर्ण प्रयत्नांतून या बहुउद्देशीय संकुलाच्या उभारणीची कार्यवाही प्रगतीशिल आहे, असे मत पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी व्यक्त केले.
0000000

रायगड जिल्ह्यातील महाड येथे एनडीआरएफ बेसकॅम्पसाठी : शासकीय जागा देण्यास दुग्धव्यवसाय विभागाची मान्यता - पालकमंत्री कु.आदिती सुनील तटकरे

आ.वा वृत्तसेवा, महाड :- रायगड जिल्ह्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचे वाढते प्रमाण पाहता महाड येथे एनडीआरएफचे बचावपथक कायमस्वरुपी असावे, अशी मागणी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील महाड येथे एनडीआरएफ बेसकॅम्पसाठी आवश्यक सुमारे 5 एकर क्षेत्र असलेली शासकीय जागा दुग्धव्यवसाय विभागाने देण्याबाबत सहमती दिली आहे. याबाबत आज (दि.28 जुलै ) रोजी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित झाल्याची माहिती पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी माध्यमांना दिली.
              कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग हे 3 जिल्हे आपत्कालीन परिस्थितीमध्ये अतिसंवेदनशील आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे दि.22 जुलै 2021 रोजी आलेल्या महापूरामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत बचाव व मदतकार्यासाठी  राष्ट्रीय आपत्ती दल हे मध्यवर्ती स्थळी कायमस्वरुपी तैनात असणे गरजेचे आहे. यासाठी पालकमंत्री कु.तटकरे यांनी एनडीआरएफ बेसकॅम्पसाठी आवश्यक शासकीय जागा मिळावी, यासाठी दुग्धव्यवसाय मंत्री श्री. सुनील केदार यांच्याकडून केलेल्या मागणीप्रमाणे आयुक्त, दुग्धव्यवसाय कार्यालयाने सहमती दिल्याबाबत आज शासन निर्णय झाला.
               या शासन निर्णयानुसार महाड कार्यक्षेत्रातील दूध संकलनासाठी असलेल्या सर्व्हे क्र. 72-हिस्सा क्र. 02/06,7,8 तसेच सर्व्हे क्र. 74 अ-हिस्सा क्र. 1 ब व 1 क अशी एकूण 2.57.46 हेक्टर क्षेत्र एनडीआरएफ बेसकॅम्प कायमस्वरुपी करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
                रायगड जिल्ह्यासह कोकणातील रत्नागिरी व सिंधुदूर्ग या जिल्ह्यांनादेखील आपत्ती काळात तातडीच्या बचाव व मदतकार्यास महाड येथे होणाऱ्या बेसकॅम्पमुळे उपयोग होणार आहे. वातावरणीय बदल, चक्रीवादळे, होणे, दरड कोसळणे, अतिवृष्टीमुळे होणारी पूरपरिस्थिती, भू-सख्खलन आदी परिस्थितीत दुर्देवी घटनांमध्ये जीवितहानी टाळण्यासाठी हे एनडीआरएफ पथक लाभदायी ठरेल, असा विश्वास पालकमंत्री कु.तटकरे यांनी व्यक्त केला आहे. तसेच हा बेस कॅम्प स्थापित होण्याच्या दृष्टीने केलेल्या सहकार्याबद्दल दुग्धव्यवसाय विकास विभागाचे मंत्री श्री. सुनील केदार यांचे आभार मानले आहेत.
0

उमेदच्या महिलांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात : "उमेद" च्या महिलांनी जागविली पूरग्रस्तांची जगण्याची अन् लढण्याची "उमेद"

आ.वा वृत्तसेवा,अलिबाग- जिल्ह्यातील महाड पोलादपूर मध्ये दि.22 जुलै रोजी झालेल्या महापूरात महाड पोलादपूरवासियांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.  अनेक घरात चिखल साचला, अन्नधान्य वाहून गेले तर काही ठिकाणी भिजून खराब झाले.  
      या सर्व परिस्थितीत आपल्या भगिनींसोबत उभे राहून त्यांना मदतीचा हात देऊन पुन्हा उभे करण्याची उमेद, उमेद अभियानातील महिलांनी दाखविली आहे. याच महिलांनी पूरग्रस्तांच्या मनात जगण्याची अन् लढण्याची उमेद जागविली आहे.
      जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान-उमेदच्या जिल्हा व तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून अनेक स्वयंसहायता समूहामधील महिला सदस्यांनी मदत एकत्रित केली.यामध्ये तांदूळ,गहू, नाचणी,  तेल,  मसाला, हळद, मीठ, खाद्यपदार्थ, पीठे आदी वाण सामानासहीत नवीन व काही जुने कपडे,  साड्या, टाॅवेल, साबण, फिनेल, सॅनेटरी नॅपकीन, पाणी बाॅटल, सतरंजी, बिस्किटे, औषधे असे किट तयार करण्यात आले. 
      त्याचप्रमाणे रिलायन्स फाऊंडेशन च्या वतीने देण्यात आलेल्या मास्क चे वाटपही यावेळी करण्यात आले.
      यामध्ये सुधागड 103 किट,  पनवेल 306 किट,  रोहा 512 किट, मुरुड 57 किट,  पेण 184 किट, खालापूर 97 किट, अलिबाग 43 किट, उरण 86 किट अशा प्रकारे तालुक्यातील महिलांनी जमा केलेल्या साहित्यातून किट तयार करण्यात आले आहेत.
      रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, प्रकल्प संचालक रणधीर सोमवंशी , जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश राऊळ व प्रत्येक तालुक्यातील गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मदत गोळा करुन वाटप करण्यात आली. 
       महाड तालुक्यातील लाडीवली, बिरवाडी कुंभारवाडा, भोराव गाव, कौल, कौल बौद्धवाडी, कीजलघर , कोंडिवते कोंड, शिरगाव बौद्ध वाडी, महाड शहर या गावांमध्ये तर पोलादपूर तालुक्यातील माटवण साखर, साखर आदिवासी वाडी , केवनाले,  गोपाळवाडी ,लोहारमाळ येथील दरडग्रस्त गावामध्ये  या किटचे वाटप करण्यात आले. 
     या उपक्रमाकरिता जिल्हा व तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसहीत गावातील समुदाय संसाधन व्यक्ती , ग्राम संघ आणि स्वयंसहायता समूहामधील सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच स्थानिक युवा कार्यकर्त्यांनीही योगदान दिले.

बदलापूरमध्ये दादाज् फाऊंडेशनची स्थापना

आदर्श वार्ताहर वृत्तसेवा,बदलापूर 
बदलापूरमधील सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, सार्वजनिक आरोग्य, व्यावसायिक तसेच शैक्षणिक यांसारख्या विविध क्षेत्रात मदत आणि सामाजिक हिताच्या दृष्टीने सर्व स्तरातील विद्यार्थी, नवयुवक, नागरिक, कलाकार तसेच व्यावसायिक यांना सहाय्य, विकास आणि मार्गदर्शन मिळावे यादृष्टीने बदलापूरमध्ये दादाज् फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष श्री जयवंत दळवी यांच्या संकल्पनेतून बदलापूरमधील विविध सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील सदस्यांकडून या फाऊंडेशनची स्थापना करण्यासाठी नियोजन बैठक दि.२१ जुलै रोजी घेण्यात आली. या फाऊंडेशन मार्फत बदलापूरमधील विविध क्षेत्रातील होतकरू लोकांना सहाय्य, मार्गदर्शन, मदत करण्यासंदर्भात चर्चा झाली. समाजातील दानशूर आणि सामाजिक जाणिवेचे भान असलेल्या लोकांकडून तसेच संस्थेच्या आर्थिक कोषातून तळागाळातील सर्वसामान्य लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी या फाऊंडेशनमार्फत कार्य केले जाणार असल्याचे अध्यक्ष जयवंत दळवी यांनी सांगितले. 
सदर बैठकीत कार्यकारिणी मंडळाची निवड करण्यात आली. त्यानुसार जयवंत दळवी- अध्यक्ष, श्री गुरुनाथ तिरपणकर- उपाध्यक्ष, श्री राजेंद्र नरसाळे- सचिव, श्री दीपक सोनी- सहसचिव, डॉ. अमितकुमार गोईलकर-खजिनदार आणि प्रवक्ते, श्री. संभाजी पाटील- सह खजिनदार, डॉ. निता पाटील- कार्याध्यक्ष, श्री. प्रवीण तोरस्कर- विशेष सहाय्यक, सौ. कीर्ती नरसाळे- महिला सदस्य, तेजस्विनी माळवी- महिला सदस्य याप्रमाणे पदनियुक्ती देवून कार्यभार सोपवण्यात आला. येत्या पंधरा दिवसांत एक शैक्षणिक उपक्रम हाती घेतला असून तो यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि सदस्य तसेच कार्यकर्ते यांनी काम सुरू केले आहे.
ज्या सुजाण नागरिकांना सामाजिक कार्यात सहभाग म्हणून या फाऊंडेशनचे सक्रिय कार्यकर्ते होण्याची इच्छा असेल त्यांनी अध्यक्ष जयवंत दळवी यांना  99608 23983 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन फाऊंडेशन तर्फे करण्यात आले आहे.

कोकण पुरग्रस्तांसाठी वैद्यकीय मदतीसाठी औषध साठ्यासाह डॉक्टरांचे पथक रवाना

आदर्श वार्ताहर वृत्तसेवा, ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा शहर आणि ग्रामीणचे विशेष वैद्यकीय पथक आज सकाळी ७ वाजता कल्याण येथून महाड आणि चिपळूण येथे रवाना झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार, राष्ट्रवादी वेल्फेयर ट्रस्ट मार्फत तसेच महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष आणि विधानरिषद आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉक्टर सेल राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे आणि डॉ. अनिल पाटील (कल्याण डोंबिवली- जिल्हा अध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली सदर पथक कार्यरत होईल. या पथकात कल्याण डोंबिवली मधून 21 डॉक्टरांनी सहभाग घेतला असून बदलापूर मधून डॉ. पंकज पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डॉक्टर सेल ग्रामीणचे जिल्हा सरचिटणीस डॉ. अमितकुमार गोईलकर हे या पथकात सहभागी आहेत. कोकणात महाड आणि चिपळूण येथील पूरस्थिती भयंकर होती. पुरानंतर रोगराई पसरण्याचा व सार्वजनिक आरोग्य बाधित होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी राष्ट्रवादी पार्टी कडून या वैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आले आहे. पुढील दोन दिवस हे पथक पूरग्रस्त स्थानिक कोकण वासियांची आरोग्य तपासणी, औषधोपचार करेल. सौम्य आजारी रुग्णांना ओषधोपचार आणि गंभीर आजारी रुग्णांना सरकारी रुग्णालयात भरती केले जाणार आहे. ऑल इंडिया केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोशिएशन तर्फे अध्यक्ष, आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांचेकडून औषधांचा साठा पूरवण्यात आला आहे. आमदार आप्पा शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून सदर पथक मार्गस्थ झाले.

परोपकारीवृत्ती जोपासणारं खंबीर कोकण..!

'कोकण म्हणजे स्वर्गच जणू' हे वाक्य कोकणाला भेट  दिलेल्या प्रत्येकाच्या तोंडी सहज येऊन जातं.अर्थात ते सुख,ते वातावरण इथे आपसूक नांदतंय. हे जरी खरं असलं तरी गेली अनेक  नैसर्गिक संकटे पाहता इथल्या यातना नरकयातनांहून भयानक आहेत. चक्रीवादळ, धरणफुटी, पावसाचं तांडव अशा कैक संकटांनी शिकस्त करून इथलं साम्राज्य बेचिराख करण्याचा प्रयत्न केला. पण हिंमत हारेल तो कोकणकर कसला.? धीरोदात्तपणे तोंड देत प्रत्येक संकटाला नामोहरम करण्याचं बळ इथल्या मातीने ज्याला-त्याला दिलंय. अशावेळी सगळ्यात पहिल्यांदा जागृत होते ते इथल्या मातीने शिकवेलेली परोपकारीवृत्ती.
   संकट कोणतंही असो, वेळेस घरच्यांच्याही अगोदर तिथे शेजारी हजर असतो. भावकीत-गावकीत भले कितीही कट्टर वाद असोत; वेळेला सगळं बाजूला ठेवून कामी येणं, हे इथल्या संस्कृतीतलं मूल्य असावं. आजवर शासनाच्या अनेक योजना आल्या, GR निघाले, विकास कार्यक्रम आखले गेले. काही वाडीवस्तीवर पोचल्याही. तर काही अवघड वळणात, उभ्या घाटीत तर काही श्रेयवादाच्या गर्दीत मुक्कामी राहिल्या. परंतू या सगळ्याचा इथल्या मुरलेल्या माणसाने कधी बाऊ केला नाही किंवा त्याच्या जगण्याला कधी फरक पडला नाही. एखाद्या वाडीत कोणी शिक-खोक पडला तर जवळपास उपायाचा काहीच आसरा नसतो. प्राथमिक आरोग्य केंद्र कित्येक किलोमीटरवर असतात. समजा एखादं वाहन उपलब्ध झालंच तरी ते घरापर्यंत जाणार कसं.? इथे काहीठिकाणी धड चालायला वाट नाही तर रस्ता दूरच. अशावेळी रडत न बसता इथला समजदार माणूस पुढाकार घेऊन आपली ताकद पणाला लावतो. मग स्वातंत्र्यानंतरच्या इतक्या वर्षांनंतरही डोलीसारखे पर्यायच आपले वाटतात. हे झालं एक उदाहरण. एखादी दुःखद घटना घडल्यास पुढील जबाबदारी ही त्या अख्ख्या वाडीवर अवलंबून असते. प्रसंगातल्या माणसाला धीर देणं म्हणजे काय.? ते इथल्या 'त्या' वातावरणाने शिकवावं. पुढील किमान आठेक दिवस अख्खी वाडी दुःखी कुटुंबाला सांभाळत असते. काय म्हणावं या जबाबदार वृत्तीला.?
    गेल्यावर्षी चक्रीवादळाने कंबरडे मोडून टाकले, यंदाही तेच. कुणाच्यातरी बेजबाबदारपणामुळे धरण फुटतं, अख्खा गाव उध्वस्त होतो. सरकारी यंत्रणा सतर्क होतात, मदतकार्य सुरू होतंही. परंतू सतर्कता ही दुर्घटनेच्या अगोदर हवी ना.? ज्यामुळे अशी वेळच येऊ नये. आत्ता महाप्रलय आलाय. चिपळूण कित्येक दिवस समुद्रात असल्यागत होतं, महाडला एक अख्खं गाव नावालाही उरलं नाही. तिथली अवस्था पाहून काळीज सुन्न होतं. मेंदूला मुंग्या आल्यागत झिणझिण्या येतात. मरण ज्याला त्याला येणारच हे सत्य असलं तरी  का स्वीकारावं असलं मरण या लोकांनी.? काय पहावं मागे उरलेल्या घरच्यांनी, कसं सावरावं नातेवाईकांनी.? 
     इथे पुन्हा एकदा जागी होते इथल्या मातीतली परोपकाराची शिकवण. काल-परवा घडलेल्या दुर्घटनेत जो जमेल त्यापरीने मदतीला धावतोय. ज्याला शक्य आहे तो घटनास्थळी पोचलाय, कुणी तिथे रात्रंदिवस अंगमेहनत घेतोय. ज्याला ह्यातलं जमत नाहीये तो पदरमोड करून रुपयातले आठाणे का होईना, पण पुढे करतोय. काहीजण जाणीव ओळखत पुढाकार घेऊन मदतीसाठी इतरांकडे हात पुढे करतायत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदतीचे हात पुढे येतायत. हे कुणासाठी चाललंय.? काय फायदा ह्यातून ह्या बापड्या पोरांचा.? ह्यातून एकच सिद्ध होतं, त्यांना आतली तळमळ शांत बसू देत नाही जी इथल्या मातीने रुजवलीय. जी कधीच थंड बसू देणार नाही. आज ह्यात विशेषतः तरुणाई पुढे आहे. दंडवत करून पाय धरावेशे वाटतात ह्या कालच्या पोरांचे. मुंबईतली, परदेशातली परंतू इथल्याच मातीतली असणारी Well Educated मुलं. अनेक चांगल्या पदावर असणारी ही तरुणाई जेव्हा स्फूर्तीने पेटून उठते. ऑफिसातल्या थंडगार AC मध्येही जेव्हा त्याला इथल्या वेदनांचे चटके बसतात तेव्हा त्यांच्यातली ही वृत्ती आपसूकच बाहेर येते. सोशल मीडियाचा वापर केवळ मनोरंजन, स्वतःचे फोटो आणि स्टेटस ठेवण्यापुरता नसून पध्दतशीरपणे ह्या कार्यातही कसा करावा, हे ही मंडळी शिकवून जातेय. परिस्थिती आटोक्यात येतेय, थोडयाच दिवसांत इथे काही खरंच घडलं होतं का.? हेही कळणार नाही इतकं सारं सुरळीत होणार आहे. अशावेळी इथल्या सरसावलेल्या हातांना कधीच विसरता येणार नाही; किंबहुना इथली परोपकारी भावना कधीच दुर्लक्षित करता येणार नाही..
      मीडियावर दिसणारे अनेक व्हिडीओ,फोटो पाहून आपल्याला तिथल्या भावना बोचतात. अनेकदा मदतगारांवर फोटोबद्दल टीकाही होताना दिसते. निव्वळ शोबाजी करणाऱ्यांना खडसावलंच पाहिजे, परंतू जो आपल्या घासातला एखादा घास तिथे पोचवत असेल आणि त्यात एखादा फोटो काढून इतरांना मदतीसाठी प्रोत्साहित करत असल्यास काय हरकत आहे.? अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपलं नियोजित कार्य सुरू ठेवणं हेच उत्तम. आणि निव्वळ घरी बसून किंवा ह्यातला काहीच भाग न बनता निव्वळ असल्या टीकाटिप्पणी करणाऱ्यांना असा मुळी हक्कच उरत नसतो.
कोकणातल्या राजकारणाबद्दल खरंतर बोलण्याची ही वेळ नव्हे; आपण नंतर ह्यावर सविस्तर बोलूच. तरीही ह्या सगळ्याची जबाबदारी ज्यांच्याकडे असते त्यांचा ह्यात रोल काय.? ह्यातही काहीजण आपली पुढची सीट पक्की करण्यासाठी धावताना दिसले, काहीजण पक्षश्रेष्ठींच्या नजरेत येण्यासाठी सरसावले, तर काहीजण निश्चितपणे प्रामाणिकपणे आपली जबाबदारी म्हणून तिथे तळ ठोकून राहिले. परंतू ह्यातून एक निष्पन्न होतंच की, अशा घटना घडू नयेत म्हणून ज्या यंत्रणा आहेत, ज्या गोष्टी विकासात्मक दृष्टीने Upgrade व्हायला हव्यात जेणेकरून असे धोके टाळता येतील त्या होतच नाहीत. मग ह्या सगळ्याचा उपयोग नक्की कोणासाठी होतोय.? एकतर तुमचा ह्यावर वचक नाही, तुमचे ह्यात साटेलोटे असू शकतात किंवा तुमच्यावर जबाबदारी सोपवून आम्ही चूक केलीय असंच म्हणता येईल. मी कोणत्याच राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नसल्याने हे कोणत्या एकाच पक्षाला उद्देशून नसून सर्वच पक्षांनी ह्याचा विचार करावा हेच सांगणं आहे. आणि दरवर्षी जर असंच घडणार असेल तर मग ही सगळी नाटकं बंद करा आणि प्रत्येकवेळेस आमच्या पोरांनीच जर ही जबाबदारी घ्यायची असेल तर तुमची दुकानं बंद करा. इथली जनता, इथली शिकवण आणि इथल्या जनमाणसात भिनलेली जाणीव समर्थ आहे ह्या सगळ्यासाठी.
सरतेशेवटी निसर्गाला, राजकीय मंडळींना आणि कोकणाकडे विनाशी नजरेने पाहणाऱ्या वृतींना हात जोडून एकच विंनती आहे. तुम्ही भले इथलं सगळं धुवून न्या; परंतू इथली परोपकारी शिकवण देणारी आमची माती तेवढी शिल्लक ठेवा. इथून पुढच्या पिढीकडे हा वारसा संक्रमित होण्यासाठी..!

 ✒️ रामचंद्र तुकाराम जांगळी
 भ्रमणध्वनी - ९९२०९४४६७८

राष्ट्रीय बहुजन बहुभाषी ड्रामा अँड फिल्म युनियन तर्फे मोफत नाट्य-अभिनय ऑनलाईन शिबिराला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

मुंबई  (दिपक कारकर)- उपरोक्त युनियन तर्फे नुकताच दिनांक २५ जुलै २०२१ रोजी मोफत नाट्य-अभिनय शिबीर घेण्यात आले. युनियनचे कार्याध्यक्ष डॉ.राजु वाघमारे(नेता,प्रवक्ता, महाराष्ट्र काँग्रेस) आणि अध्यक्ष सन्मान चंदनशिवे तसेच युनियनची पुर्ण टीम सरचिटणीस राजेंद्र कदम,खजिनदार हरेश तांबे,उपाध्यक्ष हरीश कदम,चिटणीस राहुल हाटे ,उपखजिनदार नितीन शिंदे,मुख्य सल्लागार ललित बोराडे,अनिकेत राणे, संजय मांडवकर, स्वानंद कारखानीस, समीर रॉय, उपेंद्र पवार यांनी कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश लाड सर यांनी केले.कार्यक्रमाला सहभागी कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कोरोना काळात या कार्यक्रमामुळे नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळाले.

मुर्तवडे येथील "एका लग्नाची अभिमानास्पद गोष्ट" !रूढी परंपरांचे बंधन तोडत विधवा वहिनीशी दिराने बांधली लग्न गाठ !

चिपळूण :  (  दिपक कारकर )- भूतलावरील प्रत्येक व्यक्तीच्या जीवन प्रवासात आठवणीत राहणारा यादगार क्षण आणि सोहळा म्हणजे लग्न होय.लग्न म्हणजे जीवनाचा एक महत्वाचा टप्पाच होय.आपला शुभ-विवाह होण्यापूर्वी पासूनच प्रत्येकजण हा सोहळा थाटामाटात कसा करायचा याचं पूर्वनियोजन अगोदरच करत असतो.लग्न म्हटलं की अमाप खर्च आला.मात्र एक नवा आदर्श समाजासमोर निर्माण करण्यासाठी चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे ( देणवाडी ) येथील भूमिपुत्र सतीश शांताराम तांबडकर यांच्या धाडसी आणि क्रांतिकारी निर्णयाने पुढे आला आहे.नव विवाहित सतीश तांबडकर यांचा मोठा बंधू स्व.सुरेश तांबडकर पंचक्रोशीत "पांड्या" नावाने परिचित होता.काही वर्षांपूर्वी त्यांचा दुचाकी अपघातात निधन झाले.या क्षणी त्यांचा नुकताच विवाह होऊन एक वर्षे झालं होतं आणि महिना ही पूर्ण न झालेलं गोंडस बाळ त्यांच्या पदरी होत.पण काळाने घात केला आणि कुटुंबातील कर्ताकरविता सुरेश निघून जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. गुहागर तालुक्यातील आबलोली शहरात सुरेश पोठोग्राफीचा व्यवसाय करत असे.आपला नवरा सोडून गेल्याने त्यांच्या पत्नीने आजवर त्या बाळाचं संगोपन करत त्याच घरी आपला जीवन प्रवास सुरु ठेवला.आता सुरेश यांचा लहान बंधू लग्न करण्यासाठी सज्ज होताना त्यांच्या मनी विचार आला की,आपण लग्न करताना एखादी दुसरी मुलगी घरी आणण, त्यापेक्षा ज्या वहिनीने इतके दिवस आमचा सांभाळ केला तिला सोबतच लग्न गाठ बांधून तिच्या आयुष्यात आनंद देण्याचा निर्णय घेतला.या निर्णयाला अगदी घरच्यांनी पाठींबा देत,समाज काय बोलेल याकडे दुर्लक्ष करत नव्या संसाराची सुरुवात स्वतःच्या वहिनी सोबत केली.नुकताच त्यांचा शुभ-विवाह दि.२२ जुलै २०२१ रोजी सावर्डे येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे पार पडला.माझ्या जीवनात मी माझी वहिनी माझी पत्नी म्हणून तिचा स्वीकार करताना मी उचललेले हे पाऊल सार्थकी करेन.दादा-वहिनीच्या बाळाला मोठं करून आमच्या आयुष्यात आम्ही सदा सुखी राहून आयुष्य जगत राहू.अतिशय काळाची गरज असणारा हा त्यांचा निर्णय कौतुकास्पद ठरत आहे.अनेकांकडून सतीश यांच्या या धाडसी निर्णयाचे अभिनंदनासह कौतुक होत आहे.

महिला उत्कर्ष समितीच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी मा. ज्योती गायकवाड यांची निवड

आदर्श वार्ताहर वृत्तसेवा,पुणे
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या पुणे विभागाची मीटिंग डॉ. अशोक म्हात्रे यांच्या उपस्थितीत महिला समिती सचिव माननीय निशा जाधव यांच्या घरी  संपन्न झाली.
     यावेळी उपस्थितांना समितीच्या कार्याबद्दल ची माहिती देण्यात आली व भविष्यातील कार्यक्रमाबाबत चर्चा होऊन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. राम जाधव यांच्या सूचनेनुसार पुणे जिल्हा अध्यक्षपदी माननीय ज्योती गायकवाड यांची  सर्वानुमते निवड करण्यात आली.  
     यावेळी  पुणे शहराध्यक्ष मा.  गणेश कांबळे , सदस्य मा. आनंद गडपोळ, सुमित टुंगलाईट , मा. विजय वावधने, महिला उत्कर्ष समिती पुणे शहर अध्यक्ष माननीय योगिता टुंगगलाईट उपाध्यक्ष माननीय मालती कांबळे, सहसचिव माननीय हर्षदा गडपोळ,  सदस्य पूजा फिरके उपस्थीत होत्या.
यानंतर सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. उंडे यांची सदिच्छा भेट घेण्यात आली तसेच समितीच्या कार्याची माहिती देवून समितीच्या सदस्यांना दक्षता कमिटी वर घेण्याबाबत चर्चा झाली व त्यास ताबडतोब मान्यता मिळाली.
     यावेळी बोलताना मा. ज्योती गायकवाड यांनी कार्यक्षेत्रातील महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराबाबत आवाज उठवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करणार असल्याचे  व महिला उत्कर्ष समितीचे कार्य तळागाळातील महिलांपर्यंत पोहचवनार असल्याचे सांगितले.

रविवार, २५ जुलै, २०२१

स्थलांतराचे आव्हान

मुंबईत रविवारी चेंबूर,विक्रोळी व ठाणे येथील दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकूण ३२ जणांना जीव गमवावा लागल्यानंतर मुंबई व ठाणे परिसरातील डोंगरावर राहणारे नागरिक व अतिधोकादायक इमारतीमध्ये राहणारी कुटुंब यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी महानगरपालिका धोकादायक इमारतींची यादी जाहीर करते व रहिवाशांना इमारत खाली करण्याची नोटीस बजविते.काही कुटुंबांचे संक्रमण शिबिरात स्थलांतर करते,पण असे असले तरी अनेक कुटुंब आपली मूळची घरे सोडण्यास तयार नसतात व त्याच ठिकाणी धोकादायक स्थितीत वास्तव्य करतात व अनेकवेळा मुसळधार पावसात या इमारती कोसळतात व जीवितहानी होते.तेव्हा अशा इमारतीमधील लोकांना स्थलांतरित करणे मोठे जिकरीचे काम महानगरपालिकेसमोर असते. त्याचप्रमाणे डोंगरावर राहणाऱ्यांची घरे देखील दिवसेंदिवस वाढत असतात,पण याकडे पालिकेचे लक्ष नाही व चिरीमिरी घेऊन अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात,तेव्हा हे जर असच सुरू राहील तर दरवर्षी अशा दुर्घटना होतच राहणार व शासन मदत जाहीर करून मोकळे होते.तेव्हा या सर्व परिस्थितीला स्थनिक प्रशासन व नागरिकही तितकेच जबाबदार आहेत.तेव्हा हे सर्व वेळीच थांबायला हवं,नाहीतर जीव जातच राहतील.

-गणेश हिरवे,जोगेश्वरी 

जोगेश्वरी येथे आषाढी एकादशी साजरी

आदर्श वार्ताहर वृत्तसेवा , मुंबई- दरवर्षी यंदाही जोगेश्वरी पूर्व येथील संत नामदेव मंदिरात नामदेव शिंपी समाज जोगेश्वरी च्या वतीने आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी संत सज्जन भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.संत नामदेव महाराजांच्या संगमरवरी मूर्तीला अध्यक्ष उल्हास मोळतकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी हरिपाठ,आरती विठुनामाचा गजर,अभंग,विश्वप्रार्थना आदी कार्यक्रम पार पाडले.जोगेश्वरी येथील सामजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांच्या वतीने उपस्थितांना तुळशीचं रोपटं,आदर्श परिवार हे पुस्तक व मनशक्ती मासिक भेट देण्यात आले व उपस्थितांना मार्गदर्शन करताना हिरवे सरांनी लाख चौऱ्याऐंशी योनी भोगल्यानंतर प्राप्त झालेला अनमोल असा मनुष्य जन्म असाच वाया न दवडता संतांनी युगानुयुगे जी कार्य केली त्यांच्यासारखी कार्य करण्यासाठी आपण कटिबद्ध असायला हवे,तरच आपला इहलोक व परलोक सुखी होऊन या मनुष्यजन्मचे सार्थक होईल व संतांची कृती व आचरण प्रत्यक्ष आपल्याला कृतीतून साधायला हवं असे सांगून व इतर अनेक गोष्टींचा उपापोह करून आपल्या वाणीला विराम दिला.समाजबंधाव उरणकर यांचा ८४ वा वाढदिवस य निमित्ताने साजरा करण्यात येऊन त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यानिमित्ताने मंडळाचे सचिव नंदकुमार माळवदे,कोषाध्यक्ष संजय वेल्हाळ,सहसचिव गणेश विंचू आदी पदाधिकारी व समाजबांधव बंधु-भिगिनी उपस्थित होत्या. शेवटी अल्पोपहाराने कार्यक्रमाची संगता करण्यात आली.


स्थानिक नागरिकांनी केली सिद्धिविनायक मार्गाची स्वच्छता

मुंबई/गणेश हिरवे शुक्रवार दि 16 जुलै रोजी जोगेश्वरी पूर्व येथील सीतानागर,हनुमाननगर,श्रीकृष्णनगर येथील बैठ्या चाळीमध्ये मुळसाधर पावसामुळे पाणी घुसून घरातील सामानाचे नुकसान झाले.वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळील सिद्धिविनायक मार्गावरून हे पाण्याचे लोंढे खाली येऊन येथील घरात घुसत होते.सध्या याठिकाणी मेट्रोचे काम सुरू असल्याने पाण्याचा निचरा होण्याची कोणतीच व्यवस्था या येथे नसल्याने मागील दोन-तीन वर्षपासून येथील नागरिकांना पावसाळयात खूपच त्रास सहन करावा लागत आहे,तेव्हा यावर उपाय म्हणून येथील नागरिकांनी स्वतः रस्त्यावर उतरून संपूर्ण सिध्दीविनायक मार्गाची साफ सफाई केली व येथे बेकायदा पडणारे मुरूम व उभ्या असणाऱ्या बेकायदा दुचाकी हटविल्या.याकामी स्थानिक आमदार सुनील प्रभू, नगरसेविका साधनाताई माने यांनी जेसीबी,डंपर पाठविले होते अशी माहिती शाखाप्रमुख अजित भोगले यांनी दिली.आज नागरिकांना स्वतः श्रमदान करून सिद्धिविनायक मार्गाची स्वच्छता केली.येथून येणारे पाण्याचे लोंढे रोखण्यासाठी स्थनिक लोकप्रतिनिधी त्वरित लक्ष घालतील सिद्धिविनायक मार्गाची झालेली दुर्दशा लक्षात घेऊन तो रस्ता नवीन बांधतील अशी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. आमदार सुनील प्रभू यांनी या सर्व प्रश्नी लक्ष घालून तो सोडविण्यासाठो प्रत्यनशील आहे असे आश्वासन येथील रहिवाशांना दिले आहे.

आषाढी एकादशी निमित्तानं वृक्षपुजन व वृक्षारोपण

मुंबई (गणेश हिरवे)- नेरुळ येथील यूथकौन्सिल नेरुळ या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून आषाढी एकादशीच्या निमित्तानं वृक्षपुजन व वृक्षारोपण कार्यक्रम  मंगळवार,दिनांक २०.०७.२०२१ रोजी नेरुळ येथे संस्थेच्या सावली रोपवाटिकेत उत्साही वातावरणात संपन्न झाला. तुळशीचे पुजन व लागवड अशा स्वरुपात, कोरोना  प्रतिबंधनात्मक नियम पाळुन पार पडलेल्या या कार्यक्रमास नेरुळ येथील डॉ. गिरीश कुलकर्णी, हायकोर्ट वकील सुरेश निलाटकर, पंडीत जितेंद्र कुलकर्णी गुरुजी, नेरुळ जेष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष प्रभाकर गुमास्ते, सह सचिव अजय माडेकर आदि मान्यवरांसह  संस्थेचे मोजकेच पदाधिकारी उपस्थित होते.  प्रसंगी कोरोना महासंकट काळात अहोरात्र  झटून, प्रसंगी स्वत:च्या प्राणाची तमा न बाळगता  रुग्णांना वैदयकीय सेवा देऊन मानवसेवेचा आदर्श ठेवणारे डॉ. गिरीश कुलकर्णी यांचा शाल, गुच्छ, श्रीफळ व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

 गेली 33 वर्षे संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी न चुकना आषाढी एकादशीस वृक्षदिंडी व वृक्षारोपण सोहळा आयोजित करण्यात येत असतो. पण दीड वर्षापासून उद्भवलेल्या कोरोना या साथरोगाच्या महासंकटामुळे मागच्या वर्षापासून सदर कार्यक्रम मर्यादित स्वरुपात वृक्षपुजन व वृक्षारोपण करून साजरा करण्यात येत आहे. यावर्षीही झालेल्या या  कार्यक्रमात तुळशीचे पुजन व लागवड करण्यात आली. गेल्या दीड वर्षाच्या कोरोना महामारीच्या काळात प्राणवायुचे महत्व जनसामान्यांस चांगले उमगले आहे. आणि तुळस ही  प्राणवायु देणारी व हवेचे शुध्दीकरण करणारी वनस्पती आहे.  याच विचाराचा धागा पकडुन संस्थेने तुळस लागवड व संवर्धन अधिक मोठ्या प्रमाणात होण्यासाठी माझे घर माझे तुळशी वृंदावन या अभिनव स्पर्धेचे या कार्यक्रमांच्या निमित्ताने ऑनलाईन पद्धतीने आयोजन केले. त्यास उत्स्फुर्तपणे लोकांचा चांगला प्रतिसाद अनेक ठिकाणांहून मिळाला व लोकांनी विशेष अभिनंदन केले. अजून ही लोक स्पर्धेत सहभागी होत आहेत.या प्रसंगी बोलताना यूथकौन्सिल नेरुळ या संस्थेच्या कार्याचा गौरव करून पंडित जितेंद्र कुलकर्णी म्हणाले की, माझे घर माझे तुळशी  वृंदावन  हा आयोजित केलेला स्पर्धात्मक उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. यामुळे तुळशीचे महात्म्य अधिक प्रमाणात समाजामध्ये अधोरेखीत होण्यास मदत होणार आहे.  हायकोर्ट वकील सुरेश निलाटकर म्हणाले की, डॉक्टर गिरीश कुलकर्णींचा मानपत्र देवून झालेला गौरव हा योग्यच आहे. त्यांनी कोरोना महासंकट काळातील रुग्णांप्रती दिलेली वैद्यकीय सेवा खरोखरच अभिमानास्पद आहे. मी त्याचा स्वत: साक्षीदार आहे.

संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेचे सचिव सुभाष हांडे देशमुख यांनी केले. तर शिवाजी शिंदे यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे यथोचित आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री रमेश सुर्वे, भालचंद्र माने, जी. आर. पाटील, विक्रम राम, सुजीतसिंह उभी, यशवंत गोनेवाड, दत्ताराम आंम्ब्रे, नरेश विचारे, निशांत बनकर, एस. बी. सिंग आदिंनी खूप मेहनत घेतली.

पोलिसांचे आरोग्य आणि तंबाखू मुक्त पोलीस स्टेशन यासाठी आयोजित वेबिनारचा यशस्वीरीत्या समारोप ;योग्य प्रतिबंधात्मक आरोग्य माहिती देऊन जनजागृती

आदर्श वार्ताहर वृत्तसेवा , मुंबई - मा. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग मुंबई पोलीस यांच्या नेतृत्त्वाखाली दिनांक  २३ जुलै २०२१ रोजी झूम ऑनलाईन च्या माध्यमातून मुंबई पोलीस विभाग आणि सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या एकात्मिक संलग्नतेने मध्य प्रादेशिक पोलीस विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस उप-आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, एकूण २० पोलीस स्टेशन मधिल वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक आरोग्य आणि तंबाखूमुक्त पोलीस स्टेशन वेबिणार सफलतापूर्वक संपन्न झाला. सदर वेबीनारदरम्यान डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण सर यांनी वेबीनारची प्रस्तावना करत आपल्या मध्य विभागातील पोलिसांचे आरोग्य चागले राहण्यासाठी तंबाखू मुक्त पोलिस स्टेशन करण्याचे आव्हाहन केले जेणेकरून आपल्या पोलिसांचे आरोग्य चांगले राहील तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अधिक मदत होईल. कोरोना काळात तंबाखू सेवनाने धूम्रपानामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढतो, तसेच तंबाखू सेवनामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात इत्यादी बद्दल ची माहिती मा. अर्जुन सिंग, सर्जिकल ओंकॉलॉजिस्ट, टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या मार्फत देण्यात आली. तसेच तंबाखू मुक्त पोलीस स्टेशन आपले कार्यस्थळ इत्यादी बद्दल ची माहिती मा. नारायण लाड, असिस्टंट जनरल मॅनेजर, सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या मार्फत देण्यात आली. तसेच सदर सभेदरम्यान एकूण २० पोलीस स्टेशन मधील ४१ पोलीस अधिकारी उपस्थित होते. 

 येणाऱ्या काळात आरोग्य आणि तंबाखू मुक्त पोलीस स्टेशन बाबत जनजागृतीपर ऑनलाईनच्या माध्यमातून मध्य प्रादेशिक पोलीस विभागातील २० पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. जेणेकरून आपले पोलीस अधिकारी तंबाखू सारख्या व्यसनामुळे होणाऱ्या दुर्धर आजारावर नियंत्रण मिळेल आणि त्यांचे आरोग्य सुदृढ, निरोगी राहिल्यामुळे आपला समाज हा सुदृढ बनेल.




ऑलम्पिकमध्ये भारताची चांगली सुरवात...

Well begin is half done अशी इंग्रजीमध्ये जी म्हण आहे,म्हणजे कोणत्याही कामाची सुरुवात ही चांगली झाली तर अर्धी लढाई जिंकल्यासखिच असते व पुढील काम सोपे होते व याचा प्रत्यय आज पाहिल्याच दिवशी भारतीय खेळाडू मीराबाई चानू हिने आणून दिला.जपानची राजधानी टोकियो येथे आजपासून सुरू झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताची आघाडीची वेटलिफ्टर चानू हिने आज झालेल्या महिलांच्या ४९ किलो वजनी गटात पहिल्या प्रयत्नात ८७  किलो वजन उचलले तर दुसऱ्या प्रयत्नात ११५ असे एकूण २०२ किलो वजन उचलून भारोत्तोलनामध्ये जगातील आघाडीच्या देशांच्या भारोत्तोलकांना तोडीस तोड लढत देत रौप्यपदकाची कमाई केली.चीनच्या खेळाडूने २१० किलो वजन उचलून प्रथम क्रमांक पटकाविला. ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे.यापुढेही भारताचे अनेक खेळाडू विविध स्पर्धेत विविध गटात अनेक सुवर्ण पदक जिंकून देतील असा विश्वास भारतीयांनी व्यक्त केला असून आपले खेळाडू नक्कीच अनेक पदक जिंकून तो विश्वास सार्थ ठरवितील अशी आशा आहे.

-गणेश हिरवे,जोगेश्वरी पूर्व

आदर्श वार्ताहर - काव्यांगण

 कोकणवासी मानणार नाही हार


हिरव्यागार महाराष्टावरती प्रलयाने केले अत्याचार

अशा परिस्थितीत मानणार नाही

कोकणवासी कधीच हार

दिले भरभरून तपस्वी या कोकणानी 

भारतभुला

अन्याय सहून ही विझला नाही

कोकणातला चुला

गीतारहस्य रुपी ग्रंथाने दाखविले विश्वरूप

चिखलीच्या त्या बाळाने दाविले स्व स्वरूप

धोंडो केशव कर्वे यांनी स्थपून कन्याशाळा

सोडवल्या अबलांच्या बंदिशाळा

या सर्वांचा असता आशीर्वाद

कसा घाबरेल कोकणवासी आहे कुणाची बिषाद ?


-रविंद्र आत्माराम बागुल,बोरिवली,मुंबई

राज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत

आ. वा.  वृत्तसेवा , मुंबई : कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.        

      २७ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असला तरी या आपत्तींमुळे तो साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.वाढदिवसानिमित्त कुणीही अभीष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये तसेच फलक, पोस्टर्स लावू नये.  सोशल मिडीया व ईमेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

      राज्यात अद्याप कोरोनाचे संकट कायम आहे,संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे, त्यामुळे आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळत राहणे गरजेचे आहे, त्यामुळे वाढदिवसाचे कुठलेही जाहीर कार्यक्रम करू नयेत अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.पूर आणि कोरोना परिस्थितीत एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे, त्यामुळे वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपले योगदान देऊन सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पडावे असेही मुख्यमंत्री म्हणतात.

पाले गावातील तरुण रुपेश म्हात्रे या दिव्यांग बांधवाचा प्रामाणिकपणा.

उरण - रुपेश म्हात्रे हा उरण तालुक्यातील पाले या खेडे गावातला तरुण.रुपेश हा आपल्या उदरनिर्वाहा पोटी भेंडखळ येथिल ULA या कंपनी बाहेर एक टपरी टाकून आपला छोटेखानी व्यवसाय करीत आहे.स्वतःच्या दिव्यांगावर मात करुण रुपेश आपल्या पत्नी आणि छोट्या लहान बाळाचा उदरनिर्वाह मोठ्या ध्येयाने करीत आहे.नेहमी प्रमाणे रुपेश आपली टपरी बंद करुन पाले गावात आपल्या घरच्या दिशेने प्रवास करीत होता.प्रवास करते दरम्यान त्याला पाणदिवे -पिरकोन या मार्गावर एक पर्स सापडली.खरतर अंगी प्रामाणिकपणा  असल्याने तो पाकीट उघडून पाहण्याची भिती नसल्याचे कारणच नाही.त्यामुळे रुपेश ने तो पाकीटाची पाहणी केली तर त्यात त्याला 7/8 हजार रुपये रोख  कँश,ए टी एम,पँन कार्ड,आधार कार्ड व ईतर छोटे दस्तऐवज होते ते पाहील्यावर समजले की सदर पर्स ही आवरे गावातील तरुण विशाल विष्णू गावंड याची असल्याचे समजताच रुपेशने सोशल मिडीयावर मेसेज व्हायरल करुन तो मेसेज विशाल गावंड पर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले आणि ती पर्स विशाल गावंडच्या हातात जशीच्या तशी पोहच केली.  रुपेश म्हात्रे या दिव्यांग बांधवाचा  प्रामाणिकणाचा स्वभाव सर्व जनतेला भावला आणि त्याच्यावर  अभिनंदनाचा वर्षाव झाला.त्यामुळे रुपेश सारख्या दिव्यांग बांधवाने आपली प्रामाणिकपणा सिद्ध केल्याने या जगात माणूसकी जिवंत असल्याचा बोध मिळतो.

[ खरचं मित्रांनो ती पर्स ठेऊन जे काय त्याच्यात पैसे होते त्या पैशाने जास्तीत जास्त एक महिना मौज मजा केली असती परंतू मी माझ्या मनात कोणताही स्वार्थ न ठेवता मी ती पर्स सदर तरुणाच्या स्वाधीन केली आणि त्यानंतर सोशल मिडीया द्वारे आणि प्रत्यक्षपणे जो मला अभिनंदानाचा वर्षाव होत आहे त्या अभिनंदनाने माझे मनोबल  उंचावले आणि मला एक नवी स्फुर्ती निर्माण झाली ते मला त्या पैशाने नक्कीच मिळाले नसते हे नक्की मी मानतो ]  -रुपेश म्हात्रे

[ मी रुपेश म्हात्रे यांचे आभार मानतो. मी हरविलेले पैसे, पाकीट भेटेल की नाही या काळजीत होतो. पण रुपेश म्हात्रे यांच्या माध्यमातून मला माझे पैसे पाकीट, ATM मला परत मिळाले. आजही समाजात माणुसकी जिवंत आहे.हे रुपेश म्हात्रे यांच्या माध्यमातून मी अनुभवलो. ] - विशाल गावंड

साप दिसल्यास सर्पमित्रांना संपर्क करा

आ. वा.  वृत्तसेवा ,रायगड  - रायगड जिल्ह्यात काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. उरण तालुक्यातही अधून मधून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे नद्या नाले भरून वाहू लागले आहेत. पाण्याच्या प्रवाहात वाहून आलेली विषारी -बिनविषारी साप मनुष्य वस्तीत आश्रय घेत आहेत. त्यामुळे विषारी -बिन विषारी सापांचे वन्य जीवांचे संरक्षण करणाऱ्या उरण तालुक्यातील फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन )या संस्थेने जनजागृती विषयक मोहीम हाती घेतली असून आपल्या परिसरात साप आढळल्यास सर्प मित्रांना फोन करून कळविण्याचे आवाहन केले आहे. सदर संस्थेचे सदस्य, कार्यकर्ते त्या सापांना पकडून त्यांना कोणत्याही प्रकारे इजा होऊ न देता जंगलात नेऊन सोडतात.साप दिसल्यास खालील सदस्यांशी संपर्क करावे.

फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन )या संस्थेचे व्हाट्सअप नंबर -9594969747, 9029513575

राजेश (चिरनेर -भोम )-7738628562,गोरखनाथ (पालेगाव )-9769705295,राकेश (सारडे )8600557387,अविनाश (आवरे )-7738121971,ऋषिकेश (कडापे )-9082935400,विजय (मोठी जुई )-8108848058, मिलिंद (पेण )-93212 34137, प्रणव (आवरे )-9082670519, रघु (उरण )-9321287772, किशोर (उरण )-9137752021, चरण (रावेगाव )-9503147576, प्रथमेश (गळसुंदे )-8600587495, तुषार (पोसरी )-8378021811, बाळा कोळी (उरण )-8424932686, अनिरुद्ध (अलिबाग )-9960662329

पनवेल येथे पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम( डिप्लोमा इन जर्नालिझम)प्रवेश सुरू

आ. वा.  वृत्तसेवा ,पनवेल - 2021-2022 या शैक्षणिक वर्षापासून पत्रकारितेचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या, मराठी भाषेची गोडी असणाऱ्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम( डिप्लोमा इन  जर्नालिझम)   प्रवेश करण्यात आला आहे.  हा अर्धवेळ अभ्यासक्रम असून शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवसांत चालविला जाणार आहे. माध्यम क्षेत्रातील तज्ज्ञ पत्रकार या वर्गात मार्गदर्शन करणार आहेत. बारावीनंतर पदवी शिक्षण घेणारे विद्यार्थी, अन्य ठिकाणी नोकरी करत शिकू इच्छिणारे विद्यार्थी किंवा पत्रकारितेमध्ये करिअर करू इच्छिणारे कोणत्याही शाखेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास पात्र असतील. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या वेबसाईटला भेट देऊन प्रवेश अर्ज भरावा, असे आवाहन कॉलेजच्या वतीने करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश परीक्षा घेतली जाणार असून त्या परीक्षेचे स्वरूप बहुपर्यायी प्रश्न स्वरूपाचे असेल.त्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात येतील. या प्रवेश परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. अर्ज करण्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावर  उपलब्ध अर्ज भरून देणे आवश्यक आहे. इच्छुकांनी माध्यम क्षेत्रातील उपलब्ध अनेक व्यावसायिक संधी मिळविण्याच्या दृष्टीने  या पत्रकारिता वर्गाला जरूर प्रवेश घ्यावा.चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, न्यू पनवेल (स्वायत्त) या  अग्रगण्य शिक्षण संस्थेत त्वरित प्रवेश घ्यावा.

अधिक माहितीसाठी संपर्क -नम्रता कडू,वर्ग समन्वयक,

डिप्लोमा इन जर्नालिझम,7977489076,ईमेल पत्ता- djnlckt1@gmail.com

उरणमधील पुरस्थितीला जवाबदार कोण ?

आ. वा. वृत्तसेवा, उरण- राज्य व केंद्र सरकारच्या अनेक प्रकल्पामुळे उरणचे नाव देश पातळीवर गेलं आहे. पण आता उरणची नवी ओळख निर्माण होऊ पाहत आहे.ती म्हणजे पूरग्रस्त उरणची, उरणला आज पर्यंत कोणताही पुराचा इतिहास नाही. या भागात शेती आणि मिठागरे असतांना मागील अनेक वर्षे सलग 4 ते 5 दिवस पाऊस होऊन ही पूर येत नव्हता. पण सध्या सलग 24 तास पाऊस झाला की गावात घुडघाभर पाणी साचू लागलं आहे. आणि दुसरीकडे गावापेक्षा किती तरी फूट उंचीचा असलेल्या रस्तावरही 3 फुटांचे पाणी साचू लागले आहे. एवढंच काय तर ऐन उन्हाळ्यात बोकडविरा ते फुंडे स्थानक(सिडको कार्यालया पर्यंत) च्या रस्त्यावर पाणी भरण्याच्या घटना घडत आहेत.याची दखल घेत pwd ने या रस्त्याच्या कडेला भिंत बांधली होती. आजही ती आहे.मात्र पाण्याची पातळी वाढल्याने व रस्ता खालावल्याने पाण्याचे प्रमाण वाढले आहे.या रस्त्यावरील पाणी ही नित्याचे झाले आहे.तर जेएनपीटी कामगार वसाहत ते नवघर फाटा हा मार्ग सुद्धा पावसाळ्यातील पाणी भरण्याचे नेहमीचे ठिकाण बनले आहे. या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक आहे.त्याच प्रमाणे सध्या उरणच्या पूर्व विभागात सुरू असलेल्या विकासामुळे  विंधणे, कंठवली,दिघोडे ते वेशवी पर्यंत चा रस्ता ही दरवर्षी पाण्याखाली जात आहे.उरण शहरात तर कुंभारवाडा,केगाव,इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय आणि न्यायालय परिसर या ठिकाणी पाणी शिरलं. उरण मधील बोकडविरा,फुंडे,भेंडखल,नवघर,कुंडेगाव,जसखार, करल, सोनारी,सावरखार,पूर्व विभागातील चिरनेर या गावांना पाणी साचू लागलं आहे. चिरनेर तर तालुक्यातील पूरग्रस्त गाव बनला आहे.

काय आहेत कारणे:-उरणच्या विकासासाठी सिडकोने येथील शेती,मिठागरे यांच्या वर मातीचा भराव केला.त्यावेळी या भागातील भरती ओहटीचे त्याच प्रमाणे  पावसाचे पाणी याचा निचरा करण्यासाठी असलेले नाले(पवळी)बुजविण्यात आल्या. त्यामुळे येथील नैसर्गिक मार्गच बंद केले. त्याचप्रमाणे ते आकुंचित केले.त्याचा परिणाम समुद्राच्या पाण्याने आपली वाट बदलली ते थेट गावात शिरू लागले आहे. तर काही ठिकाणी रस्त्यावर येऊ लागलं आहे. जे सिडकोने केले तेच जेएनपीटीने ही केले.

कोट्यवधी खर्च केलेली सिडकोची आधुनिक यंत्रणा निकामी-

उरण मध्ये विकासाची कामे करीत असताना सिडकोने अगदी जागतिक पातळीवर येथील भरती ओहटी च्या पाण्याचा निचरा करणाऱ्या यंत्रणेचा अभ्यास केला. त्यासाठी करोडो रुपये खर्च केले. उरण मध्ये डच या देशाच्या धर्तीवर पाण्याचा निचरा करण्यासाठी होल्डींग पौंड (धारणतलाव) तयार केले आहेत. आशा प्रकारचे सहा होल्डिंग पौंड आहेत असे सिडको कडून सांगितलं जातं.पण आजच्या स्थितीत यातील एकाही तलावात पाणी साचत नाही याचे कारण या तलावात मातीचा गाळ साचला आहे.या गाळावर सध्या खारफुटी उगवली आहे.ती हटविल्या शिवाय या तलावातील गाळ काढता येऊ शकत नाही. त्यासाठी मागील 15 वर्षा पासून मुंबई उच्च न्यायालयात सिडकोची याचिका असल्याचे उत्तर सिडको कडून दिल जात आहे.

जेएनपीटीचे ढिसाळ नियोजन :-जसखार,सोनारी,करळ व सावरखार या चार गावात पाणी शिरल्यावर त्यासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात, परंतु प्रश्न मात्र कायम आहे.पाणी साचून येथील घरांची नुकसानी सुरूच आहे.

पूरग्रस्त होण्याचा धोका:-उरणचा विकास चालू असताना सिडको तसेच JNPT प्रशासन कडून कोणत्याही प्रकारचे योग्य नियोजन केले जात नसल्याने उरणला नेहमी पुराचा धोका बसत आहे.उरणच्या विकासा संदर्भात नेहमी चुकीच्या पद्धतीने नियोजन केले जात असल्याने त्याचे गंभीर परिणाम येथील नागरिकांना, ग्रामस्थांना भोगावे लागत आहे. पाऊस सतत, मुसळधार पडला की उरण मध्ये पूर येतो व शेतीचे, फळ बागांचे तसेच नागरिकांच्या घरांचे अतोनात नुकसान होते. नुकसान ग्रस्त पीडिताला योग्य ती मदत त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही.

[[जमिनी गेल्याने प्रकल्पग्रस्त झालोच आहोत पण यापुढे दक्ष नागरिक म्हणून जागे होऊन आपल्या गाव आणि परिसरात गटारे नागरी सुविधा या  करीता सिडको व जेएनपीटी कडून खर्च करण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांचा निधी हा योग्य प्रकारे खर्च होऊन काम होत का याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ते न झाल्यास उरणला पूरग्रस्त होण्या पासून कोणीही वाचवू शकणार नाही.]]

- नरेश कोळी , हनुमान कोळीवाडा येथील रहिवाशी तथा सामाजिक कार्यकर्ते.

आगरी साहित्यिक सर्वेश तरेंची नासाच्या 'मंगळ मिशन' मध्ये नाव नोंदणी ; नासा आणि इस्त्रोसारख्या अंतराळ संस्थाच्या मोहिमेसाठी जनजागृती

दिव्या पाटील :आजच्या २१व्या शतकात जगभर सर्वच देश प्रगतीपथावर जात आहेत. विज्ञानाच्या जोडीने सर्व काही शक्य झाले आहे हे सर्वांना माहीत आहे, विज्ञानातील सर्वात मोठा आकर्षणाचा भाग असलेल्या अंतराळाचे वेड सर्वांनाच आहे. व यासाठी अंतराळप्रेमी देखील जोमात तयारी करीत पुढे जात आहेत. अमेरिकेतील नासा ह्या अंतराळ संशोधन संस्थेचे आकर्षण सर्वांनाच आहे. नासा द्वारे २०२६ रोजी मंगळावर यान पाठविण्याची मोहिम होणार आहे त्यासाठी गेले कित्येक वर्ष विशेष  तयारी चालु आहे. या मोहिमेची जनमानसात जनजागृती व्हावी आणि मोहिमेबद्दल उत्सुकता वाढावी यासाठी नासाने ‘मंगळावर नाव पाठविण्याची’ अधिकृत मोहिम चालु केली आहे. 

  ह्या मध्ये कुणाही आपला अर्ज करुन त्यातील माहिती भरून नोंद करु शकतात आणि मग आपले नाव डिजीटल स्वरुरपात यानात चिप द्वारे पाठविण्यात येणार असून नासा थेट त्याचे आपल्याला प्रमाणपत्र वजा तिकीटही देते. अंतराळ प्रेमींना ह्याचा लाभ घेण्याची ही अतिशय उत्तम संधी आहे. जगभरातून अनेकांनी ह्या मोहिमेत आपला सहभाग दाखवला असून भारतातून तब्बल ३ लाख ७६ हजार ७७९ जणांनी ह्या मोहिमेचा लाभ डिजिटल स्वरूपातुन घेतला आहे. देशात अनेकांना ह्या मोहिमेची माहिती नसल्या अभावी अनेक ह्या गोष्टींपासून अज्ञात आहेत आणि म्हणूनच नासाच्या ह्या मोहिमेबाबत जनजागृती व्हावी ह्या करिता सर्वेश तरे यांनी स्वतःदेखील ह्या मोहिमेत सहभाग दाखविला आहे. समाजातील अनेकांना नासा म्हटले की लगेच भुलायला होतं परंतु अशा देखील अनेक प्रमाणपत्राच्या मजेशीर मोहिम नासा राबविते आणि ते समाजातील घटकांनाही माहित होणे गरजेचे आहे. 

   नासा तसेच इस्त्रोतही अनेक प्रश्नावली असतात त्याचे उत्तर दिल्यावर आपल्याला प्रमाण पत्र मिळते व असे गंमतीदार उपक्रम देखील असतात याची सत्यता ही सामान्य जनतेलाही माहिती व्हायला. किंबहूना हेच विद्यार्थ्यांना सांगीतले तर यातून अनेक विद्यार्थ्यांना गोडी वा कुतूहल निर्माण होईल अन नक्की उद्या आपली मुलंही शिक्षणाच्या जोरावर नासा आणि इस्त्रोसारख्या अंतराळ संस्थामध्ये आपल्याला बघायला मिळतील.म्हणुन सर्वेश तरेंनी जागृतीखातर आपले नावही नासाच्या या ‘मंगल मिशन’ साठी नोंदविले असल्याचे सांगितले आहे.

अनमोल खजिना पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

कल्याण (प्रदीप कासुर्डे )- दिनांक २३ जुलै गुरुपौर्णिमेच्या शुभ दिनी लेखक श्री. लिलाधर महाजन लिखित अनमोल खजिना या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ऑनलाईन स्वरूपात उत्साहात पार पडला.अक्षरमंच प्रकाशन कल्याण वतीने आकर्षक असे हे सुविचार संग्रहाचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले 

 असून या प्रकाशन सोहळ्यासाठी विविध मान्यवर उपस्थित हॊते.श्री. सरस्वती विद्यामंदिर भांडुप शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कुरकुटे मॅडम यांनी याप्रसंगी उदघाटनपर भाषणात  हे पुस्तक मुलांसाठी खूप  उपयोगी ठरेल असा विश्वास व्यक्त करून पुस्तकाला खूप खूप शुभेच्छा दिल्या. "माणसाजवळ धन नसेल तरी चालेल पण प्रेमाने काठोकाठ भरलेलं मन नक्कीच असावं"अशाप्रकारे एकूण ३२पानात महाजन सर यांनी विविध विषयावरील सुविचार संग्रहीत केले आहेत. निबंधलेखन, भाषण, लेख,सूत्रसंचालन तसेच व्यक्तीमत्व्व विकास यासाठी हे पुस्तक लहानापासून ते थोरापर्यंत सर्वांना उपयोगी पडणारे आहे. शाळेत परिपाठासाठी विदयार्थ्यांना  या सुविचार संग्रहाचा चांगला उपयोग होऊ शकतो.या पुस्तक प्रकाशना बद्दल लिलाधर महाजन सर यांचे बहिणाबाई साहित्य संस्था, कल्याण, साहित्य जागर मंच मुंबई, मुंबई ठाणे कवी कट्टा या संस्थेच्या वतीने खूप खूप अभिनंदन करण्यात येत आहे.

शुक्रवार, २३ जुलै, २०२१

महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा पदी मिताली तांबे यांची निवड

आ.वा वृत्तसेवा ,मुंबई  : महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा पदी कवयित्री , लेखिका मिता तांबे यांची राज्य  अध्यक्ष मनिष  गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विभागातील शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी व सन्मानासाठी नियुक्ती करण्यात आली. मिता तांबे ह्या विद्यार्थी , पालक , मुख्याध्यापक , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना भेडसावणाऱ्या समस्या निकाली काढण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे ज्ञानदेव हांडे  यांनी सांगितले. महिला शिक्षिकांना एकत्र करून संघटनेची ताकद वाढून महिला शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी  कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी मिता तांबे यांनी निवडीनंतर दिली. या सार्थ निवडीबद्दल समाधान व्यक्त करत राज्य सहसचिव भानुदास शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.  मुंबई सचिव दत्तात्रय शेंडकर व मुंबई सहसचिव अनिल चिकणे यांनी नियुक्तीपत्र प्रदान करत अभिनंदन केले.

कामराज नगर भुयारी मार्गाच्या नुतनीकरणसाठी जनतेची मागणी ; सामाजिक कार्यकर्ते संतोष पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन

मुंबई(शांत्ताराम गुडेकर) -घाटकोपर पूर्वेतील महामार्गावर असलेल्या कामराज नगर येथील भुयारी मार्गाच्या नुतनीकरणसाठी स्थानिक नागरिकांनी शुक्रवारी भुयारी मार्गात धरणे आंदोलन करून आपला संताप व्यक्त करत भुयारी मार्ग नूतनीकरणची मागणी केली. कामराज नगरच्या या भुयारी मार्गासाठी गेल्या ४ वर्षांपासून येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संतोष पिंगळे यांनी या भुयारी मार्गाच्या दुरावस्थेकडे लक्ष देत एमएमआरडीए कडे भुयारी मार्गाच्या नूतनीकरणचा पाठवपुरावा केला होता मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाच्या वेळखाऊपणामुळे पावसाळ्यात हा मार्ग धोकादायक होत आहे. नुकतेच येथील स्थानिक महिला या भुयारी मार्गातून जात असताना पाय घसरून पडली होती याची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते संतोष पिंगळे यांनी भुयारी मार्गात स्थानिकांचे आंदोलन केले. यावेळी धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने स्थानिकांनी भुयारी मार्गाच्या आंदोलनासाठी आवाज उठवला. यावेळी कामराज नगर च्या भुयारी मार्गाचे नुतनीकरण झालेच पाहिजे , लोकांचा प्रवास सुरक्षित करा अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी प्रतिक्रिया देताना आंदोलक संतोष पिंगळे यांनी सांगितले की गेल्या चार वर्षांपासून या भुयारी मार्गाच्या नूतनीकरणचा विषय एमएमआरडीए कडे मागणी करत आहोत मात्र हा धोकादायक मार्ग कुणाचा जीव घेतल्यावर एमएमआरडीए नुतनीकरणला सुरुवात करणार का असा सवाल संतोष पिंगळे यांनी केला. जनतेची ही मागणी पूर्ण न झाल्यास दोन महिन्यात स्थानिक जनता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार. दरम्यान महिला आंदोलक संजना पिंगळे यांनी सांगितले की हा मार्ग दरवर्षी  पावसाळ्यात अत्यंत धोकादायक बनतो. नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. अशात मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याने आम्ही हे आंदोलन केले आहे.

महापारेषणच्या कांदलगाव ते महाड दरम्यान 220 के. व्ही. अति उच्चदाब वीज वाहिनीचे दोन टॉवर कोसळल्यामुळे महाड व पोलादपूर तालुक्यातील 80,000 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

आ.वा वृत्तसेवा ,  मुंबई- रायगड जिल्ह्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे काल दि.22 जुलै 2021 ला महापारेषणच्या कांदलगाव ते महाड दरम्यान 220 के. व्ही. अति उच्चदाब वीज वाहिनीचे दोन टॉवर कोसळल्यामुळे महावितरणच्या गोरेगाव विभागातील महाड व पोलादपूर उपविभाग पूर्णपणे अंधारात गेले आहे. दोन्ही तालुक्यात 80,000 ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित असून अति उच्चदाब टॉवरच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. टॉवर लाईनचे काम पूर्ण होईपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात वेळ लागू शकते.

   महापारेषणच्या महाड अति उच्चदाब उपकेंद्र बंद असल्यामुळे महावितरणच्या पेण मंडळातील चांभारखिंड, जी. बी. एल, कोलोसे व तुर्भे हे चार स्विचिंग उपकेंद्र बंद पडले आहेत. परिणामी, महाड व पोलादपूर येथील महाड शहर, बिरवाडी, विन्हेरे, वहूर, नाते, नांगळवाडी, नागाव, कुंबळे व महाड एम. आय. डी. सी तसेच पोलादपूर शहर, तुर्भे, पितळवाडी, वरंध असे एकूण 260 गावांचा वीजपुरवठा बाधित झाला असून यामध्ये ४४ उच्चदाब २२ के.व्ही फीडर व 80,000 ग्राहकांचा वीजपुरवठा टॉवर कोसळल्यामुळे खंडित झाला आहे.

राज्यातील आपत्कालिन स्थितीबाबत उपमुख्यमंत्र्यांची संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी चर्चा ; राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात बचाव व मदतकार्यासाठी सरंक्षण मंत्र्यांचे आश्वासन

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिवांकडून सातत्याने आपत्कालिन स्थितीचा आढावा ;

बचाव व मदतकार्याला गती देण्यासाठी राज्य व जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न

आ.वा वृत्तसेवा , मुंबई :-  रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळून निर्माण झालेल्या आपत्कालिन परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा  करुन त्यांना सद्यस्थितीची माहिती दिली. राज्यात अतिवृष्टी व दरड कोसळलेल्या भागात सैन्यदलांची मदत तात्काळ उपलब्ध करण्यात आली असून सैन्यदलांची अधिकची मदतही उपलब्ध करण्याचे आश्वासन  संरक्षणमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे. अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाशी समन्वय ठेवण्यासाठी राज्य सरकारने मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्यावर नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी सोपवली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे स्वत: बचाव व मदकार्यावर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने अतिवृष्टीग्रस्त भागातील मदत व बचावकार्याचा आढावा घेत असून आवश्यक निर्देश तातडीने दिले जात असल्याची माहीती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

    राज्यात सर्वदूर होत असलेल्या अतिवृष्टी व त्यामुळे निर्माण झालेल्या आपत्कालिन परिस्थितीवर  उपमुख्यमंत्री अजित पवार जातीने लक्ष ठेवून आहेत. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री, उदय सामंत, साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार अनिकेत तटकरे, भरत गोगावले, भास्कर जाधव, शेखर निकम आदी लोकप्रतिनिधी अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यात सहभागी झाले असून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून तसेच खासदार सुनील तटकरे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून पुरस्थितीचा आढावा घेतला. आपत्तीग्रस्त नागरिकांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करण्याचे तसेच स्थिती पूर्ववत होईपर्यंत जिल्हा न सोडण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रीमहोदयांना तसेच लोकप्रतिनिधींना दिल्या आहेत. 

     कोयना धरण परिसरातील अतिवृष्टीमुळे धरणाची पाणीपातळी वाढत असून सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांतील  नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. कोयना धरणाच्या पाणीपातळीवर जलसंपदामंत्री जयंत पाटील स्वत: जातीने लक्ष ठेवून असून अलमट्टी धरण व्यवस्थापनाशीही संपर्कात आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीत नियंत्रणात ठेवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, गुहागर, पाटण, शिराळा, कोल्हापूर अशा अनेक शहरांमध्ये पूरस्थिती गंभीर असून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ व सैन्यदलांची मदत घेण्यात येत आहे. लष्कर व नौदलही बचाव व मदतकार्यात सहभागी झालं असून गरजेनुसार सैन्यदलाची अधिकची मदत तयार ठेवण्यात आली आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

    अतिवृष्टीग्रस्त भागात रस्ते वाहून गेल्याने व दरड कोसळल्याने ज्या गावांचा संपर्क तुटला आहे तिथल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे व खाद्यपदार्थांची पाकिटे पुरवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. स्थानिक नागरिक व स्वयंसेवी संस्थांनीही आपत्कालिन परिस्थितीत आपापल्या भागातल्या आपत्तीग्रस्त नागरिकांच्या बचाव व मदतकार्यात सहकार्य करावे. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांनीही सुरक्षितस्थळी आसरा घेऊन परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत बाहेर पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. आपत्तीग्रस्त नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी पोलिस किंवा स्थानिक प्रशासनाशी, लोकप्रतिनिधींशी संपर्क साधावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

महाडमधील पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे प्रशासनाला निर्देश

आ.वा वृत्तसेवा , रायगड : जिल्ह्यातील महाड या तालुक्यातील अतिवृष्टी झाल्याने उद्भवलेल्या  पूरपरिस्थितीमुळे बाधित नागरिकांचे आणि जनावरांचे  तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा व जलदगतीने मदतकार्य सुरू करा, अशा सूचना आज पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या.

     पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील महाड येथील पूरपरिस्थितीची पहाणी करुन पूरबाधितांना मदतकार्य पोहोचण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी खासदार सुनिल तटकरे, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार गिरीश महाजन, आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल यादव, स्थानिक प्रशासनातील इतर अधिकारी आदिंची उपस्थिती होती.

  पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या भागातील पावसाचा आणि पूरपरिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यातील पूरबाधित नागरिकांचे आणि जनावरांचे स्थलांतरण करून त्यांना युद्धपातळीवर मदत पोहोचवावी व स्थलांतरित केलेल्या नागरिकांसाठी अन्नधान्य, औषध पुरवठा, वैद्यकीय सेवा सुविधा या सारख्या आवश्यक सर्व बाबी उपलब्ध करुन द्याव्यात तसेच जनावरांनाही आवश्यक पशुखाद्य आणि पाणी पुरवावे, अतिवृष्टीमुळे  खंडित झालेली दूरध्वनी सेवा आणि विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करावा, अशा सूचना दिल्या. तसेच या आपत्कालीन परिस्थितीवर मात करुन मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रीमंडळातील इतर सहकारी मंत्र्यांच्या सहकार्याने पूरबाधितांना योग्य ती मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

मुंबई: -  राज्यातील अतिवृष्टीमुळे दऱड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा शोकसंवेदानाही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी प्रकट केल्या आहेत. 

रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे ( दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झाले. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल.

महाड येथील पूरपरिस्थिती निवळण्यास सुरुवात ; जिल्हा प्रशासनातर्फे मदतकार्य वेगाने सुरु

संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

महाड  - महाड तालुक्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरु असून मदतकार्य वेगाने सुरु आहे.  या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती निवारणची 2 पथके,  राज्य आपत्ती निवारणची 2 पथके, नौदलाची 2 पथके, सागरी सीमा सुरक्षा दलाची 2 पथके तसेच 12 स्थानिक रेस्क्यू टीममार्फत मदतकार्य सुरु आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरु आहे.

     पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे परंतु पाणी ओसरले तरी महाबळेश्वरला पडत असलेला पाऊस, संभाव्य अतिवृष्टीचा इशारा यामुळे महाड शहरात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  सखल भागात व पूरप्रवण भागात राहणाऱ्या नागरिकांनी पुढील काही दिवस प्रशासनाने निश्चित केलेल्या सुरक्षित निवारास्थळांमध्ये स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.  या भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याची कार्यवाही सुरु असून त्याठिकाणी प्रशासनामार्फत पूरबाधितांसाठी कपडे, पिण्याचे पाणी, बिस्कीट, अन्नधान्य, वैद्यकीय उपचार अशा विविध आवश्यक बाबींचीही व्यवस्था करण्यात आली आहे. वैद्यकीय पथके लोणरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत.  

      नागरिकांना काही अडचण असल्यास त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग 02141-222097 / 227452, व्हॉट्सअप क्रमांक 8275152363 येथे संपर्क साधावा, तसेच  महाड व पोलादपूर तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी खाद्यपदार्थ, पाणी बॉटल्स, बिस्कीट, दूध पॉकेट, कपडे, चादर-बेड शीट, सतरंजी व इतर जीवन उपयोगी साहित्य स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती, व्यापारी, उद्योगपती व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून पाठवावयाचे असल्यास 1) मधुकर बोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड - 9965100800.  2) प्रशाली दिघावकर, उपविभागीय अधिकारी, माणगाव - 7588816292, 3) प्रियांका आयरे-कांबळे, तहसिलदार, माणगाव - 8805160570, 4) परमेश्वर खरोडे, अव्वल कारकून, माणगाव तहसील - 9028585985, 9804546546, या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

     पूरग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाशी समन्वय ठेवण्यासाठी राज्य सरकारने मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्यावर नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी सोपविली आहे. तर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे स्वत: बचाव व मदकार्यावर लक्ष ठेवून आहेत.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे,आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे व इतर लोकप्रतिनिधी सातत्याने या भागातील मदत व बचावकार्याचा आढावा घेत असून जिल्हाधिकारी निधी चौधरी व प्रशासनातील जिल्हा परिषद, महसूल, आरोग्य, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, तसेच इतर विभागातील अधिकारी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करीत आहेत.


महाड-पोलादपूर येथील पूरबाधितांच्या उपचारासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा तत्पर

अलिबाग - सतत चालू असलेल्या पावसामुळे गेल्या दोन दिवसात महाड येथे पूरस्थिती/ अतिवृष्टी झालेली आहे. गुरुवार, दि. 22 जुलै, 2021 रोजी संध्याकाळी 6.00 वाजता तळीये गाव (वरची वाडी) ता.महाड येथे अचानक दरड कोसळल्याने जवळपास 30 घरे ढिगाऱ्याखाली गेली असून आज दि.23 जुलै रोजी दुपारी 1.00 वाजेपर्यंत 32 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. तसेच पोलादपूर तालुक्यातील केवनाळे -सुतारवाडी,ता.पोलादपूर गावातील 5 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत. अशा एकूण 37 मृतदेहांचे शवविच्छेदन जागेवरच (Spot Post Mortem) करण्यात येणार आहेत. यानंतरही अजूनही काही व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकलेल्या असून शोधकार्य युध्दपातळीवर सुरु आहे. तसेच महाडमध्ये 7 ते 8 फूटावर खूप उंचीवर पाणी साचलेले असून अद्यापही जखमी रुग्ण सापडलेले नाहीत व उंच ठिकाणी ज्या व्यक्ती आहेत, त्यांना हेलिकॉप्टरने स्थलांतरित करण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी दिली आहे.

     एमआयडीसी बिरवाडी, महाड येथे दोन कंपन्यांमध्ये स्फोट होवून आग लागल्याची घटना घडली होती परंतु कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून कळविण्यात आलेले आहे.

     तसेच मागील 2 दिवसापासून विद्युत पुरवठा बंद असल्याने महाड येथील खाजगी व शासकीय डॉक्टर्स यांच्याशी  संपर्क होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचप्रमाणे महाड येथील कोविड सेंटर (सीसीसी / डिसीएचसी) सेंटरमधील रुग्ण सुरक्षित असून जिल्हा स्तरावरुन व उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथून औषधांचा व ऑक्सिजन पुरवठा सुरळीत सुरु आहे. त्याचप्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत प्रतिबंधात्मक औषधोपचारही सुरु आहेत. उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे 37 रक्तपिशव्या उपलब्ध असून 50 रक्तपिशव्यांची अलिबाग जिल्हा रुग्णालय येथून मागणी करण्यात आली आहे.

     गंभीर जखमी रुग्णांना (Poly Trama) एम.जी.एम. कामोठे, जिल्हा रुग्णालय अलिबाग व गरज भासल्यास जे.जे. रुग्णालय मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे. स्थिर व किरकोळ जखमी रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय माणगांव व जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे दाखल करण्यात येत आहे. विविध स्वयंसेवी संस्थेमार्फत गरजूंना पाणी, जेवणाची पाकीटे व औषधांचा पुरवठा करण्यात येत असून शवविच्छेदन करण्यासाठी 1) उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथील तज्ञपथक (न्यायवैद्यक तज्ञ) डॉक्टरांसह 2) उपजिल्हा रुग्णालय, म्हसळा, 3) उपजिल्हा रुग्णालय, श्रीवर्धन, 4) उपजिल्हा रुग्णालय, माणगाव येथे चार वैद्यकीय पथके कार्यरत आहेत. 

      पालकमंत्री कु.आदिती तटकरे व खासदार सुनिल तटकरे यांनी महाड येथे पाहणी करून जखमींची विचारपूस करून सर्व संबंधीत विभागांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत, असेही  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी कळविले आहे.तसेच वैद्यकीय सोयी-सुविधांबाबत संपर्कासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत आरोग्य हेल्पलाईन नं. 02140-263006/263003, डॉ. प्रदीप इंगोले, वैद्यकीय अधीक्षक (नोडल ऑफिसर) मो.नं.9130733202/8369424489, सनियंत्रण अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, अलिबाग रायगड मो.नं. 9404001000 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी केले आहे.


प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नुकसानीची माहिती द्यावी

अलिबाग-प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2021 मध्ये भात व नागली पिकासाठी रायगड जिल्ह्यामध्ये एचडीएफसी अर्गो या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. 

     या योजनेअंतर्गत नुकसान झालेल्या क्षेत्राची माहिती विमा कंपनीस 72 तासाच्या आत कळवणे आवश्यक आहे. त्यामुळे विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झाले असल्यास त्याची विमा कंपनीस माहिती देण्यासाठी पी एम एफ बी वाय ऑनलाइन पोर्टल/मोबाईल अँपचा वापर करावा अथवा विमा कंपनीच्या तालुका व जिल्हा प्रतिनिधी यांच्याशी संपर्क करावा.

      तसेच शेतकऱ्यांना नुकसानीच्या माहितीचे लेखी अर्ज देखील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात करता येतील. अधिक माहितीसाठी संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे.

विमा प्रतिनिधींचा संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे - रायगड जिल्हा प्रतिनिधी - राजेश गायकवाड (मो. क्र. 9850237334 7208956097), तालुका प्रतिनिधी अलिबाग - वैभव घरत (9764284186, 8668295249), कर्जत - महेश साळवी (मो.क्र. 9373625010 8888562765), खालापूर - अंकुश शेलार (मो. क्र 9765076478, 7798676518), महाड - जय धारिया (मो. क्र. 8793463619), माणगाव - सनी साळवी (मो. क्र 8830153429, 9403132916), म्हसळा - प्रमोद जाधव (मो 7588347376), मुरुड - राहुल लांडगे (मो. क्र. 8308006600), पनवेल - अजित रिंगे (मो. क्र 9702029142, 8169427080),पेण - आशीर्वाद जाधव (मो. क्र. 9767887765, 9422027765), पोलादपूर - आदित्य कसुरडे (मो. क्र. 8793463619), रोहा - जितेंद्र पाभरेकर (मो. क्र. 8378806936), श्रीवर्धन - सुरेश गोरे (मो. क्र. 8698984684, 9420480389), सुधागड - आशीर्वाद जाधव (मो. क्र. 9767887765, 9422027765), तळा - जितेंद्र पिंपळे (मो. क्र. 8308195611, 8668295249), उरण - अतिश गायकवाड (मो. क्र. 7066152766).

गुरुवार, २२ जुलै, २०२१

राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

आ. वा. वृत्तसेवा , मुंबई - लयभारी आदिवासी विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रशांत लाड (दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त ईगल न्यूज चँनलच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे  तसेच महान महाराष्ट्राचा पैलू वक्तृत्वाचा  या विशेष उपक्रमांतर्गत सर्व सहभागी स्पर्धकांना तज्ञ  मंडळींचे मोफत कार्यशाळेचे आयोजन  करण्यात आले आहे.

  या स्पर्धेचे गट एक  (इयत्ता १ ली ते ५ वी) विषय-१)मोबाईल माझा दोस्त २) माझी शाळा ३)माझी आई,  गट दोन (इयत्ता ६ वी ते १० वी)~विषय-१) ऑनलाइन शिक्षण २) वाचाल तर वाचाल ३) माझा आवडता नेता,  खुला गट~ विषय १) कोरोना आणि सामाजिक बांधिलकी २ )कोरोना कालावधीतील पत्रकारांचे योगदान ३ )कोरोना योद्धे

  सदर  स्पर्धेसाठी सर्व गटासाठी प्रवेश फी दहा रुपये राहील. स्पर्धकांनी व्हिडीओ एडीट न करता ,मोबाईल आडवा धरुन रेकॉर्ड करुन दिलेल्या नोंदणी क्रमांकावर पाठवावा.परिक्षकांचे ७५ ℅ व व्हिडीओच्या व्हयुजसाठी २५℅ गुण असतील.आयोजकांचा स्पर्धेसंदर्भातील कोणताही निर्णय अंतिम राहील. स्पर्धेचा निकाल ९ सप्टेंबर २०२१ रोजी जाहिर करण्यात येईल. स्पर्धेतील व्हीडीओ स्विकारण्याची अंतीम तारीख ५ ऑगस्ट २०२१ राहील.

एका स्पर्धकाने एकाच विषयाचा  व्हीडीओ पाठवावा.व्हीडीओ सोबत स्पर्धकाचे नाव,शाळेचे नाव, संपुर्ण पत्ता,गट क्रमांक, संपर्क (व्हाटसाप) क्रमांक,स्पर्धकाचा एक आयडेंटिटी साईज फोटो इत्यादी  माहिती पाठवायची आहे .नाव नोंदणी व व्हीडीओ पाठवण्याचा व्हॉटसाप व कॉलींग क्रमांक 7066731503 (फोन सायंकाळी सहा ते सात याच वेळी घेतला जाईल.)प्रवेश फी 7447330608 या क्रमांकावर पाठवून .लगेच प्रवेश फी पाठवल्याचा स्क्रीनशॉट पाठवावा व नाव पाठवावे

     या स्पर्धेत महाराष्ट्रासह अन्य राज्यातील मराठी भाषिक स्पर्धक सहभागी होवू शकतात.या स्पर्धेतील सर्व गटातील विजेत्यांना अनुक्रमे   २५०१रु, १५०१रु,१००१ रु व  प्रमाणपत्र तसेच सर्वाधिक व्हयुजसाठी ५०१ रुपयांचे स्वतंत्र पारितोषिके व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.या स्पर्धेच्या  मुख्य संयोजन समितीमध्ये डॉ.संजय संजय सोनावणे (पनवेल),श्री शिरीष कुलकर्णी (पुणे),डॉ.महेश थोरवे-पाटील,श्री बाबासाहेब राशिनकर (गुहागर), सौ.शालन विलासराव कोळेकर (खंडाळा),श्री सागर पाटील (रत्नागिरी),श्री शेखर सुर्यवंशी (सांगली), श्री भगवान देवकर (कुरळप),अनील भालेकर(जालना),श्री बाळ तोरसकर (गोवा),श्री राजेंद्रकुमार ढगे (वसई ),प्रा.रावसाहेब राशिनकर (अहमदनगर),प्रा.महेश मोटे व डॉ.एस.एस.कनाडे (उस्मानाबाद),श्री माधव अंकलगे व श्री प्रकाश वंजोळे (खंडाळा) यांचा समावेश करण्यात आला आहे.

नवीन करंजा मत्स्य बंदरांची सहा फुटाने उंची वाढवा; खासदार श्रीरंग बारणे यांची मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे मागणी

उरण - मावळ लोकसभा मतदारसंघातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजा मत्स्य बंदराचे नव्याने काम सुरु आहे. या बांधकामाची उंची व भरतीच्या पाण्याची उंची यामध्ये फक्त एकच फुटाची तफावत आहे. त्यामुळे मोठ्या भरतीच्यावेळी आणि जोरदार वाऱ्यामुळे लाटा तयार झाल्यावर मासेमारी नौकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे नवीन कंरजा बंदराची सहा फुटाने उंची वाढवावी. नौकानयन मार्गाची (चॅनेल) 70 मीटरने रुंदी वाढवावी. बंदर प्रकल्पाच्या दक्षिण बाजूला (बाहेर) दगडाचे बांधकाम न करता सिमेंट काँक्रीटची भिंत बांधावी, अशी आग्रही मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली.

    नवीन बंदरामुळे मच्छिमारांना येत असलेल्या अडचणी, समस्या खासदार बारणे यांनी जाणून घेतल्या. त्यानंतर केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास  मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांची दिल्लीत प्रत्यक्ष भेट घेतली. मच्छिमारांना येणाऱ्या अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

    खासदार बारणे म्हणाले, नवीन करंजा मत्स्य बंदराचे काम अंतिम टप्प्यात आहे. 'ग्लोबल वॉर्मिंग'मुळे बंदराची उंची कमी केली जात आहे. ते धोकादायक आहे. जोरदार हवामानामुळे समुद्रातील लाटांचे पाणी आतमध्ये शिरुन मासेमारी नौकांचे नुकसान होऊ शकते. बंदराचे काम पूर्ण झाल्यानंतर उंची वाढविल्यास काम एकजीव होणार नाही. मासेमारी नौकांची ठोकर लागून काम पडून जाईल. त्यासाठी आत्ताच कंरजा बंदराची 5 ते 6 फुटाने उंची वाढवावी. सध्या तयार केलेला नौकानयन मार्गाची ( अॅप्रोच चॅनेल) फक्त 50 मीटर रुंद आहे. याचा अर्थ ऑपरेशन्ससाठी फक्त 40 मीटर वापरली जाईल. यामुळे चॅनेलमध्ये मासेमारी करणाऱ्या बोटींसाठी वाहतुकीची कोंडी होईल.  फिशिंग बोटींच्या सुरक्षिततेसाठी आणि सुलभतेसाठी या वाहिनीचा आकार 20 मीटर पर्यंत वाढविणे आवश्यक आहे. याची लांबी 70 मीटर असावी. ब्रेकवॉटरच्या भिंतीची लांबी खूपच लहान आहे. खराब हवामान आणि जोरदार वारा आल्यास  मासेमारीसाठी बोटींना अडचणी येतील. त्यामुळे त्याची लांबी सध्याच्या लांबीपेक्षा कमीतकमी 150 मीटरने वाढवावी.

     प्रकल्पाच्या दक्षिणेकडील भागात (करंजा फिशिंग हार्बर) फक्त दगडी भिंत बांधली जाणार आहे. ही संसाधने व जागेचा अपव्यय ठरेल. त्यासाठी काँक्रीटीकरणाची भिंत बांधावी. जेणेकरुन त्यात मासेमारी होडीची क्षमता वाढेल. इंजिन दुरुस्त करण्यासाठी तसेच मासेमारी करणाऱ्या बोटींच्या इतर दुरुस्तीसाठीही याचा उपयोग होईल. बंदराच्या बांधकामुळे करंजा नवपाडा येथील नैसर्गिक ड्राय डॉग प्रकल्प  विस्थापित झाला आहे. या पर्यायी बंदराच्या संरक्षणासाठी वादळी वारा सुरक्षिततेची काळजी घ्यावी. एक बोट दुसऱ्या बोटीवर आपटू नये यासाठी बांधलेल्या ब्रेक वॉटरची आत्ताची लांबी 200 मीटर आहे. त्यात 150 मीटरने वाढ केली पाहिजे. जेणेकरुन काम करत असलेल्या बोटींचे नुकसान होणार नाही.

      करंजा मत्स्य बंदर बहुउद्देशीय वापरासाठी 20 एकर जमीन पुरवतो. यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा विकसित होतील. स्थानिक तरुणांना अधिक रोजगार उपलब्ध होईल. फिशिंगवर आधारित उपक्रमांना संधी मिळेल. महिला सक्षमीकरण होऊन  स्थानिक महिला मासेमारीच्या कामांमध्ये तसेच विक्रीपासून ते प्रक्रियेपर्यंत सहभाग घेतील, असेही खासदार बारणे यांनी निवेदनात म्हटले आहे.यामुळे आता उंची वाढविण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मोरा पोलीस स्टेशनच्या ठिकाणी दारुड्यांचा हैदोस ; महिलांची सुरक्षितता धोक्यात

उरण - उरण शहरातील शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयासमोर मोरा पोलीस स्टेशनच्या इमारतीचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. तिथे वीज सुद्धा नाही. सदर परिसरात पोलिस स्टेशनचे इमारतीचे बांधकाम सुरू आहे. मात्र या ठिकाणी कोणीही नसल्याचे पाहून दारुडे,गर्दुले यांनी आपले ठाण मांडले आहे. आपला  बसतानच येथे मांडला आहे.दररोज येथे काही व्यक्ती दारू पिण्यासाठी येत आहेत. येथून जवळच असलेल्या रस्त्यावरून  येणार्‍या जाणार्‍या महिलांना, मुलींना याचा नाहक त्रास होत आहे.त्यामुळे महिलांची सुरक्षितता यामुळे धोक्यात आली आहे. सदर या परिसरात दारू पिणारे,टाइमपास करणाऱ्यांवर कडक  कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उरण तालुका संघटक सतीश पाटील, विभाग प्रमुख विभाग अध्यक्ष अनिकेत पाटील यांनी उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्याकडे केली आहे.

 उरण पोलीस ठाण्याचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी कोणी अवैध आणि बेकायदेशीर कामे करत असतील, महिलांना त्रास देत असेल तर त्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे रवींद्र बुधवंत यांनी सांगितले. या समस्या बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र बुधवंत यांनी तपास करण्याचे व संबंधितांवर कायदेशीर करण्याचे आदेश उरण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

शिवसपंर्क अभियानाच्या माध्यमातून नगरपरिषदेवर भगवा फडकविण्याचा संकल्प

उरण- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना पक्षाच्यावतीने जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्यात गावात खेडोपाडी शिवसंपर्क अभियान राबविले जात आहे. रायगड जिल्ह्यात वरिष्ठाच्या आदेशानुसार उरण तालुक्यातही शिवसंपर्क अभियान राबविले जात आहे. उरण शहर येथील तेरापंथी हॉल, वाणी आळी येथे शिवसंपर्क अभियानंतर्गत शिवसेना उरण शहर शाखेची सभा मोठ्या उत्साहात, उत्तम प्रतिसादासह संपन्न झाली.

   मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांचा 27 जुलै रोजी वाढदिवस असल्याकारणाने तसेच शिवसंपर्क अभियानाचे औचित्य साधून शिवसेना शहर शाखेतर्फे नागरिकांना मास्कचे वाटप तसेच गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर,जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT )चे विश्वस्त -दिनेश पाटील, उपजिल्हा संघटक -ममता पाटील, कोकण कार्याध्यक्ष शिक्षक सेना -कौशिक ठाकूर, उपजिल्हा अध्यक्ष -अन्वर कुरेशी,कक्ष जिल्हा प्रमुख -गणेश म्हात्रे,उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, तालुका संघटक -बी एन डाकी, तालुका संपर्क प्रमुख -जे पी म्हात्रे,तालुकाध्यक्ष अवजड वाहतूक सेना -चेतन म्हात्रे,तालुका संघटिका -सुजाता गायकवाड,विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम, युवा सेना पदाधिकारी -निलेश पाटील, शहर संपर्क प्रमुख -गणेश म्हात्रे,कामगार नेते महादेव घरत,उरण नगर परिषदेचे गटनेते गणेश शिंदे,नगरसेवक अतुल ठाकूर,नगरसेवक -समीर मुकरी,नगरसेविका वर्षा पाठारे, नगरसेविका विद्या म्हात्रे,माजी नगरसेवक निलेश भोईर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

    शिवसंपर्क अभियानंतर्गत शहर शाखेतर्फे भरविलेल्या सभेत उपस्थितांना माजी आमदार मनोहरशेठ भोईर, दिनेश पाटील, नरेश रहाळकर, संतोष ठाकूर, गणेश शिंदे आदि मान्यवरांनी मार्गदर्शन केले.यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी उपस्थितांना आवाहन करताना म्हणाले की शिवसेना हा एकमेव पक्ष आहे ज्याने कोरोना काळात उरण तालुक्यातच नाही तर संपूर्ण राज्यात उत्तम काम केले आहे. म्हणूनच एका संस्थेच्या सर्वे नुसार भारतात श्री उद्धव ठाकरे हे एक नंबरचे मुख्यमंत्री ठरले आहेत. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेना प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली पाहिजे. शिवसेनेच्या माध्यमातून उरण शहरात, उरण तालुक्यात शिवसेनेने अनेक कामे केली आहेत. अनेक गोरगरिबांना मदतीचा हात दिला आहे. कोरोनामध्ये अनेकांचे प्राण वाचविले आहेत.उरणचे विद्यमान आमदार महेश बालदी यांनी रांगोळी प्रदर्शन, कंदील प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन भरविले. याच्यापलीकडे त्यांनी काहीही केलेले नाही.मात्र शिवसेनेने नेहमी 80 % समाजकारण तर 20 % राजकारण केले आहे.उरण मध्ये जनतेचे सर्वाधिक काम शिवसेनेने केले आहे. नागरिकांच्या मदतीला धावून येणारा कोणता पक्ष असेल तर तो शिवसेना पक्ष आहे. जनतेचा सर्वाधिक विश्वास शिवसेनेवर असल्याने उरण तालुक्यात, रायगड जिल्ह्यात संबंध महाराष्ट्रात विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मुस्लिम बांधवही मोठया प्रमाणात शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत. येत्या काही महिन्यात उरण नगर परिषदेचे निवडणुका असून या नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकविल्याशिवाय गप्प बसणार नाही. सर्व शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उरण नगर परिषदेत जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील, नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा कसा फडकेल याकडे लक्ष द्यावे. नगर परिषदेवर भगवा फडकविण्यासाठी सर्वांनी मेहनत घ्यावी. असे आवाहन मनोहरशेठ भोईर यांनी केला . उरण नगर परिषदेवर यावेळी शिवसेनेचा भगवा फडकविणारच असा निर्धार शिवसेनेच्या विविध पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला. या शिवसंपर्क अभियानात शिवसेनेने भाजप पक्षावर जोरदार  हल्ला चढवीला. गणेश शिंदे, संतोष ठाकूर यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला.

   उरण शहर प्रमुख विनोद म्हात्रे, शहर संघटक -भूषण घरत, दिलीप रहाळकर, उपशहर प्रमुख -कैलास पाटील, अरविंद पाटील, गणेश पाटील, शहर प्रमुख युवा सेना नयन भोईर, शहर संघटिका -विना तलरेजा, मेघा मेस्त्री, शहर संपर्क संघटिका -श्रद्धा सावंत, श्रीमती वंदना पवार, उपशहर संघटिका रजिया शेख या शहर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर शिवसंपर्क अभियान सभा यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आदर्श शिक्षक महेश गावंड यांनी केले.

प्रसिद्ध अभिनेते, साहित्यिक, कवी आणि पत्रकार यांच्या उपस्थितीत आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार सोहळा संपन्न..!

मुंबई-दादर (प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर)  आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार वितरण सो...