डोंबिवली(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) संस्कृतीचा, एकजुटीचा, आपुलकीचा, एकतेचा,तरुणाई एकत्र भेटण्याचा,समाज बांधव एकत्र येण्याचा हा सोहळा म्हणजे सर्वांसाठी उत्साहवर्धक पर्वणीच असते. अशा स्नेहसंमेलनांमुळे सर्व समाज बांधव,कुटुंबिय एकत्र येतात.धम्माल,मौज मजा मस्ती, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी नामी संधी मिळते, विचारांची देवाणघेवाण होते.अशा प्रकारे कोष्टी समाज सेवा मंडळाचे स्नेहसंमेलन डोंबिवली येथील शुभमंगल कार्यालयात जोश पुर्ण व उत्साही वातावरणात संपन्न झाले.सर्वांच्या सहभागाने कार्यकारिणीच्या अथक परिश्रमाने तन, मन, धन अर्पुन३९वे स्नेहसंमेलन यशस्वी समाज बांधवांच्या एकोप्याने यशस्वीरीत्या पार पडले.विशेषत: मुला-मुलींनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम उत्कृष्ट आणि अप्रतिम सादरीकरण झाले होत, त्यांच्या मेहनतीने कौतुक कराव तेवढ थोडच, याप्रसंगी आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे श्री.विजय वक्ते(कक्ष अधिकारी, मंत्रालय, महाराष्ट्र शासन) यांनी केलेल्या प्रभावी आणि ओघवत्या भाषणाने संपूर्ण सभागृह अक्षरशः खिळवून ठेवले होते.त्यांच्या विचारांनी कार्यक्रमात एक वेगळीच उंची मिळाली.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून विजय वक्ते, कोष्टी समाज सेवा मंडळाच्या अध्यक्षा सौ.अनिता वाघावकर, सेक्रेटरी सौ.जयश्री रोकडे, दत्ता कुमठेकर, मिलिंद रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना भेट वस्तू व रोख रक्कम प्रदान करुन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मिलिंद रोकडे यांनी केले.शेवटी स्वादिष्ट जेवणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा