आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १ सप्टेंबर, २०२६

आजपासून मुंबईत रिक्षा टॅक्सी भाडेवाढ!!

मुंबई प्रतिनिधी:(सतिश पाटील):मुंबई महानगर क्षेत्रात १ सप्टेंबर २०२६ पासून रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात अनुक्रमे १ रुपया आणि २ रुपयांची वाढ लागू झाली आहे.नवे भाडेदर (मुंबई आणि परिसर)ऑटो-रिक्षा: पहिल्या १.५ किलोमीटरसाठी किमान भाडे २७ रुपये (जुने भाडे २६ रुपये) झाले असूनपुढील प्रति किलोमीटर दर १८.२२ रुपये (जुना दर १७.१४ रुपये) करण्यात आला आहे.काळी-पिवळी टॅक्सी: पहिल्या १.५ किलोमीटरसाठी किमान भाडे ३३ रुपये (जुने भाडे ३१ रुपये) झाले असूनपुढील प्रति किलोमीटर दर २१.९० रुपये (जुना दर २०.६६ रुपये) करण्यात आला आहे.महत्त्वाची माहितीक्षेत्र: हा निर्णय मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई, विरार आणि पालघरसह संपूर्ण एमएमआर (MMR) क्षेत्रात लागू आहे.मीटर कॅलिब्रेशन: वाहन चालकांना इलेक्ट्रॉनिक मीटर रिक्षा-टॅक्सी युनियन व आरटीओच्या नियमांनुसार बदलण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंतची मुदत दिली आहे. अशी माहीती सुत्राकडून मिळाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉटरी विक्रेतांचे नेते सातार्डेकर यांचा इशारा ;परप्रांतीय लॉटरीवर बहिष्कार हाच एकमेव आता उपाय !

मुंबई (प्रतिनिधी):  सणासुदीच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीय बोगस लॉटरीचा लवकरच सुळसुळाट होणार असून, लॉटरीचे ग्राहक व विक्रेते यांनी सावध राहावे...