आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०२०

मराठी चित्रपट निर्माता यांच्या अडी अडचणी सोडवणार — ना. बाळासाहेब थोरात.

मुंबई /  महेश्वर तेटांबे -नामदार श्री.बाळासाहेब थोरातजी  (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) तसेच मा.श्री.राजारामजी देशमुख साहेब (राजशिष्टाचार सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी दादर येथील टिळक भवन मध्ये संपन्न झालेल्या सभेमध्ये चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले असून यां चर्चासत्रात चित्रपट निर्माता व कामगारांच्या ज्वलंत प्रश्नावर चर्चा करण्यात आली आणि खालील विषय मांडण्यात आले. 

१) मराठी चित्रपटांचे प्रलंबित अनुदान त्वरित द्यावे. 
२) शासनाकडे सादर मराठी चित्रपट अनुदान प्रस्ताव परिक्षण न करता सरसकट अनुदान देऊन उपकृत करावे (२५० प्रस्ताव असून त्यांचे परिक्षण आणि ग्रेड यामध्ये आठ महिने अजून लागतील म्हणून विनाअट, विनापरिक्षण अनुदान द्यावे. 
३) चित्रपट कलाकार / कामगार / तंत्रज्ञ यांची अधिकृत नोंदणी सरकारकडे करण्यात यावी. 
४) कलाकर्मी यांना सरकारी पेन्शन योजना मध्ये बदल करून सुलभ योजना करावी. ५) मराठी चित्रपट अनुदान योजनेच्या काही अटी रद्द कराव्यात. या सर्व प्रश्नांवर आम्ही उपाय योजनाही सुचविलेल्या आहेत त्यावरही ताबडतोबीने कार्यवाही करण्याचे निर्देश मा. ना. श्री. बाळासाहेब थोरात साहेब यांनी दिले. याप्रसंगी श्री. बाळासाहेब गोरे, (सरचिटणीस - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, सांस्कृतिक विभाग) यांच्यासह देवेंद्र मोरे (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ), राजेंद्र बोडारे, विठ्ठल मांडवकर, तजेला बगाडे, दिपक गोडे, जयंत भालेकर, प्रिती जोखरे, संजय दिक्षित, रामदास अतकारी, विजय, आदी कलाकर्मी उपस्थित होते. या सभेत आमच्या मागण्यांबाबत सांस्कृतिक विभाग, महसूल विभाग, अर्थ विभाग यांच्या मा. मंत्री महोदय तसेच अधिकारी यांच्या सोबत पुढिल आठ ते दहा दिवसात एकत्रितपणे सभा करून मराठी चित्रपट व्यवसायात असलेल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्वरित प्रयत्न केला जाणार आहे.असे देखील ठरविण्यात आले.

बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२०

जिथे नागरिकांचे प्रश्न, तिथे त्वरीत उत्तर.... परिस्थिती गंभीर शिवसैनिक खंबीर याची पुन्हा एकदा प्रचिती

 

विरार (पालघर) /राजेश चौकेकर : येथील कारगिल नगर विभागातील गणेश चौक येथे घाणीचे साम्राज्य अशी एक विडियो ची पोस्ट पत्रकार आकाश पोकळे यांनी फेसबुकवर वायरल केली व त्या पोस्टची त्वरीत दखल घेऊन शिवसेना विरार उपशहर प्रमुख मा. उदय दादा जाधव यांनी वसई-विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील संबंधित अधिकार्यांना फोन करून व व्हॉट्सअप वर फोटो पाठवुन निदर्शनास आणुन देताच त्याठिकाणी त्वरीत घंटागाडी पाठवुन कचरा उचलायला सांगताच अर्धा तासाच्या आत त्या जागेवर महानगर पालिकेचे कर्मचारी यांनी कचरा गाडी नेऊन कचरा उचलण्यास सुरूवात केली व रोगराई पसरू नये म्हणुन स्वच्छता करून औषध फवारणी करण्यात आली वसई विरार महापालिकेने त्वरित दखल घेऊन आरोग्य सेवा पुरवल्या बद्दल आभार मानण्यात आले.

पालघर जिल्ह्यातील भ्रष्टाचाराबाबत युवा प्रहार ग्रुपने पुकारलेल्या उपोषणाला देवा ग्रुप फाउंडेशनचा जाहीर पाठिंबा

मुंबई(शांत्ताराम गुडेकर)

             सोमवार दि.२६/१०/२०२० पासून जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे विक्रमगड येथील युवा प्रहार ग्रुप ने पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभाग येथे झालेल्या कामाबद्दल तसेच भ्रष्टाचाराबद्दल बेमुदत आमरण उपोषण पुकारले आहे. त्यांच्या उपोषणास देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच पालघर जिल्हा यांच्या तर्फे जाहीर पाठिंबा दिला तसेच उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली व उपोषण यशस्वी व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या.

      यावेळी देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री.सुजित(पप्या भाई)ढोले, सचिव मा.श्री.तानाजी भाऊ मोरे,माजी कार्याध्यक्ष सुनील भाऊ गोरे,संघटक रवींद्र भाऊ पाटील तसेच स्वाभिमानी संघटना पालघर जिल्हाअध्यक्ष मा.श्री.जितेश(बंटी भाऊ)पाटील,प्रसाद भाई पाटील,निकेश सपाट,मनोज फोडसे,नितेश जाधव तसेच त्यांचे सहकारी व देवा ग्रुप फाउंडेशन पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सानप,उपजिल्हाध्यक्ष उमेश पाटील,संघटक संदीप पालवे,वसई तालुका उपाध्यक्ष सिद्धेश कदम,पालघर तालुका अध्यक्ष सुशांत धानवा,सचिव हरेश राऊत,मनोर विभाग प्रमुख कल्पेश दळवी तसेच इतर सदस्य पाठींबा देण्यासाठी उपस्थित होते.

सिध्दी कामथ यांची अ.भा.म.चि.महामंडळच्या तक्रार निवारण समिती सदस्य पदी नियुक्ती

मुंबई(शांत्ताराम गुडेकर )

    पक्षविरहीत सामाजिक राष्ट्रीय संघटना म्हणून कार्यरत असलेल्या भारतीय महाक्रांती सेना(नोंदणीकृत)च्या राष्ट्रीय प्रवक्त्या सिद्धीताई विनायक कामथ(अभिनेत्री/समाजसेविका) यांची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळतर्फे " तक्रार निवारण समिती"च्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र अ.भा.म.चि.महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिले.सिध्दी कामत यांची कोरोना काळात केलेली मदत लक्षात घेऊन विविध संस्था व मिडियातर्फे "कोरोना योध्दा"या सन्मानपत्रने गौरव केलेला आहे.सिध्दी कामत महामंडळाचे ध्येय ,धोरण व उदिष्ट्ये तसेच घटना नियमांच्या अधिन राहून प्रमाणिकपणे काम करतील व  तक्रारदारांना योग्य तो न्याय देण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करतील असे मत अनेकांकडून या नियुक्ती नंतर व्यक्त करण्यात आले.सिध्दी कामथ यांच्या या नियुक्तीबद्दल अ.भा.म.चि,महामंडळ कोल्हापूर प्रमुख कार्यालय तसेच मराठवाडा विभागीय कार्यालय,मुंबई शाखा कार्यालय,औरंगाबाद/सातारा विभागीय कार्यालय,पुणे शाखा कार्यालय पदाधिकारी व सदस्य,सभासद त्याचप्रमाणे अविनाश सकुंडे (राष्ट्रीय अध्यक्ष), संजय जाधव पाटील (राष्ट्रीय अध्यक्ष)वकील आघाडी , आनंद गुगळे (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष) सुलेमानभाई खान (मुंबई जिल्हा अध्यक्ष) यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी,सदस्य व विविध सामाजिक संघटना,मित्रपरिवारातर्फे अभिनंदनासह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.  

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यात यावेत ; 'धर्मराज्य पक्षा'ची गृहमंत्री अनिल देशमुखांकडे पत्राद्वारे मागणी !!

 मुंबई(शांत्ताराम गुडेकर)

                प्रसिद्धीमाध्यमांद्वारे प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, ठाणे शहरात सुमारे ७० टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याचे उघड झालेले आहे. ही बाब कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर स्वरूपाची अशी असून, एकट्या ठाणे शहरात सामाजिक सुरक्षिततेबाबत अशी दुरवस्था असेल, तर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात किती भयावह परिस्थिती असावी? असा सवाल 'धर्मराज्य पक्षा'ने उपस्थित करून, त्यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना ई-मेलद्वारे पत्र पाठवून, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्याची मागणी केली आहे. नुकतीच मुंबई, अंबरनाथ आणि पंढरपूर या ठिकाणी पोलिसांना झालेली मारहाण पाहता, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था किती बिघडलेली असावी, याबाबत चिंता व्यक्त करून, याच अनुषंगाने पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात त्वरित सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत, सन २०११ मध्ये घेतलेल्या निर्णयाची गृहविभागाने प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी केली आहे. आगामी सणासुदीचा काळ बघता, तसेच घातपाताची शक्यता लक्षात घेता, महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरांच्या मोक्याच्या व संवेदनशील  ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यात यावेत आणि याची गंभीरपणे नोंद घेण्याची विनंती नितीन देशपांडे यांनी आपल्या पत्रात केली आहे.

               सप्टेंबर-२०११ मध्ये स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी सुरक्षेसंदर्भात आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या कार्यशाळेला तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील, तसेच गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी उपस्थिती लावली होती. तेथील सुरक्षा यंत्रणांची पाहणी करण्याबरोबच कोणत्या यंत्रणा महाराष्ट्रात आणता येतील याचाही आढावा त्यावेळी गृहमंत्र्यांनी घेतला होता. १९६७ साली स्कॉटलंडमध्ये सर्वप्रथम सीसीटीव्ही बसविण्यात आला होता. तिथल्या कोणत्याही आस्थापनेत चोख सुरक्षाव्यवस्था असते. एवढे असूनही तिथली सुरक्षाव्यवस्था 'फ्रेंडली सिक्युरिटी'सारखी भासते. याच पार्श्वभूमीवर, २०११ साली सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी, सुरक्षा परिषदेच्या निमित्ताने, स्कॉटलंड यार्डच्या धर्तीवर मुंबईत व संपूर्ण महाराष्ट्रात सुरक्षा यंत्रणा राबविण्याचा निर्णय प्रसिद्धीमाध्यमांसमोर बोलून दाखवला होता. त्यावेळी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्राधान्याने उल्लेख केला होता. यादरम्यान, मुंबईत घडलेल्या बॉम्बस्फोटांच्या निमित्ताने आर.आर. पाटील यांनी मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत पाऊले उचलण्यास सुरुवात केली असली, तरी दुर्दैवाने त्यानंतर मात्र, राज्य सरकारने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसंदर्भात गांभीर्याने कार्यवाही केल्याचे जाणवले नाही. त्याचाच परिपाक म्हणून, ठाणे शहरात ७० टक्के सीसीटीव्ही कॅमेरे हे बंद असल्याचे ठामपणे सांगता येईल, असे देशपांडे यांनी नमूद केले आहे. तरी, महाराष्ट्राचे विद्यमान गृहमंत्री या नात्याने, करदात्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या मागणीचा विचार करावा आणि मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट दर्जाची सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची उभारणी करून, ती सक्षमपणे कार्यान्वित करण्यात यावी, अशी आग्रही मागणी 'धर्मराज्य पक्षा'चे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठवलेल्या पत्रात शेवटी केली आहे.

हिंदू सणांसाठी मराठी जनांसाठी फक्त "मनसे"

मुंबई(शांत्ताराम गुडेकर)

               लोअर परळ मधील आदित्य सेवा मंडळ, मोतिराम दयाराम चाळ येथे अनेक वर्षांपासून नवरात्र उत्सव साजरा केला जातो. सध्या सदर चाळ ही पुनर्विकास प्रक्रियेत आहे. अशा परिस्थितीमध्ये विकासक त्या जागेत  उत्सव साजरा होऊ नये म्हणून प्रयत्नांत होता म्हणजेच त्याचा उत्सव करण्यास विरोध होता असे स्थानिकांना समजले त्यांनी त्यासाठी परवानगी सुद्धा मागितली परंतु टाळाटाळ झाली सदर बाबीची तक्रार  स्थानिक रहिवाशी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोअर परळ प्रभाग १९८ येथील शाखा अध्यक्ष अमोल देसाई यांच्याकडे केली त्यानंतर त्यांनी लागलीच विकासकाला धारेवर  धरून उत्सव साजरा करायला देण्यास भाग पाडले. उप विभाग अध्यक्ष दत्ता पाटील व उपशाखा अध्यक्ष - सुहास नर, दिनेश निकम, शैलेश अहिर, निरंजन पाटील,समीर गोवळकर  उपवॉर्ड अध्यक्ष - अवधूत घाडीगावकर, संकेत आव्हाड व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. उत्सव साजरा करता आला म्हणून आदित्य सेवा मंडळ यांनी मनसे  पदाधिकारी  यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

मूलभूत अधिकार संघर्ष समिति व पेण खारेपाट विकास संकल्प संघटनांचे धरणे आंदोलन ; पेण खारेपाट विभागातील मत्स्यशेती ,पाणीप्रश्न ,शेती बंधारे या प्रश्नांवर 2 नोव्हेंबर रोजी कायमस्वरूपी तोडगा

 पेण / रायगड :

        मूलभूत अधिकार संघर्ष समिति व पेण खारेपाट विकास संकल्प संघटनांनी बुधवार  दिनांक 28 ऑक्टोबर रोजी   प्रांत कार्यालय समोर धरणे आंदोलन सकाळी  सुरू केले होते. आदल्यादिवशी  आंदोलन मागे घ्यावे असा निरोप मिळाल्यानुसार  आज प्रत्यक्ष  सर्वांनी प्रांत अधिकारी व पोलिस प्रशासनाने  सांगितलेली कोरोना पार्श्वभूमी व संचार बंदी कायदा या गोष्टी ध्यानात घेऊन  व प्रशासनाच्या विनंतीस सहकार्य करून  सदर  आंदोलन स्थगित केले असल्याचे  दिलीप म्हात्रे यांनी जाहीर केले. या धरणे आंदोलनासाठी  आधीच मिळालेल्या आगाऊ सुचने नुसार पोलीस प्रशासनाला सहकार्य करत व कोरोना महामारी लक्षात घेत संख्येने मोजकेच शेतकरी, कार्यकर्ते  प्रांत कार्यालयाजवळ  एकत्र आले होते. यावेळी  प्रांत अधिकारी यांनी या सर्व मागण्या संदर्भात विषय व त्यातील मागण्या मुद्दे विचारात घेऊन प्रत्येक मागण्यासंदर्भात  संबंधित विभाग यांना दिनांक 2 नोव्हेंबर रोजी  मीटिंगसाठी येण्याचे आदेश दिले असल्याचे तसेच  सर्व प्रश्नावर कसोशीने  मार्ग काढण्यात येईल, याबद्दल शंका नसावी असे अत्यंत काळजीपूर्वक सांगितले.


       आज करण्यात आलेली  धरणे आंदोलनात  तीन प्रमुख मागण्यांचा अंतर्भाव होता -

१)ऑगस्ट २०१९ मधील  नैसर्गिक आपत्ती दरम्यान झालेल्या मत्स्य शेती तलावाची नुकसान भरपाई मिळावी , सातबारावर मस्य शेतीची नोंद व मत्स्य तलावांचे रजिस्ट्रेशन  व इतरही प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत.

 २) रायगड पेण येथे दरवर्षी  भरपूर पाऊस पडतो.याठिकाणी  अनेक धरणे आहेत.तालुक्यातील  हेटवणे धरणाचे पाणी तर नवी मुंबईपर्यंत पंधरा वर्षांपूर्वीच पोहोचले. इतका प्रदीर्घ कालावधी लोटला तरी खारेपाट विभाग व इतर काही गावातील लोकांची  पाणी समस्या ही अगदी फेब्रुवारीपासून सुरू होते. कुठे टॅंकरने पाणी तर दोन दिवसातून एकदा पाणी दूषित -गढूळ पाणी अशी सद्यस्थिती आहे. कोरोना  महामारी आरोग्याच्या दृष्टीने पाणीप्रश्न अधिक  तीव्र झाला . पाणीटंचाईची हि   भीषण परिस्थिती लक्षात घेऊन मूलभूत अधिकार संघर्ष समितीने संबंधित खाती व तहसीलदार जिल्हाधिकारी यांना ई-मेल द्वारे निवेदन  दिले , एक जून 2020 ला ऑनलाईन आंदोलन केले .त्यावर अधिकाऱ्यांनी मीटिंग लावली परंतु पंधरा दिवसानंतर ही कामास सुरुवात झाली नाही. त्यानंतर पेण खारेपाट  विकास संकल्प संघटनेने पाण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले.  त्याला प्रतिसाद म्हणून अधिकारी वर्गाने  मीटिंग घेत सर्व मुद्द्यांची खुलासेवार चर्चा झाली .मात्र  तीन महिने उलटून गेले तरी कामात कोणतीच प्रगती झाली नाही.  या विभागातील ४० हजार लोक या पाणीटंचाईचा सामना कित्येक वर्षे करत आहेत.३) काही दिवसांपूर्वीच्या परतीच्या पावसामुळे   व ,खाडी बंधारा तूटुन समुद्राच्या भरतीचे खारे  पाणी   संपूर्ण  शेतात पसरले. यामुळे तयार पिके पाण्याखाली गेल्याने  शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले . यात सर्वात महत्त्वाचा गंभीर मुद्दा असणाऱ्या  बांध उघडीचा त्वरित बंदोबस्त  केला नाहीतर शेकडो एकर शेतीत हे खारे पाणी घुसू शकते . भविष्यात ही जमीन पूर्णतः नापिक होऊन शेतकऱ्यांच्या  कष्टाचे हक्काचे दोन घासही हिरावून घेतले जाऊ शकतात .अशा प्रकारे  या तीनही अत्यंत महत्त्वाच्या  स्थानिक शेतकरी नागरिकांच्या  प्रश्नासंदर्भात हे आंदोलन करण्यात आले  होते .  विभागातील जेष्ठ  सामाजिक कार्यकर्ते  राजेंद्र झेमसे यांनी या कामात आंदोलकांशी सतत संपर्क ठेवला होता. सदर  धरणे आंदोलनाच्या वेळी खारेपाट विकास संकल्प संघटनेचे अध्यक्ष  -पत्रकार प्रकाश माळी ,गणपत भाऊ, दिलीप म्हात्रे तसेच  मूलभूत अधिकार संघर्ष समितीचे संदीप रेणुका ,नंदा म्हात्रे, मंदाकिनी गायकवाड संतोष ठाकूर  आदी  कार्यकर्ते व  शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.


"2 नोव्हेंबर च्या  मीटिंग  मध्ये  प्रांत अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभावी तोडगा निघणे अपेक्षित आहे . आता मिटिंग मध्ये कुठल्याही  मागणी संदर्भात आश्वासन नको आहे तर त्वरित काम सुरू होऊन समस्या पूर्ण मार्गी  लागावी.इथल्या  शेतकरी ,नागरिकांच्या अत्यंत संतप्त , प्रक्षुुद्ध भावना आहेत तेव्हा यापुढे जनतेच्या नागरिकांच्या जगण्याच्या ,पाण्याच्या प्रश्नासंदर्भात सर्व नागरिकांनी एकत्र येऊन हा वर्षानुवर्षाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार केला आहे. " -  मोहिनी गोरे ,सचिव - मूलभूत अधिकार संघर्ष समिती

मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२०

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या कोकण प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. अलका नाईक यांची निवड


मुंबई - (दिव्या पाटील /पी. डी.पाटील )

              
        काव्यप्रेमी शिक्षक मंचाच्या  अनुभवी मार्गदर्शिका, तेजस्विनी महिला संस्था, पुणेच्या सल्लागार, नक्षत्रांचे देणे काव्यमंच, मुंबईच्या सहसचिव, पत्रकार, ओरिएनटल ह्यूमन राईट्स मुंबईच्या सेक्रेटरी, सुवर्णपदक प्राप्त सन्माननीय साहित्यिका, संपादिका *मा.डॉ.सौ.अलका भरत नाईक , मुंबई, यांची दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर “ अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या कोकण प्रदेश उपाध्यक्षपदी* ” नियुक्ती करण्यात आली आहे असे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. श्री. शरद गोरे यांनी घोषित केले आहे.
   डॉ नाईक यांची  अनेक  साहित्य संपदा प्रकाशित असून त्यांनी  आचार्य (डॉक्टरेट) ह्या बहुमान- पदवीसह अनेक मानाच्या उपाध्या प्राप्त केल्या आहेत; तसेच अनेक मोठमोठ्या संस्थेच्या आजी, माजी सभासद राहिल्या असून  प्रोसेसर ऑफ इकॉनॉमिक्स व कॉलेजच्या प्रमुख प्रशासक आहेत.   अनेक कविता, चारोळ्याचे लेखन, वाचन करताना  अनेक आवडी,छंद जोपासलेले आहेत. आतापर्यंत त्यांनी  अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय सभा-संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे, (नेपाळ, मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका, लंडन, दुबई ई.),  कैलास-मानससरोवर परिक्रमा पूर्ण केली आहे व त्यांचे  लेखन आजपर्यंत अनेक नामांकित वृत्तपत्र, मासिकात, दिवाळी अंकात प्रसिद्ध झाले असून   आपल्या दैनंदिन जीवनातील भरपूर वेळ सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, संशोधनात्मक, गरजू विद्यार्थ्यांना उद्बोधन करणे इ. कार्यासाठी सक्रिय राहून देत असतात.

     शाळा-कॉलेजातील विद्यार्थ्यांसाठी अर्थशास्त्र तसेच मोटिवेशनल ट्रेनर म्हणून काम करणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवून नवीन आधुनिक भारतासाठी सदैव वेगवेगळ्या मार्गाने विद्यार्थ्यांना मदत करणे-- मुंबई पुणे, कोकण इ.,    *नर्मदा किडनी* फाउंडेशनसाठी  काम करणे - किडनी बचाव आंदोलन,... *अवयवदान* चळवळीमध्ये सहभाग, अमोघ फाउंडेशन मुंबई यांच्याबरोबर *हेअर डोनेशन*- *केशदान* - चळवळीमध्ये सक्रिय सहभाग, तसेच *डिव्हाइन रेलेशन्स* यामध्ये कॅन्सर,टी. बी, कोड इत्यादी आजारातून बरे झालेल्या व्यक्ती तसेच  दिव्यांग व्यक्ती यांना जोडीदार निवडीसाठी एकत्र आणणे,  *आपनु घर वृद्धाश्रम* -बोरीवली यांच्यासाठी कार्य करणे, *ब्लाइंड* असोसिएशन बोरीवली यांना मदत करणे, कॅन्सर पेशंट नूरी मशिद लोअर परेल, बोर्जेस  होम वांद्रे -कॅन्सर पेशंट यांना मदत करणे कोकण विभागात महिला सबलीकरण आणि व्यवसाय वृद्धी करणे व यासाठी राजापूर- जैतापूर भागामध्ये काम करणे, याशिवाय मानसोपचार तज्ञ म्हणून म्हणून सदैव लोकांना मदत करणे, महिलांसाठी मोटिवेशनल ट्रेनर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ई., फिल्म रायटर्स असोसिएशनसाठी काम करणे, विविध संगीत आणि नृत्याचे कलाकारांना  सक्रिय मदत, विद्यार्थ्यांची मानसिकता सुधृढ व्हावी म्हणून अनेक ठिकाणी ग्रंथालयांना पुस्तके दान करणे ई. अनेक  कार्य अनेक वर्षे त्या सातत्याने करत आहेत. आज त्यांच्या वयापेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त असून राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार- (केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे हस्ते), शिक्षणाच्या प्रसारासाठी सुवर्णपदक चेन्नई, जीवनगौरव पुरस्कार अमरावती, हिरकणी पुरस्कार मुंबई,  कविरत्न पुरस्कार, बेस्ट टीचर अवार्ड, समाजसेवा पुरस्कार मुंबई संध्या न्युज पेपर अवार्ड, मुंबई, अखिल भारतीय राष्ट्रीय पत्रकार संघ, नाशिक यांच्यातर्फे विशेष समाजसेवा पुरस्कार, राष्ट्रीय रत्न अवार्ड, नागपूर अशा काही मानाच्या  पुरस्कारांचा समावेश आहे

  अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या कोकण प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने समाजात त्यांचे खूप कौतुक होत आहे. संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. श्री. राजकुमार काळभोर व कोकण प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रसनकुटे यांनी नाईक मॅडमना शुभेच्छा दिल्या आहेत . “ही नवीन जबाबदारी म्हणजेच ज्येष्ठांचा माझ्यावर असलेला विश्वासच आहे आणि ती मी आनंदाने  पार पाडेन” असे  डॉ. अलका नाईक यांनी यावेळी सांगितले.

कल्याणमध्ये ९ कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव ; सन्मान कर्तुत्वाचा,जागर स्त्री शक्तीचा...

कल्याण (प्रकाश संकपाळ)-

      सामाजिक बांधिलकी जपून महिलांच्या उत्कर्षांसाठी नि:स्वार्थ भावनेने कार्यरत व प्रसिद्धीच्या मोहापासून अलिप्त अशा ९ कर्तबगार महिलांच्या कार्याचा गौरव नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून करण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा स्वाती कदम यांच्या पुढाकाराने कल्याण परिसरातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व कोरोना महामारीच्या काळात गरजू व गरीबांना अहोरात्र मदत करणाऱ्या कोरोना योद्धा असलेल्या ९ महिलांचा सत्कार व सन्मानपत्र प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा स्वाती कदम,जिल्हाध्यक्षा नयना भोईर,जिल्हा सचिव वासंती जाधव,जिल्हा सहसचिव श्रेया भांबीड,जिल्हा संघटक भारती कुमरे,नगरसेविका तृप्ती भोईर,उपशहर अध्यक्षा गीता काट्रप,शहर संघटक वैशाली सोनटक्के,विभाग अध्यक्षा भारती डाकवे,सुधा शहा,उपविभाग अध्यक्ष जितेंद्र वाघचौरे, उपशाखा अध्यक्ष सागर कोळजे,मनवीसे अध्यक्ष विशाल वाघचौरे, समाजसेवक सतिश साळवी,पत्रकार चारुशीला पाटील,शाही मुल्ला,किरण गायकवाड, स्वप्नील कदम,
आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. 

रुपाली आळंदे, (पोलीस), अनुसया कांबळे (समाजसेविका), डॉ.वृषाली थोरात-घारगे ( वैद्यकीय सेवा), स्वरा देसाई ( पोलीस ), विद्या आरेकर ( वैद्यकीय ), गीता बोरगावकर ( लघु उद्योजिका), कविता लोखंडे ( पत्रकार ), डॉ. तेजस्विनी माळवी ( वैद्यकीय) आदींना साडी,चोळी,श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

   याप्रसंगी जिल्हाध्यक्षा स्वाती कदम यांनी महिलांचा सन्मान करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची परंपरा असल्याचे स्पष्ट करून कोरोना महामारीच्या काळात स्वताच्या जीवाची पर्वा न करता समाजातील गरजूंना मदत करून आपली सामाजिक बांधिलकी जपली असून भविष्यात त्यांनी अधिक जोमाने कार्य करण्याची ऊर्जा प्राप्त होवो तसेच स्त्री शक्तीचे वेगवेगळ्या क्षेत्रात निरंतर उल्लेखनीय कार्य सुरूच आहे.महिलांच्या सक्षमीकरण,सशक्तीकरणाला वाव देण्यासाठी,त्यांच्या कार्य कर्तुत्वाला सलाम करण्यासाठी आपण नेहमीच त्यांचा सन्मान केला पाहिजे.प्रत्येक स्त्रीचा सन्मान हा भारतीय संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे.स्त्री या देशाचे भविष्य ठरवणारी शक्ती आहे आणि ही शक्ती सक्षम बनविणे,तिला सन्मान देणे ही समाजाची जबाबदारी आहे.असे प्रांजळ मत जिल्हाध्यक्षा सौ.स्वाती कदम व्यक्त केले आहे.

रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

दसऱ्याचे महत्त्व

 

 ‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असं म्हणत विजयादशमीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्राचा शेवटचा दिवस म्हणजे दसरा. ९ दिवस अधिष्ठान केलेल्या देवीने महिषासूर राक्षसाचा या दिवशी वध केला असे म्हटले जाते. तसेच रामानेही याच दिवशी रावणाचा वध केल्याने या सणाला विजयादशमी असेही म्हटले जाते. रावणाचे दहन म्हणजेच वाईट वृत्तींचे दहन या दिवशी करावे असे मानले जाते. या दिवशी घरोघरी पूजा-अर्चा करुन शस्त्रांची, लक्ष्मीची आणि घरातील वाहनांची मनोभावे पूजा केली जाते. झेंडूची फुले आणि आंब्याची पाने यांना आजच्या दिवशी विशेष महत्त्व आहे. दाराला झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते. तसेच आपट्याची पाने सोने म्हणून लुटणे ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. एकमेकांना ही आपट्याची पाने देऊन तुमच्या कुटुंबात भरभराट होवो अशा शुभेच्छा दिल्या जातात. तसेच ‘सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा’ असे म्हटले जाते.

     साडेतीन मुहुर्तातील एक मुहुर्त म्हणून दसऱ्याच्या मुहुर्तावर नवी खरेदी, नवे करार, नव्या योजनांचा, चांगल्या गोष्टींचा प्रारंभ केला जातो. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा असे या दिवसाचे महत्त्व सांगितले जाते. या दिवशी घरोघरी मिष्टान्नाचा बेत केला जातो. याशिवाय कुटुंबातील मंडळी एकत्रितपणे देवीला जाण्याचाही प्रघात आहे. आपल्याला विजय मिळावा आणि तो जीवनात कायम राहावा यासाठी दस-याला सोने लुटले जाते. पुराणामध्ये सीमोल्लंघन, सोने लुटणे या संदर्भात विविध कथा सांगण्यात आल्या आहेत. मात्र या दंतकथा असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून आजच्या काळात आपट्याची पाने न देता नुसत्या शुभेच्छा द्या असे म्हटले जाते. मोठ्या शहरांमध्ये विविध संस्था संघटनांकडून रावणाच्या प्रतिकृतीच्या दहनाचे कार्यक्रमही आयोजित केले जातात.

   या दिवशाला सीमोल्लंघन म्हणूनही ओळखले जाते. याचे कारण शिवकालीन आणि पेशवेकालीन परंपरेत आहे. शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला. पेशवाईतसुद्धा या सणाचे महत्व मोठे होते. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत नक्की करत असत. अनेक शूर, पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राजावर स्वारी करण्यास जात असत. त्याला सीमोल्लंघन म्हणत. म्हणून हा दिवस सीमोल्लंघन म्हणून ओळखला जातो. आपल्या गावाची वेस ओलांडून जाणे याचा अर्थ सीमेचे उल्लंघन करणे.

संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी

शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२०

आदर्श वार्ताहर -काव्यांगण

 एकवीरा तुझा आलो शोधित दरबार .... 

तुझ्या साठी सोडूनी घरदार 

एकवीरा तुझा आलो शोधित दरबार //धृ//

मना गोड हुरहूर 

नाना शंकांचे काहूर

परि दर्शना आतूर 

तुझ्या साठी आलो दूर 

आम्हा पामरांचा करी गे स्विकार 

एकवीरा तुझा आलो शोधित दरबार //१//


या नरदेहा जन्मासि आलो 

षड्रिपूंनी हा  जर्जर झालो 

भार भूमिला व्यर्थचि ठरलो

मीच माझा मी ना उरलो

देह वायांचि गेला हा भरदार 

एकवीरा तुझा आलो शोधित दरबार //२//


या सृष्टीची तू निर्माती 

प्राणी जीवांची भाग्यविधाती

तूच पिता अन् प्रेमळ माता 

तूच गे आमुची त्राता  ! 

माझ्या काळजाची छेडितो सतार 

एकवीरा तुझा आलो शोधित दरबार //३//


चाल : तेरे राहोंमे खडे है दिल थामके हाय, हम है दिवाने तेरे नामके . 


- गीतकार  : रमाकांत पाटील  , केळवे बीच

अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी केंद्रसरकार कडून महाराष्ट्राला भरीव मदत द्यावी - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंचे पंतप्रधानांना पत्र ; लवकरच केंद्रीय अर्थमंत्री आणि कृषीमंत्र्यांचीही आठवले भेट घेणार

  मुंबई  -  महराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने महापूर येऊन हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले. शेतात पाणी आणि चिखल साचल्याने पुढील रब्बी पिकांचा हंगाम ही वाया जाणार आहे. त्यामुळे अतिवृष्टीने शेतकरी शेतमजुर पूर्ण उध्वस्त झाले आहे. त्यांना मदत देण्यासाठी;  पुन्हा  शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी महाराष्ट्राला केंद्र सरकार ने भरीव आर्थिक मदत देणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी तात्काळ  मदत देण्यात यावी यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ; अर्थमंत्री निर्मला सीतारामन; कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना पत्र लिहिले आहे. याबाबत ना रामदास आठवले लवकरच केंद्रीय अर्थमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री यांची भेट घेणार आहेत. 

    महराष्ट्र सरकार ने अतिवृष्टीग्रस्तांना अत्यंत तुटपुंजी मदत जाहीर केली आहे.अद्याप नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. अतिवृष्टीने पूल कोसळले आहेत त्यासोबत शेतकरी शेतमजूर सुद्धा मनातून कोसळले आहेत. त्यांना तातडीने मदत देणे आवश्यक होते मात्र राज्य शासनाने अद्याप मदत दिलेली नाही. एन डी आर एफ च्या माध्यमातून एकरी 37 हजाराची मदत मिळत आहे. ती केंद्र सरकारचीच मदत आहे.अतुवृष्टीत जीवित हानी झालेल्या कुटुंबाला सांत्वनपर केवळ 4 लाख रुपये राज्य शासन देत असून ती रक्कम अत्यल्प आहे त्यात वाढ करून किमान 10 लाख रुपये सांत्वनपर निधी अतुवृष्टीत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना  द्यावा   त्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्र पाठवीत आसल्याचे ना रामदास आठवले यांनी सांगितले आहे. तसेच पंढरपूर मध्ये चंद्रभागा नदी किनारी भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला . त्यांच्या कुटुंबातील  प्रत्येकी एका व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावी अशी आपली मागणी असून तसे पत्र मुख्यमंत्री आणि पंढरपूर पालिकेत देणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले. 

    ना. रामदास आठवले यांनी नुकताच अतिवृष्टीग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. बारामती; फलटण; पंढरपूर आणि आटपाडी दिघांची येथे पूरग्रस्त अतिवृष्टी बधितांची भेट घेऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. आटपाडी जिल्हा सांगली मधील दिघंची  गावात  शेतकरी संवाद ही केला. अतिवृष्टीग्रस्तांचा पाहणी दौरा करून आल्यानंतर ना.रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री ; केंद्रीय कृषी मंत्री यांना पत्र लिहून महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत देऊन अतिवृष्टीग्रस्तांना नवजीवन देण्याची मागणी केली.


रायगड जिल्ह्यात 35 धानखरेदी केंद्रांना मंजूरी

अलिबाग,जि.रायगड :- आधारभूत किंमत भात खरेदी योजनेंतर्गत मार्केटींग फेडरेशन, मुंबई यांनी नियुक्त केलेल्या अभिकर्ता संस्था, जिल्हा मार्केटींग रायगड यांच्यामार्फत खरीप व रब्बी पणन हंगाम 2020-2021 मध्ये जिल्हयातील अलिबाग, पेण, पनवेल, खालापूर, कर्जत, सुधागड, रोहा, श्रीवर्धन, माणगाव, महाड, पोलादपूर, म्हसळा या तालुक्यातील 35 मंजूर धानखरेदी केंद्रांवर खरेदी सुरु करण्यात येणार आहे. 

             भात खरेदीचा कालावधी हा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडील शासन निर्णय क्रमांक : खरेदी -1020/ प्र.क्र.104/ना.पु.29 दि.29 सप्टेंबर, 2020 अन्वये खरीप पणन हंगाम दि. 1 ऑक्टोबर, 2020 ते दि.31 मार्च, 2021 आणि रब्बी पणन हंगाम दि. 1 मे, 2021 ते दि. 30 जून, 2021  असा विहित केला आहे.

          भात खरेदीच्या वेळी शेतकऱ्यांनी आपल्याकडील जमिनीबाबतचा 7/12 चा उताऱ्याची व गाव नमुना-8 (अ) ची छायांकित प्रत खरेदी केंद्रावर धान विक्रीकरीता आणणे आवश्यक आहे. या उताऱ्यातील धान्य व धानाखालील क्षेत्र पाहून धान / भरडधान्य खरेदी करण्यात येईल. शेतकऱ्यांचे 7/12 उतारानुसार पीकाखालील क्षेत्र, या वर्षीची पीक परिस्थिती   (पैसेवारी), पीकाचे सरासरी उत्पादन या बाबी विचारात घेऊन, धान/भरडधान्य खरेदी करण्यात येईल.

           धानाची खरेदी ही ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने संबधित शेतकऱ्यांची नोंदणी करणे आवश्यक राहील. याकरीता खरेदी केंद्रावर भात विक्रीकरिता आणताना प्रत्येक शेतकऱ्याने आपल्यासोबत आधारकार्डाची तसेच बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत आणणे आवश्यक आहे. रोज सायंकाळी खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर खरेदी केंद्रांवर आणलेले, परंतु खरेदी न झालेले धान/भरडधान्य सांभाळण्याची जबाबदारी संबंधित शेतकऱ्याचीच राहील.

धानाच्या आधारभूत किंमती :-

      भाताचा प्रकार:- भात सर्वसाधारण, आधारभूत किंमत :-  रु.1 हजार 868 प्रति क्विंटल, शेतकऱ्यांना अदा करण्याची रक्कम:-  रुपये 1 हजार 868 प्रति क्विंटल.  

          भाताचा प्रकार :-  भात अ ग्रेड आधारभूत किंमत :- रुपये 1 हजार 888 प्रति क्विंटल, शेतकऱ्यांना अदा करण्याची रक्कम :-  रुपये 1 हजार 888 प्रति क्विंटल.

            आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत केंद्र शासनाने विहित केलेल्या विनिर्देशात बसणारे FAQ दर्जाचेच धान/ भरडधान्य खरेदी करण्यात येईल. केंद्र शासनाने हंगाम 2020-21 करिता आद्रतेचे अधिकतम प्रमाण धानासाठी 17 % विहित केले आहे. या प्रमाणापेक्षा आद्रता जास्त आढळल्यास भाताची खरेदी करण्यात येणार नाही. भात खरेदी करताना ओलावा व आर्द्रतेचे प्रमाण 17 टक्के असल्याची खात्री करुनच धान/भरडधान्याची खरेदी करण्यात येईल, कोणत्याही परिस्थितीत जास्त ओलसर किंवा बुरशीयुक्त धान/भरडधान्य खरेदी करु नये. विहित प्रमाणापेक्षा जास्त आद्रता असलेले धान/भरडधान्य खरेदी केल्यास अभिकर्ता संस्थांनी वेळीच संबधितांवर दंडात्मक कारवाई करावी.

            भरडधान्य स्वच्छ व कोरडे असून ते विक्री योग्य (मार्केटेबल) असल्याची अभिकर्त्यांनी खातरजमा केल्यावरच भाताची खरेदी करण्यात येईल. मात्र भात आद्रतेच्या विहित प्रमाणात असल्याची खात्री करुन ते स्विकाराल्यानंतर आद्रता कटाती लावण्यात येणार नाही. धान खरेदी करताना धान स्वच्छ कोरडे असावे.

               खरेदी केंद्रावर फक्त खरेदी किंमतीबद्दल दर फलक न लावता आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत असलेल्या धानाचा दर्जा, विनिर्देश, खरेदी केंद्रे तसेच एफ.ए.क्यू. दर्जाची मानके इत्यादी बाबतची माहिती मराठीतूनच फलकावर दर्शविण्यात यावी. तसेच खरेदी केंद्र व त्यांस जोडण्यात आलेल्या गावांची नावे याची प्रसिद्धी प्रत्येक धान खरेदी केंद्रावर अभिकर्ता संस्थांनी द्यावी.

             आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शासनाने निर्धारीत केलेल्या धानाच्या किंमती, दर्जा, खरेदी केंद्र व खरेदी केंद्रास जोडण्यात आलेली गावे दर्शविणारे फलक सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत, तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय इत्यादी ठिकाणी त्यांच्या नोटीस बोर्डवर दर्शनी भागात प्रसिद्ध करण्याबाबत सूचना दिल्या आहेत .केवळ शेतकऱ्यांकडून उत्पादित झालेले नवे धान/भरडधान्याची खरेदी करण्यात येईल.

             खरेदी केलेल्या धान/भरडधान्याची देय रक्कम शेतकऱ्यांना अदा करताना ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. ही रक्कम कोणत्याही परिस्थितीत धान/भरडधान्य खरेदी केलेल्या दिवसापासुन पुढील 7 दिवसापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी, अशा शासनाच्या सूचना आहेत.

            भात खरेदी केंद्राची ठिकाणे व त्यास जोडलेली गावे यांची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी, रायगड- अलिबाग, संबधित तहसिलदार/गट विकास अधिकारी, पंचायत समिती तसेच उप अभिकर्ता म्हणून काम करणाऱ्या सहकारी संस्था/खरेदी विक्री संघ/सहकारी भात गिरणी यांच्याकडे उपलब्ध राहील.

          जिल्हा मार्केटींग अधिकारी, रायगड यांच्या कडील पणन हंगाम 2020-21 करीता मंजूर धान खरेदी केंद्र :-

     1) अलिबाग-भुवनेश्वर सहकारी भात गिरणी लि., शिरवली,पो.हाशिवरे ता.अलिबाग, खरेदी केंद्र- शिरवली.     2) नवजीवन शेती अभिनव सेवा सह.संस्था लि., मु.पो.नांगरवाडी मालाडे, ता. अलिबाग, खरेदी केंद्र- नांगरवाडी-मालाडे. 3) विरेश्वर शेतकरी लाभार्थी सामाईक संयुक्त शेती सहकारी संस्था लि., मु.पो. रामराज ता.अलिबाग, खरेदी केंद्र- रामराज. 4) आभा अभिनव सर्व सेवा सह.संस्था लि., मु.पो. अलिबाग, खरेदी केंद्र-वावे. 5) पेण- पेण तालुका सहकारी ख.वि.संघ लि., पेण- खरेदी केंद्र- पेण. 6) वडखळ 7) कामार्ली 8) वढाव 9) काळभैरव नाविन्यपूर्ण सर्व सेवा सह. संस्था लि., मु.पो.ता.बोर्झे, ता.पेण, खरेदी केंद्र- बोर्झे. 10.) आदिती ॲगो प्रोड्युसर कं.लि., मु.पो.शिर्कीचाळ,  ता.पेण, खरेदी केंद्र- शिर्की चाळ. 11) पनवेल - पनवेल सहकारी भात गिरणी लि., मार्केडयार्ड, पनवेल, खरेदी केंद्र- मार्केड यार्ड, पनवेल-1, 12) खालापूर- नेताजी सह.भात गिरणी लि., मु.पो.चौक, ता.खालापूर. खरेदी केंद्र- चौक 13) कर्जत- नेरळ विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि., मु.पो.नेरळ, ता.कर्जत, खरेदी केंद्र- नेरळ,  14.) कर्जत तालुका शेतकरी सह.खरेदी विक्री संघ लि., मार्केटयार्ड दहिवली, खरेदी केंद्र- दहिवली., 15) वैजनाथ, 16) कडाव,  17) कशेळे सहकारी भात गिरणी लि.,मु.पो.कशेळे,ता.कर्जत, खरेदी केंद्र-कडाव, 18.) सुधागड- सुधागड तालुका खरेदी विक्री संघ, मु.पो.पाली, ता.सुधागड, खरेदी केंद्र- परळी, 19.) खरेदी केंद्र- पाली, 20.) राजेश राईस मिल, कान्हिवली, पो.पेडली ता.सुधागड, खरेदी केंद्र-पेडली 21.) खरेदी केंद्र-महागांव, 22.) खरेदी केंद्र-नांदगांव, 23.)  अनिकेत राईस मिल, झाप, पो.पाली, ता.सुधागड, खरेदी केंद्र- झाप, 24.) रोहा- भैरवनाथ दूध उत्पादक सहकारी संस्था लि.,मु.पो.यशवंतखार, ता.रोहा, खरेदी केंद्र- यशवंतखार, 25.) खरेदी केंद्र-रोहा 26.) खरेदी केंद्र- कोलाड 27.) खरेदी केंद्र-चणेरा, 28.) श्रीवर्धन- रानिवली वि.का. सेवा सहकारी सोसायटी लि., मु.पो.रानवली, ता.श्रीवर्धन- खरेदी केंद्र-रानिवली, 29.) माणगाव- माणगाव ता. शेतकरी सह. खरेदी विक्री संघ लि., मु.पो.ता.माणगाव  30.) धनंजय राईस मिल तळेगाव, मु.पो.तळेगाव, ता.माणगाव, खरेदी केंद्र- तळेगाव. 31.) महाड- महाड तालुका शेतकरी सहकारी ख.वि.संघ लि., मु.पो. महाड, ता.महाड, खरेदी केंद्र- महाड 32.) पोलादपूर- पोलादपूर तालुका सहाकारी ख.वि.संघ लि., मु.पो. पोलादपूर,  खरेदी केंद्र- पोलादपूर 33.) महिला औ.ऊ.सहकारी संस्था लि., मु.देवळे ता.पोलादपूर, खरेदी केंद्र- देवळे 34.) जननी कुंभळजा धान्यकोटी सह.सोसायटी, मु.पो.रानवडी, ता. पोलादपूर, खरेदी केंद्र- रानवडी. 35.) म्हसळा, ता.सह.खरेदी विक्री संघ लि., मु.पो.म्हसळा, खरेदी केंद्र- म्हसळा

एक सिम्मोलंघन असंही....

मनुष्य प्राणी हा अनेक कसोटींशी झुंजत , सामना करत जीवन व्यतीत करत असतो. प्रत्येकाचे जीवन हे समस्या तसेच तणावांनी भरलेले असते.  कोणी त्यावर विचारपुर्वक व हसत खेळत पर्याय काढतात तर कोणी रडत , कुढत व आहे नशिबातच असे जीवन जगत असते. असाच एक किस्सा आवर्जून सांगावसा वाटतोय. मी त्यावेळी शाळेत शिकत होते. आमच्या शेजारी नविन भाडेकरू म्हणून रहाण्यास आले होते. त्या मावशी - काकांना तिन्ही मुलीच होत्या.  मोठी मुलगी ही दुर्दैवाने खुपच लवकर विधवा झाली होती.  सासरच्यांनी सांभाळण्यास नकार दिला म्हणून ती माहेरी रहात होती. मनावर आधीच साठलेले दुख आणि त्यात आई - वडिलांनी अनेक बंधने लादले होते. विधवा आहे म्हणुन चार लोकांत बाहेर येऊन बोलायचं नाही.  कोणत्याही कार्यक्रमास जायचे नाही.  जासत हसायचं नाही.  मोजकचं खायचं . राहणीमान एकदम साधीच ठेवायची.. अशा प्रकारची कठोर बंधनं लादली गेगेल्याने त्या बिचारीचा कोंडमारा होत होता. तिच्या पालकांनाही कळत होते. पण पदरी तीन मुली असल्याने आधीच हताश झालेले. आणि त्यात ही विधवा .. त्यामुळे ते एकदम हतबल झावेले.. थोड्या जुन्या विचारांचे होते. माझ्या आईच्या लक्षात ही सर्व परिस्थिती आली. त्या लोकांशी चांगली ओळख झाली होती.  मग सहज गप्पांच्या ओघातून आईने यावर विषय काढला. आई पुरोगामी विचारांची असल्याने तिला हे विचित्र वागवागणूक अमान्य होती. आई अगदी नम्रपणे बोलली ,' काळाने आज तिच्यावर ही परिस्थिती उद्भवली आहे.  त्यामुळे तुम्ही तिला कायम घालून पाडून बोलणं योग्य आहे का?  तुम्ही जन्मदाते . असं धिक्कारून का वागणूक का देतात.. मुलगा हा वंशाचा दिवा आहे तर मुलगी पण घराची पणती असते हे का विसरतात. तुमच्या अशा वागण्या , बोलण्याने तीची किती तळमळ होते. तिच्याशी प्रेमाने , आपुलकीने व मोकळेपणाने वागलात तर तिच्या दुखाचा भार नक्कीच हलका होईल.  स्वच्छंदी व उल्हासित राहण्यास शिकेल. ती लवकर विधवा झाली यात तिचा काय दोष.. आईने पुढे न डगमगता , निडरपणे एक मुद्दा मांडला.  तो तिच्या पुनर्विवाहाचा.. आई शांतपणे बोलली , ' आज तुम्ही सोबत आहात . पण पुढे काय ? तिने आयुष्यभर असचं एकटीने जीवन जगायचं का ? ती दिसायला सुंदर.  त्यात तरूण .. तिला पण सर्व गोष्टी करण्याचा व स्वच्छंदी विहरण्याचा पुर्ण अधिकार आहे.  तिला पुढे शिकवून योग्य जोडीदार पाहून विवाह करून द्या.  आईचे बोलणे ती मंडळी शांतपणे ऐकत होते.  त्यांनाही ते पटले. आईमुळे त्यांचे मत परिवर्तन झाले.  आई बोलल्या प्रमाणेच त्यांनी तिचे दुसरे लग्न लावून दिले.  आज ती आपल्या संसारात व मुलांमध्ये खूप समाधानी व आनंदी आहे.  खरचं आईच्या परखडपणे बोलण्याने आज एका जीवाचे कल्याण झाले. आईने फक्त पुनर्विवाह प्रवृत्त करून तिला आधार मिळवून दिला व तिच्या आई - वडिलांना पुढील चिंता पासून बचावले. 

               



-सौ.  स्नेहा मुकुंद शिंपी  
   नाशिक 

गुहागर तालुक्यातील काताळे गावाचा सुपुत्र रोहित बारस्कर साकारतोय भिंतीवर हुबेहूब चित्र

कोकण(शांत्ताराम गुडेकर /दिपक कारकर)

           कोकण म्हटले की निसर्ग सौंदर्याने नटलेली रत्नाची खाणच ती! पावसाच्या थेंबाने जशी वसुंधरा हर्षित होऊन हिरवा शालू नेसून बळीराजाचे स्वागत करण्यास तयार असते आणि बळीराजा सुद्धा ह्या स्वर्गरूपी काळ्या मातीतून सोनं काढण्यास तयार होतो.अशाच कोकणच्या भूमीत रत्नागिरीच्या खाणीत अनेक कलारूपी रत्ने दररोज जन्मास येऊन अगदी ती नावलौकिक ठरली.असाच एक उमदा चित्रकार गुहागर तालुक्यात प्रत्येयाला येतोय.रत्नागिरी जिल्हातील गुहागर तालुक्यातील काताळे गावाचा सुपुत्र कु.रोहित महादेव बारस्कर सध्या आपल्या हस्तकला कौशल्याने भिंतीवर अनेक हुबेहूब चित्र रेखाटताना दिसतोय.प्रत्येक व्यक्तीच्या अंगी विविध कलागुण अगदी ठासून भरलेले असतात मात्र त्यांना व्यासपीठ किंवा मार्गदर्शन मिळत नाही.अगदी लहानपणापासून शिक्षणाबरोबर त्याला चित्र काढण्याची आवड होती.कुठेही बसल्या जागी समोर दिसेल ते चित्र आपल्या छोट्याच्या वहीत रेखाटायची सवय होती.!म्हणता म्हणता पुढे हिच सवय त्याचा छंद होऊन गेली आणि बघता बघता तो आपल्या शंभरपानी वहीवरून तीच चित्र भिंतीवर रेखाटू लागला.अशीच त्याने आपल्या घराच्या भिंतीवर अनेक चित्र काढली आहेत.एखादं चित्र काढल्यानंतर त्यात तो त्या चित्राला ऑइलपेंट रंगाचा वापर करून तो त्या चित्राला जिवंत बनवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतो आहे.घरची परिस्थिती हालाखीची असताना त्याच परिस्थितीत तो आपला छंद जोपासत आहे.आपल्या ह्या परिस्थितीवर मात करून त्याला भविष्यात मोठा चित्रकार होण्याचे त्याचं स्वप्न आहे.सध्या तो अशाच कामाच्या प्रतीक्षेत आहे.या युवा चित्रकाराने भविष्यात एक मोठा चित्रकार बनावं अशी आशा अनेकांना लागून राहिली आहे.रोहितच्या कला-कौशल्याचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

प्राथमिक शाळेच्या इमारतीस परवानगी नाकारल्याने ग्रामस्थ मंडळ नवघरचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण : आमदार महेश बालदि यांच्या मध्यस्थि नंतर उपोषण स्थगित ; वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून समस्या सोडविण्याचे महेश बालदि यांचे आश्वासन.

 

उरण (विट्ठल ममताबादे)- उरण तालुक्यातील नवघर गावातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा जीर्ण झाली असून ती मोडकळीस आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांच्या तसेच पालकांच्या जिवितेलाही धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी नवीन इमारत बांधणयात यावी तसेच वेळोवेळी डागदुजी करावी यासाठी नवघर ग्रामस्थ मंडळने शासन दरबारी अनेक वेळा पाठपुरावा केला मात्र कोणतेही योग्य ते प्रतिसाद मिळाला नाही.नवघर ग्रामपंचायत स्वतः नवीन इमारत बांधत नाही व गावातील ग्रामस्थांना लोक वर्गणी मधून नवीन इमारत बांधण्यास सुद्धा ग्रामपंचायत परवानगी देत नाही. शेवटी ग्रामस्थ मंडळ नवघर यांनी स्वतःपुढाकार घेवून लोक वर्गणी मधून प्राथमिक शाळा नवीन बांधून देण्याची तयारी दर्शविली तशी रितसर परवानगी ग्रामस्थ मंडळने नवघर ग्रामपंचायतकडे केली होती मात्र तरीही नवघर ग्रामपंचायत या कामाला परवानगी देत नसल्याने नवघर ग्रामपंचायतच्या निषेधार्थ नवघर ग्रामस्थ मंडळाने  दि 22 रोजी नवघर ग्रामपंचायत कार्यालया समोरच सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.


      नवघर जिल्हा परिषदेच्या मोडकळीस व जीर्ण झालेल्या शाळेबद्दल येणाऱ्या भावी पीढीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचे विचार करून नवघर जिल्हा परिषद शाळेचा डागदुजी करण्याचा तसेच नवीन इमारत बांधण्याची मागणी ग्रामस्थ मंडळ नवघर तर्फे विविध शासकीय स्तरावरही करण्यात आली. जिल्हा परिषदने एकहि रुपया अनुदान आमच्या कडून मिळणार नाही या अटीवर रायगड जिल्हा परिषदने ग्रामस्थ मंडळला व नवघर ग्रामपंचायतला परवानगी दिली आहे.मात्र ग्रामपंचायतने ग्रामस्थ मंडळला परवानगी दिली नाही.ग्रामपंचायत कडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने मंडळाने 2/10/2020 रोजी उपोषणाचा निर्णय घेतला असता याबाबत उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी पुढाकार  घेवून ग्रामपंचायत कार्यालयात 1/10/2020 रोजी नवघर ग्रामस्थ मंडळ व सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांच्यात चर्चा घडवून आणली. या चर्चेत विद्यमान सरपंच आरती चोगले यांनी शाळेची नवी इमारत ग्रामपंचायत स्वतः बांधणार असून तसे लेखी स्वरूपात येत्या 5 दिवसात नवघर ग्रामस्थ मंडळाला देण्याचे मान्य केले होते.परंतु आजतागायत तसे कोणतेही पत्र नवघर ग्रामस्थ मंडळाला मिळालेले नाही. ग्रामस्थ मंडळ लोक वर्गणीतुन नवीन शाळेची इमारत बांधण्यास तयार असताना सुद्धा नवघर ग्रामपंचायत परवानगी देत नसल्याने तसेच स्वतः ही शाळेची नवीन इमारत बांधण्यास पुढाकार घेत नसल्याने ग्रामपंचायतच्या या आडमुठे धोरणाच्या निषेधार्थ नवघर ग्रामस्थ मंडळाचे सर्व पदाधिकारी-सदस्य नवघर ग्रामपंचायत कार्यालया समोर एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाला बसले असल्याची माहिती उपोषणकर्ते नवघर ग्रामस्थ मंडळचे अध्यक्ष जयप्रकाश पाटिल यांनी दिली.सामाजिक कार्यकर्ते सुधीर घरत यांनी आक्रमक भूमिका घेत या उपोषणाला जाहिर पाठिंबा दिला असून जो पर्यंत लेखी पत्र ग्रामपंचायत देत नाही व आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत या अन्याया विरोधात लढा चालूच ठेवणार असल्याचे सांगितले.


    जयप्रकाश पाटिल-अध्यक्ष ग्रामस्थ मंडळ नवघर,अमित बंडा-ग्राम सुधारणा मंडळ नवघरपाडा,राजेश कडु-कार्याध्यक्ष, प्रतीक घरत-उपाध्यक्ष, अमित जोशी-सेक्रेटरी, राजेश पाटिल-सहसेक्रेटरि,ज्ञानेश्वर भोईर-खजिनदार, समाधान तांडेल-सहखजिनदार,सामाजिक कार्यकर्ते सुधीर घरत आदि ग्रामस्थ मंडळ नवघरचे पदाधिकारी-सदस्य यावेळी या लाक्षणिक उपोषणात सहभागी होते. या बाबतीत नवघर ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आरती चोगले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही स्वतः शाळेसाठी नवीन इमारत बांधणार असल्याचे सांगितले. आजपर्यंत आम्ही अनेक विकासकामे केली आहेत. पुढ़ेही करत राहु. नवीन शाळा बांधण्यासाठी नवघर ग्रामपंचायत कडून सर्वतोपरि प्रयत्न चालू आहेत.कोनाचेही मन दुखावण्याचा किंवा कोणाला त्रास देण्याचा आमचा मुळीच हेतु नाही. गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक यांना सर्वप्रथम न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे.जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी नवघर ग्रामपंचायतने नेहमी पुढाकार घेतला आहे.नवघर ग्रामस्थ मंडळने ग्रामपंचायतवर केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. ग्रामपंचायत वर केलेले आरोप खोटे आहेत.नवघर ग्रामपंचायतला बदनाम करण्याचे हे प्रयत्न चालू आहेत. तेंव्हा लवकरच ग्रामपंचायतच्या माध्यमातून शाळेची नवीन इमारत उभी राहणार असल्याचे आरती चोगले यांनी सांगितले

      एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाच्या शेवटी उरण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार महेश बालदि यांनी मध्यस्थि करून हा वाद मिटवत मी वरिष्ठ शासकीय अधिकारी वर्गांपर्यंत याचा आमदार या नात्याने पाठपुरावा करेन असे प्रत्यक्ष उपोषण स्थळी आश्वासन दिले. आमदार यांनी दिलेल्या आश्वासना नंतर उपोषण स्थगित केले

न्यायप्रिय महात्मा राजा रावण यांची दहन करण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करा ! अन्यथा ऑट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करा - अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्य व बिरसा क्रांती दलाच्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन ; महाराष्ट्रात आदिवासी समाजासह वीरशैव लिंगायत समाजातही महात्मा रावण पूजनीय : महात्मा रावण दहन करण्याची प्रथा बंद करावी यासाठी आदिवासी समाजासह वीरशैव लिंगायत समाजही प्रयत्नशील



उरण (विट्ठल ममताबादे)-

    महात्मा राजा रावण हे अत्यंत समृद्ध संस्कृतीच्या वैभवशाली वारस्याचा दैदिप्यमान अविस्मरणीय ठेवा आहे. महान, दार्शनिक, संगीततज्ञ, राजनीतीतज्ञ, शिल्पकार, आयुर्वेदाचार्य, विवेकवादी, उत्कृष्ट, नगररचनाकार, समताधिष्ठित, समाजव्यवस्थेचा उद्गाता, साहित्यिक, न्यायप्रिय राजा असून देवांचा देव शंकराला प्रसन्न करणारा पहिला भक्त असून अशा अनेक गुणांचा अविष्कार असणारा महात्मा राजा होता. अशा महान राजाला इथल्या षड्यंत्रकारी, वर्णांध व्यवस्थेने बदनाम करण्यात कोणतीही कसूर ठेवलेली नाही. त्यांस खलनायक म्हणून प्रसिद्ध केले आहे.

        आदिवासी समाजातील,वीरशैव लिंगायत व इतर समाजातील संशोधक, साहित्यिक यांनी महात्मा राजा रावण यांचा खरा इतिहास शोधून काढला व जगासमोर मांडला आहे. वास्तविक राजा रावण सारखा महापराक्रमी योद्धा झाला नाही.आदिवासी तसेच वीरशैव लिंगायत समाजात प्रमुख देवते पैकि एक महत्वाची देवता म्हणून महात्मा रावण यांची पूजा अर्चा केली जाते. तामिळनाडूमध्ये रावणाची साधारणतः ३०० पेक्षा अधिक मंदिरे आहेत. छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, महाराष्ट्रातही अमरावती जिल्ह्यात मेळघाटसह सर्वत्र राज्यभर महात्मा राजा रावणाची पूजा केली जाते. रावण हे आदिम संस्कृतीचे श्रद्धास्थान व दैवत आहेत.परंतु आदिवासींच्या या समताधिष्ठित समाजव्यवस्थेचा उद्गाता असलेल्या, न्यायप्रिय राजा रावणाला जाळण्याची कुप्रथा व परंपरा जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जातात. म्हणून रावण दहन करण्याची परवानगी कोणालाही देऊच नये तर ही प्रथाच बंद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

       जर का ? दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करण्याचा प्रयत्न केला गेला तर सर्व आदिवासी समाजाकडून तीव्र स्वरूपात जाहीर निषेध व्यक्त करण्यात येईल. या दरम्यान जे सवर्ण या विकृत विक्षिप्त कृतीचे समर्थन करतील? आमच्या आदिवासी बांधवांच्या भावना दुखावतील, आमच्या न्यायप्रिय राजाला अपमानित करतील अशा लोकांविरुद्ध अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत तसेच भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत १५३(अ),२९५,२९८,मुंबई पोलिस अँक्टनुसार १३१,१३४,१३५ कलमान्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.याकरिता रायगड जिल्ह्यातील कर्जत, पनवेल तालुक्यातून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व विविध सामाजिक क्षेत्रात काम करणा-या कार्यकर्त्यांकडून तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.सदर निवेदन देताना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र राज्य युवा सरचिटणीस, पञकार गणपत वारगडा, पनवेल तालुका अध्यक्ष संजय चौधरी, सामाजिक कार्यकर्ते बी. पी. लांडगे, समाजसेविका कविता निरगुडे, बिरसा क्रांती दलचे चेतन बांगारे, पांडुरंग गावंडा, एकनाथ वारघडा, प्रकाश शिद, प्रणाली वाघ, संगीता निरगुडे आदी. कार्यकर्ते उपस्थित होते.


[ महात्मा रावण हे आदिवासी समाजाचे राजे होते, दैवत होते, कट्टर शिवभक्त व न्यायप्रिय राजा म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे समस्त वीरशैव लिंगायत समाजात महात्मा रावण पूज्यनीय आहेत त्यामुळे 

दस-याला महात्मा रावण दहन करण्याच्या प्रथेला आमचा विरोध असून ही प्रथा भारत सरकारने बंद करावी अशी मागणी आम्ही करत आहोत.]]

 - प्राध्यापक मनोहर धोंडे. संस्थापक अध्यक्ष शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना.

टेंभी बोईसर येथे अवधूत पंडित यांच्या निवासस्थानी पहिला नवचंडी यज्ञ संपन्न

मुंबई( उत्कर्ष  शांत्ताराम गुडेकर) 

                 अश्विन शुध्द प्रतिपदेपासून शरद हृतुचे आगमन होते. प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजर्‍या होणार्‍या देवीच्या या उत्सवास शारदीय नवरात्र म्हणतात. ९ दिवस उत्सव चालतो म्हणून नवरात्र. १०व्या दिवशी उत्सवाची समाप्ती होते.नवरात्र हा वार्षिक महोत्सव असून घरोघरी साजरा होणे आवश्यक आहे. आपण दररोज पूजा करीत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे, तिचे आपल्या घरावर व कुटुंबियांवर कृपाछत्र असावे आणि अदृष्य शक्तीपासून तिचे आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र व्रत सांगितलेले आहे. नवरात्र व्रत जितके आवडीने, भक्तीने, हौसेने व मनःपूर्वक केले जाते, तितक्या अधिक प्रमाणात त्या घरात एकोपा, शांती, सुख व समाधान नांदते.दुर्गामातेचे सातवे स्वरूप श्रीशक्ती-सिध्दकालरात्री या नावाने प्रसिद्ध   आहे.नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते.या दिवशी साधकाचे मन ‘सहार’ चक्रात स्थिर झालेले असते.यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धिंचे दरवाजे उघडू लागतात.या चक्रात स्थिर झालेल्या साधकाचे मन पूर्णत: कालरात्रीच्या रूपाकडे आकर्षित झालेले असते.तिच्या साक्षात्कारापासून मिळणार्‍या पुण्याचा तो भागीदार होतो. त्याच्या संपूर्ण पापांचा नाश होतो. त्याला अक्षय पुण्य लोकांची प्राप्ती होते

      टेंभी बोईसर येथे श्री.अवधूत पंडित यांच्या  घरी माता महालक्ष्मी च्या समोर AVEER ENTERTAINMENT PRIVATE LIMITED कंपनीचा पहिला नवचंडी यज्ञ संपन्न झाला. सकाळी साडे अकरा वाजता यज्ञास प्रारंभ झाला श्री.पंढरीनाथ मंडलिक गुरुजी मुरबाड यांच्या  मार्गदर्शनाखाली सर्व विधी करण्यांत आले. प्रथम परिसरातील सर्व देवतांना आमंत्रण देण्यांत आले. यजमनाना  पंचगव्य देऊन यजञोपवीत देण्यात आले. नंतर स्वस्ति वाच करून सर्व देवतांचे नामस्मरण करून कार्यक्रमाचा संकल्प करण्यांत आला त्यानंतर गणेश पूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली.त्यानंतर पुण्याहवाचन करून देवाकडे कार्य सिद्दी चे मागणे मागण्यात आले. पुढे मातृका  पूजन म्हणजे शक्ती पूजन करण्यात आले त्यानंतर नांदी श्राध्द करून कार्य सिद्धी साठी आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांचे पूजन व आशीर्वाद घेऊन आचार्यवरण करण्यांत आले नंतर सर्वतोभद्र मंडळ स्थापन  करून ६२ देवतांचे पूजन करून  ब्रम्ह्याची स्थापना करण्यात आली. महालक्ष्मीचे पूजन करून दोन्ही देवतांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, शोडोष उपचाराने पूजन करण्यात आले त्यानंतर अग्नी स्थापन करून हवनास प्रारंभ झाला प्रथम पारंपरिक पद्धतीने सर्व उपचार करून गणेशाच्या अथर्वशीर्ष पठणाने आहुत्या देण्यांत आल्या त्यानंतर नवग्रह ब्रम्हा ह्यांच्या  आहूत्या मृत्युंजयाच्या आहुत्या देण्यांत आल्या नंतर मुख्य चंडी यज्ञास सुरवात करण्यांत आली त्यामध्ये पायस,पुरण,बेल पत्र,दुर्वा तसेच हवनिय द्रव्य यांच्या  एक हजार आहूत्या देण्यात आल्या. नंतर परत महालक्ष्मी मातेच्या एकशे आठ आहुत्या   देण्यात आल्या नंतर पूर्णाहुती मध्ये साडी चोळी नारळ फळ नैवेद्य व इतर पदार्थांचा समावेश करून पूर्णाहुती करण्यांत आली, पुढे आरती तीर्थ प्रसाद ग्रहण करून पांच ब्राम्हणांना ब्रम्ह भोज देण्यात आले तद्नंतर यजमान आणि पाहुणे मंडळींचा भोजनाचा कार्यक्रम पार पडला ब्रम्हवृंनदाना यथोचित दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले उपस्थित पाहुण्यांचा श्रीफळ चूनरी देऊन योग्य सत्कार केला तसेच उत्तर पूजन  करून अग्नीचे विसर्जन करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमास पत्रकार समीर खाडिलकर ( नाट्य- सिने निर्माता, सदस्य- महाराष्ट्र हरित सेना वन विभाग- महाराष्ट्र  शासन), विकासक संदिप परब,शांत्ताराम गुडेकर,शरद पंडित(वडिल),विपुल पडित(भाऊ) आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली

नगरसेवक प्रकाश मोरे यांच्या प्रयत्नातून नागरिकांसाठी दुमजली आरसीसी निर्मित तीन शौचालयाचे लोकार्पण

 


मुंबई(शांत्ताराम गुडेकर)

       भारतीय जनता पार्टीच्या खासदार पूनम महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली चांदीवली विधानसभा अध्यक्ष, नगरसेवक प्रकाश मोरे यांनी आपल्या नगरसेवक निधीतून असल्फा व्हिलेज साकिनाका प्रभाग क्रमांक १५९ येथील नवनिर्मित तीन ठिकाणी नागरी शौचालयाचे लोकार्पण केले. नगरसेवक प्रकाश मोरे यांच्या प्रभागातील लोकांची महत्वाची मागणी होती ती शौचालय बनवण्याची नागरिकांची ही गरज ओळखून विभागात अनेक ठिकाणी नागरी काम सुरू केली आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी शौचालय निर्माण केले जात असून नुकतेच दुमजली, आरसीसी निर्मित तीन शौचालयाचे लोकार्पण नगरसेवक प्रकाश मोरे यांनी केले. या उदघाटन प्रसंगी वॉर्ड अध्यक्ष परशुराम शिंदे, समाजसेवक संभाजी लाड, जिल्हाध्यक्ष उत्तर मुंबई युवा मोर्चा,सुनील दुबे, सचिन भोर, शांताराम ठुकृरूल, पांडुरंग म्हसकर, सुदाम पालवे, प्रशांत मिश्रा, अमोल नलावडे, फजी सिद्धीकी, गणेश भोसले, मधू परब, श्रीनाथजी दुबे, रुपेश भाई जैन, चौधरी शेठ आधी उपस्थित होते.

उद्यापासून राज्यातील जिम पुन्हा सुरू होणार ; जाणून घ्या नियमावली

मुंबई – राज्यातील व्यायामशाळा दस-यापासून (२५ ऑक्टोबर ) पुन्हा सुरू होणार आहेत.यासंबंधी राज्यसरकारने अधिकृत आदेश जारी केला आहे.दस-याला राज्यातील जिम सुरु करणार असल्याची माहिती याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती.लॉकडानमुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असणाऱ्या जिम सुरु करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली असून त्यासंबंधीचा अधिकृत आदेश जाहीर करण्यात आला आहे.

संपूर्ण राज्यभरात २५ ऑक्टोबरपासून जिम सुरु करण्यासाठी परवानगी देत आहोत. ही परवानगी कंटेनमेंट झोनबाहेरील जिमसाठी आहे.यासंबंधीची नियमावली सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात येईल.

यावेळी केंद्रीय आरोग्य विभागाने आखून दिलेल्या नियम लक्षात घेतले जातील. करोनासंबंधित सर्व नियमांचं पालन केलं जावं असं आदेशात म्हटले आहे.

या नियमांचे पालन बंधनकारक :

जिममध्ये शारीरिक अंतर, हातांची स्वच्छता आणि मास्क वापरणे या नियमित गोष्टींबरोबरच, क्षेत्रफळांनुसार जास्तीत जास्त सुरक्षित शारीरिक अंतर राखणे आवश्यक,व्यायामशाळा सदस्यांना संपूर्ण नियमावलीची माहिती द्यावी,व्यायामशाळेच्या वेळा, तसेच मर्यादित संख्येत प्रवेश देणे, व्यायामशाळेचे दर तासाला निर्जंतुकीकरण करणे, उपकरणांमध्ये अंतर ठेवणे, वापरानंतर त्यांचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असेल. प्रशिक्षक, अन्य व्यवस्थापकीय अधिकारी यांची वारंवार आरोग्य तपासणी करावी. सामूहिक व्यायाम प्रकार झुम्बा, स्टीम, सौना बाथ बंद राहणार. दररोज रात्री व्यायामशाळा बंद झाल्यानंतर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.

राशी स्टुडिओ लोगो अनावरण आणि " देवां तुला शोधू कुठे " लघुपटाचा प्रकाशन सोहळा संपन्न...!

मुंबई /  महेश्वर तेटांबे : परळ लालबाग म्हंटलं की कामगार वर्ग आलाच अशा या गजबजलेल्या कामगार वस्तीत अद्यावत असलेला आणि कामगार वर्गातील कलाकारांच्या खिशाला परवडणारा अशा यां राशी स्टुडिओचे नूतनीकरण नुकतंच पार पडलं असून त्याचं औचित्य साधून करिरोड येथील राशी स्टुडिओ मध्ये राशी स्टुडिओच्या लोगोचे अनावरण आणि पारंबी प्रॉडक्शन निर्मित आणि अक्षय वास्कर दिग्दर्शित देवां तुला शोधू कुठे या लघुपटाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथि प्रसिद्ध अभिनेत्री संजीवनी पाटील (वछ्छी) - मालिका - रात्रीस खेळ चाले, अभिनेता सुरेश डाळे, दिग्दर्शक-पत्रकार महेश तेटांबे, रसिका थिएटर चे सर्वेसर्वा आबा पेडणेकर, प्रसिद्ध सूत्र संचालक दिव्येश शिरवाडकर, दिग्दर्शक गणेश तळेकर, राशी स्टुडिओचे संचालक राकेश शेळके आणि शितल माने, निर्माती चंद्रकला प्रकाश वासकर, संकलक क्षितिज लादे व श्वेता लादे, लेखक सनीत मालुसरे, महिला उद्योजिका सौ.स्वप्नाली सचिन देशमुख, श्री.सचिन देशमुख, सौ.पुनम रणजित देशमुख, छायाचित्रकार अनमोल चव्हाण, संकलक कुणाल बने, संगीतकार मंदार पाटील, रंगभूषाकार मनिषा पाटील,गीतकार यज्ञेश दौड, कार्यकारी निर्माता सागर सुरलकर तसेच सिने क्षेत्रांतील आदी मान्यवर उपस्थित होते. 

      याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपापल्या परीने शुभेच्छा दिल्या. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या उदार भावनेने प्रेरीत होऊन निर्माता दिग्दर्शक अक्षय वास्कर यांनी " देवां तुला शोधू कुठे " या लघुपटाची निर्मिती करुन आपल्य़ा कुशाग्र दिग्दर्शनातून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या लघुपटाला आतापर्यंत अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण भारतात १२८ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत़. देवप्राप्ती हे उचित ध्येय गाठण्यासाठी ध्येयवेडा मुलगा आपल्य़ा प्रयत्नांची पराकाष्ठा करुन आपलं ध्येय कसं साध्य करतो आणि त्यांत त्याला कशाप्रकारे यश मिळते हे या कथेत मांडले आहे. येत्या विजयादशमी च्या मुहूर्तावर हा लघुपट MX play, Shemaroo Me, Hangama paly, Airtel Xstream, Vi Movies आणि TV JioCinema या प्रसिद्ध अशा OTT माध्यमांतुन प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे असे आवाहन दिग्दर्शक अक्षय वास्कर यांनी केले आहे. त्याचबरोबर राशी स्टुडिओचे संचालक राकेश शेळके आणि शितल माने आणि दिग्दर्शक अक्षय वास्कर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानून यां सोहळ्याची सांगता केली.



आमदार सौ. गीता जैन यांचा शिवसेना प्रवेश


ठाणे : मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या माजी महापौर, नगरसेविका व विद्यमान आमदार सौ. गीता जैन यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केले.या वेळी शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख ना. आदित्य ठाकरे, शिवसेना नेते ना. एकनाथ शिंदे,खा. राजन विचारे, मीरा भाईंदर संपर्कप्रमुख आ. प्रताप सरनाईक, आ. रविंद्र फाटक, माजी आमदार श्री. गिल्बर्ट मेंडोंसा उपस्थित होते.


 

सिनेरामा प्रॉडक्शनचा एकपात्री आणि एकेरी नृत्य स्पर्धेचा निकाल जाहिर...!

मुंबई /महेश्वर  तेटांबे :  कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर आणि सततच्या लॉकडाऊनच्या काळात संजू एन्टरटेन्मेन्ट - संजय यादव प्रायोजित सिनेरामा प्रॉडक्शन इवेंट अँड मिडियाने  प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही तुमच्यातील कलाकारांसाठी या स्लोगनमार्फत स्पर्धकांना ऑनलाइन एकपात्री आणि एकेरी नृत्य स्पर्धेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी दिली होती. आणि यां संधीचा योग्य तो लाभ घेऊन संकटकाळी देखील स्पर्धकांनी स्पर्धेसाठी उतम प्रतिसाद दिला. या ऑनलाइन एकपात्री स्पर्धेत प्रथम क्रमांक धनिष्ठा काटकर - सातारा,द्वितीय क्रमांक तृप्ती धुरी, तृतीय क्रमांक हर्षद चुरी - पालघर  उतेजनार्थ साची नागोटकर, प्रज्ञा साबळे, आर्य तेटाबे - लालबाग, परळ  

इत्यादी स्पर्धकांना रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात आले. 

            तसेच ऑनलाईन एकेरी नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक श्राव्या मयेकर - जोगेश्वरी,द्वितीय क्रमांक श्रुती रत्नपारखे - ठाणे ,तृतीय क्रमांक धनिष्ठा काटकर - सातारा, उतेजनार्थ अकिल जमादार - पिंपरी पुणे, तनिषा मोहिते - ठाणे या स्पर्धकांना रोख बक्षीस आणि बक्षीस पात्र  कलाकारांना " राम माळी सिनेरामा" या यूट्यूब चैनलवर संधी दिली जाणार आहे. या ऑनलाईन एकपात्री स्पर्धेचे परीक्षक म्हणून दिग्दर्शक - पत्रकार महेश तेटांबे, लेखक साहित्यिक किमंतु ओंबळे यांनी काम पाहिले आणि ऑनलाईन एकेरी नृत्य स्पर्धेचे परिक्षक म्हणुन "अग्गं बाई सासू बाई " या मालिकेतील धामनस्कर बाई ,आणि "रंग माझा वेगळा" यां मालिकेतील अंजली अशा व्यक्तिरेखा साकारणाऱ्या नृत्यदिग्दर्शिका अंजली शिरगांवकर यांनी काम पाहिले. कोरोना सारख्या विषाणूचे अवघ्या महाराष्ट्रात सावट असताना देखील स्पर्धकांनी आपापल्या परीने योग्य तो सहभाग दर्शविला त्याबद्दल स्पर्धेचे आयोजक अभिनेता- दिग्दर्शक राम माळी यांनी सर्व सहभागी स्पर्धकांचे मनापासून आभार मानले.




श्री स्वामी समर्थ कट्टाच्या वतीने संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाटप

मुंबई/ बाळ पंडित :  ना.म.जोशी मार्गा वरील,  आर्थर रोड येथे, श्री स्वामी समर्थ कट्टा परिवारांच्या वतीने, श्री दत्तावधूत विरचित, संक्षिप्त गुरुचरित्र (श्री दत्तलीलामृत-श्री सिद्धलीलामृत) या ग्रंथाचे प्रकाशन व १०८ पोथीचे वाटप, ऍड. चंद्रकांत नाईक यांच्या  हस्ते करण्यात आले. 

      संक्षिप्त श्री गुरुचरित्राच्या नित्य पठाणाने लाखो लोकांचे कल्याण झाले आहे. पोथी वाचनाने, दिव्य अनुभव आलेले आहेत. तसेच पोथीच्या वाचनाने पूर्वजांचा उद्गार होतो. पूर्वजांचा उद्धार झाला की, वंशजांच्या घरात सुखशांती नांदू लागते.वाचनाने पिशाच्च बाधेचा त्रास नाहीसा होतो. संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचनास सुरुवात केल्यावर अनेक लोकांचे आजारपण व त्यांच्या सांसारिक अडचणी दूर झालेल्या आहेत ". असे मत चंद्रकांत नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले . चंद्रकांत नाईक यांच्या संकल्पनेतून, बाळ पंडित  यांच्या प्रयत्नाने  व श्री स्वामी समर्थ कट्टा परिवारांच्या सहकार्याने सदर  प्रकाशन व वाटप सोहळा संपन्न झाला . त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष-बाळ पंडित, चिटणीस- राजेंद्र चव्हाण, कोषाध्यक्ष- रवींद्र रेवडेकर, कार्याध्यक्ष- विनोद साळुंके, सह जनार्दन देसाई,सूर्यकांत नाचरे, सागर मेस्त्री, जयसिंग परब, भरत येरम, चंद्रकांत आयरे, बाळकृष्ण बावधनकर, शरद प्रभू, किशोर चिपळूणकर आदी स्वामी सेवक उपस्थित होते.

 


नियती वाडकर

स्त्री -शक्तीबद्दल मत :-
" प्रत्येकाच्या घरी साडेतीन शक्तिपीठे असतात आई, बहीण, बायको आणि अर्ध शक्तीपीठ म्हणजे मुलगी यांना सुखात ठेवा कोणतेही दुःख तुमच्या वाट्याला येणार नाही."

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

नवरात्रौत्सवाचे करूया स्वागत !! आदर्श वार्ताहर असेल सोबत !!

इंडियन ओवरसीज बॅंक कोळी वाडा - सायन शाखा , कर्मचारी- अधिकारी वृंद .




काळोखाला भेदून टाकू

 मिशन सेव्ह द अर्थ - एक अनोखे अभियान




           विराग मधुमालती, हे नाव आज आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी ऐकले असेल. अनेक विश्वविक्रम आपल्या नावावर केलेले विराग मधुमालती हे नाव केवळ मुंबई महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी भूषणावह ठरले आहे. नवी मुंबई येथे वास्तव्यास असणारे व सामाजिक उपक्रमांची प्रचंड ओढ असलेल्या विराग यांना समाजिक बांधीलकीतून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याच्या इर्षेने पछाडले आहे. पेशाने इंजिनिअर असलेल्या विराग यांनी गेल्या काही वर्षांत विपरीत परिस्थितीवर मात करत आपल्या जिद्दीच्या जोरावर अनेक विश्वविक्रमाँना गवसणी घातली आहे. मग तो चीनचा ४५६ तासांचा सलग गायनाचा विक्रम मोडीत काढून ५५५ तासांचा सलग गायनाचा विक्रम स्थापित केलेला असो की ३०० गायकांच्या सहभागाने रिले पद्धतीने गायलेले चित्रपटगीत असो. सुप्रसिद्ध गायक, निर्माता, दिग्दर्शक, गायन अभिनय प्रशिक्षक या सर्वच पातळ्यांवर ते प्रचंड यशस्वी ठरले आहेत. नेत्रदान चळवळीमध्ये त्यांनी दिलेले योगदान नक्कीच दखलपात्र होते. नेत्रदानाचे आवाहन घेऊन त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना भेटी दिल्या. स्वतः डोळ्यावर पट्टी बांधून नेत्रदानाचा संकल्प व आवाहन करताना आम्ही त्यांना पाहिले आहे. नेत्रदानाबाबतच्या जनजागृतीसाठी त्यांनी संगीताचे अनेक अनोखे कार्यक्रम सादर केले. पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांच्या कार्याने प्रचंड प्रभावित असलेले विराग डॉ लहाने यांना आदर्श व पितृतुल्य मानतात. त्यांच्याच जीवनचरित्रावर आधारित अलका कुबल, मकरंद अनासपुरे अशा दिग्गज कलाकारांना घेऊन त्यांनी "डॉ तात्याराव लहाने.. एक अंगार" या चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शन केले. याच चित्रपटातील "काळोखाला भेदून टाकू" ह्या लोकप्रिय गीताला घेऊन 'एक शब्द एक गायक' या संकल्पनेतून ३०० गायकांच्या सहभागाने त्यांनी वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आणखी एक विश्वविक्रम नुकताच रचला. अभिनय, गायनाची आवड असलेल्या, हरहून्नरी, समाजासाठी काहितरी करण्याची इच्छा असलेल्या कलाकारांना सोबत घेऊन अनेक अनोखे उपक्रम हाती घेणाऱ्या विराग यांची बातच काही और आहे. त्यांच्या ह्या वेगळेपणामुळेच ते कायम लक्षात राहतात. त्यांची ओळख व उद्देश कळणाऱ्या लोकांना त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा न झाली तरच नवल. अर्थात यासाठी त्यांच्या अर्धांगिनी सौ वंदना यांची साथ तितकीच मोलाची असल्याची ते मानतात. सध्या त्यांनी मिशन सेव्ह मदर अर्थ म्हणजेच मातृभूमी वाचवण्याच्या मोहिमेचा ध्यास घेतलेला आहे. पर्यावरण संरक्षणासाठी विराग आणि त्यांच्यासोबत असंख्य गायक मंडळी लॉकडाऊन काळात आपली धरती माता वाचवण्याच्या ध्येयाने सातत्याने सलग गायनाचे अनोखे कार्यक्रम सोशल माध्यमावर सादर करत आहेत. आज आपण ऐहिक सुखाकडे इतक्या तन्मयतेने ओढलेलो आहोत की धरती मातेविषयी कुणाला फारसे काही घेणेदेणे राहिलेले नाही. पर्यावरणाकडे होत असलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे निसर्ग आज वेगाने विनाशाकडे वाटचाल करत आहे. वाढते शहरीकरण व सिमेंट काँक्रीटच्या जंगलात निसर्ग लुप्त होत आहे. ही परिस्थिती कुठेतरी बदलायला हवी. त्यासाठी हातावर मोजणारे पर्यावरण प्रेमी प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यात आता विराग मधुमालती या नावाचा समावेश झाला आहे. लॉकडाऊन काळात मानवी हस्तक्षेप व क्रिया थांबल्याने या काळामध्ये आपल्याला निसर्गात बरेच सकारात्मक बदल बघावयास मिळाले व सर्वांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडले. यात वायू, ध्वनी, जलप्रदूषण कमालीचे घटल्याने वातावरण निर्मळ झाल्याचे पाहायला मिळाले. अश्यावेळी या परिस्थितीचा लाभ घेत गायक वीराग मधुमालती, ज्यांनी संगीत क्षेत्रात विविध सामाजिक जनजागृतीसाठी आजवर ५ वेळा जागतिक विश्वविक्रम भारताच्या नावे नोंदविले आहेत, त्यांनी आज एका आगळ्या वेगळ्या संकल्पनेची सुरुवात केली आहे. निसर्ग वाचवण्यासाठी त्यांनी अनेक संकल्प सोडलेले आहेत त्यात त्यांनी स्वतः गेल्या वर्षापासून प्लास्टिक डिस्पोजेबल बॉटलमध्ये आजन्म पाणी न पिण्याचा संकल्प केलेला आहेत. सन २०११ पासून  पाण्याचे होणारे प्रदुषण टाळण्याकरिता ते गणपती बाप्पाचे विसर्जन करीत नाहीत. आणि आता संपूर्ण विश्वातील गायक कलाकारांना एकत्रित करून
        धरती मातेच्या रक्षणासाठी "मिशन सेव्ह मदर अर्थ" चा मोहिमेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी यू टयूब  वर सलग १२ तास गीत गायन करून इतरांना देखील पर्यावरण संरक्षणासाठी संकल्प घेण्यास व प्रोत्साहित करण्यासाठी मालिका आखली आहे. यात ते विविध वयोगटातील, विविध पेशाच्या सर्वसामान्य कलाकारांना एकत्रित करून गीत गायनाचे लाईव्ह कार्यक्रम यु ट्यूब च्या माध्यमातून सादर करत आहेत.  या गायकांनीदेखील पर्यावरण रक्षणासाठी वेगवेगळे संकल्प केले असून सेव्ह द अर्थच्या मोहिमेत अमूल्य योगदान दिले आहे. यात अभियंते, डॉक्टर्स, लहान मुले व सर्वच वयोगटातील कलाकारांचा विशेषत्वाने सहभाग आहे. विराग मधुमालती यांचा धरती रक्षणाचा हा ध्यास अनेकांना विचारमंथन करण्यास भाग पडणारा आहे. विराग मधुमालती यांचा जीवन व कार्यप्रवास गेल्या काही वर्षांपासून जवळून न्याहाळत असताना त्यांच्या कार्याविषयी थोडे लिहिण्याच्या मोहातून हा लेखप्रपंच झालेला आहे. 
डॉ तात्याराव लहाने.. एक अंगार या त्यांच्या चित्रपटातील गीताच्या खालील ओळी आपल्याला बरेच काही शिकवून जातात.

काळोखाला भेदुन टाकु,
जिवनाला ऊजळुन टाकु,

उँच भरारी , ....चला घेऊया,
मानवतेची सेवा करूया,,

वेदना जिवाच्या , दुख: जगाचे
माझ्या अंतरंगी भासते मला.

दुर सारन्या आ.... शक्ति मला दे,
विश्व विधाता पुजिते तुला...

दिन दुबळ्यांचे आश्रय बनुनी,
करुना दयेचे दिप लाउया.

विकार मनाचे जिंकुनी सारे, भारत मातेची सेवा करुया....

काळोखाला भेदुन टाकु,
जिवनाला ऊजळुन टाकु....

     विराग मधुमालती यांच्या कार्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व त्यांच्या विविध उपक्रमांत सहभागी होण्यासाठी सौ वंदना वानखडे यांचेशी ९८६७८७५७८७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.



-वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०

शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या - आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेची प्रशासनाकडे मागणी.

 पनवेल / दिव्या पाटील -  भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो . भारतातील अनेक जण शेतीवर अवलंबून राहतात. शेतकरी राजा मूळे सर्वांना अन्न मिळत हे प्रत्येकाला माहीत असून सुद्धा शेतकऱ्यांना योग्य तो फायदा होत नाही.योग्य पीक मिळावं या साठी  पाण्याची गरज तर कधी सकस माती मिळण्यासाठी वातावरणाचे समतोल हे सर्व शेतीसाठी महत्त्वाचे असते पण जर वातावरणच साथ देत नसेल तर करायचे काय !  

ह्या वर्षी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. अतिवृष्टी झाल्या मुळे पिकांचे नुकसान झाले आहे .पनवेल - उरण तालुक्यात सुदधा पावसामुळे शेतीच्या पिकाचे नुकसान झाले असून , शेतकऱ्यांच्या कष्ट या वेळी वाया गेलेत , त्यांच्या तोंडाशी आलेला घास पावसाने खेचून नेला आहे. म्हणून  येथील शेतकऱ्यांना न्याय मिळावा , शेतीची  नुकसानभरपाई व्हावी म्हणून  योग्य तो पंचनामा व्हावा यासाठी  आगरी - कोळी - कराडी संघर्ष संस्थेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष रुपेश धुमाळ  , उपाध्यक्ष भारत भोपी व पनवेल तालुका विभाग अध्यक्ष विवेक भोपी यांच्या मार्गदर्शनाखाली दि . २१ ऑक्टोबर रोजी  रायगड जिल्हा अधिकारी , पनवेल प्रांतअधिकारी , पनवेल व उरण तहसीलदार यांना   निवेदन देण्यात आले 

वध हैवानी वृत्तीचा

नवरात्रौत्सव निमित्त आदर्श वार्ताहर च्या वाचकांसाठी विशेष लेख.... 




।। तू ग दुर्गा तु भवानी संसाराची तूच जननी ।।

         या ओळी फक्त आई भवानीला च न्हवे तर सबंध स्त्रीवर्गाला दर्शवून जातात . समस्त मानव जातीचा जन्म हा स्त्री च्या उदरातून झाला आह, ती सर्वांची करता - करविता आहे . याच भान सर्वांनी ठेवा. आई , मुलगी , नात , आजी अश्या अनेक रुपात ती आपल्याला घराघरात दिसते . एवढेच न्हवे तर सभोवतालचे वातावरण , कुटुंब, व्यवसाय , शिक्षण या प्रत्येक बाबतीत आपली कामगिरी ती चोखपणे पार पाडते .

      प्रगतीच्या बाबतीत स्त्रिया अग्रेसर आहेत . नोकरी करत असताना आपल्या कुटुंबाची काळजी सुद्धा जी योग्य रीतीने घेते ती आहे ' स्त्रीशक्ती ' !!!  सध्याच्या कोरोना महामारीत सुद्धा महिला डॉक्टर , नर्स , सफाई कामगार , शिक्षिका अश्या अनेक रुपात ती सर्वांची सेवा करीत आहे. या स्त्रीशक्ती ला सलाम ! , एवढेच नव्हे तर शाळा , व्यवसाय बंद असल्याने कित्येकांना घरीच राहावे लागत आहे , त्या मुळे कोणतेही काम त्यांना नाही पण प्रत्येक घरात असलेलं मौल्यवान रत्न ते म्हणजे "आई " तीच काम घरात सुद्धा चालूच असते , " जर कोणी विचारले की या कामाचा कंटाळा येत नाही का ? तर ती हसत म्हणते , घरातील काम करण्यात कंटाळा नाही तर आनंद असतो ". आपल्याला पाल्याला नऊ महिने आपल्या उदरात वाढवत असतांना त्यांना घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची "संस्कार" नावाची गोष्ट ती आपल्या मुलांना देते . आपल्या संस्कारांच्या गाभाऱ्यातुन आपल्या पाल्याला घडवण्याचे काम एक स्त्री च करू शकते. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एका स्त्रीचा च हात असतो. स्त्री हे एक असे व्यक्तिमत्त्व आहे जे कोणीही सहजासहजी समजू शकत नाही , पण जो समजेल तो आयुष्यात खूप पुढे जाईल. शिक्षणाद्वारे गगन भरारी घेऊन पुढे जायची जिद्द सुद्धा तिच्यत असते . शिक्षणाद्वारे आपल्या कुटुंबाचे , देशाचे नाव मोठं करण्याचं स्वप्न ती फक्त पाहत नाही तर ते सत्यात सुद्धा उतरवते . 

पण हल्ली याच स्त्रीवर्गाला कित्येक संकटापासून सामोरं जावं लागत आहे. विनाशकारी बुद्धीच्या हैवनांनी सगळीकडे अन्याय माजवला आहे . आणि याच विकतृ वृत्तीच्या लोकांमुळे तिला शांताता पत्करायला लागत आहे . मग याची अनेक कारणं आहेत , त्यातील महत्वाचं कारण म्हणजे " एक स्त्रीच स्त्रीला समजून घेण्यात कुठे तरी मागे पडतेय " , काही ही मदत लागली की पुरुष च आपल्याला मदत करू शकतो असे मनात ठरलेले च असते .

     अरे ! अश्या वेळी आठवा कालिका मातेची महती , जेव्हा दृष्ट महिषासुराने सगळीकडे हाहाकार माजवला होता तेव्हा सारे देव - देवता शांत झाले होते . त्या वेळी कालिकामातेने  आपल्या शक्तीने त्या हैवणाचा वध केला व पुन्हा सर्वत्र शांती पसरवली. एवढी धीट आणि निर्भय स्त्री शक्ती आज शांत झालेय का ?? , मग जरा विचार करा आपण अश्याच शांत राहिलो तर आपल्या अडचणी दूर होतील असे वाटत असेल तर हे चुकीचं आहे . हा विचार आता सोडून द्या गृहलक्ष्मी सोबतच आता रणचंडिकेच रूप सुद्धा दाखवून द्या , आणि या परिस्थितवर मात करा . आणि हे सगळं तेव्हाच शक्य होईल जेव्हा , स्त्रीने शांत न राहता आपला लढा लढायला सुरुवात केली तरच हे शक्य होईल ." या हैवानी वृत्तीचा वध करण्याची वेळ आता आली आहे   म्हणून आता विचार करत बसण्यापेक्षा आपल्या कृतीतून दाखवून द्या की स्त्रीशक्ती महान आहे , होती आणि कायम राहील " .






- दिव्या प्रमोद पाटील , घणसोली नवी मुंबई

पाक्षिक आदर्श वार्ताहरचा नवरात्रौत्सव निमित्त उपक्रम : जनजागृती सेवा समिती महिला ग्रुप सदस्यांची "नवदुर्गा "म्हणुन घेतली दखल.



बदलापुर-
सध्या नवरात्र उत्सवाचे दिवस आहेत. कोरोना संसर्गामुळे सर्वच ठीकाणी साधेपणाने उत्सव साजरा होत आहे.जनजागृती सेवा समिती या ग्रुपमध्ये डाॅक्टर,कवी,लेखिका,व्यावसायिक महिला, समाजसेविका, सामाजिक संस्थांच्या पदाधिकारी, अभिनेत्री, शिक्षिका, आरोग्य सेविका अशा उच्च शिक्षित,उच्चपदस्थ नवदुर्गा सामील आहेत.याच नवरात्रउत्सवाचे औचित्य साधून या ग्रुपमधिल काही महिलांना पाक्षिक-आदर्श वार्ताहरमध्ये (ब्लॉग साईटवर) "आम्ही नवदुर्गा "म्हणुन त्यांच्या फोटोसहीत थोडक्यात परिचय देऊन शब्दबद्ध केले आहे. नवरात्रउत्सवाचा कालावधी संपत असल्याकारणाने इतर महिलांना "नवदुर्गा "म्हणुन सामावून घेता आल नाही,म्हणुन जनजागृती सेवा समितीचे संस्थापक- अध्यक्ष  गुरुनाथ तिरपणकर यांनी  दिलगिरी व्यक्त केली. आदर्श वार्ताहर या पाक्षिकात "नवदुर्गा "म्हणुन माहिती प्रसिद्ध करण्यासाठी संपादक पंकजकुमार पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

प्रसिद्ध अभिनेते, साहित्यिक, कवी आणि पत्रकार यांच्या उपस्थितीत आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार सोहळा संपन्न..!

मुंबई-दादर (प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर)  आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार वितरण सो...