आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १ सप्टेंबर, २०२६

सोनाक्षी राजेश कांबळे हिचा मनसे तर्फे सत्कार

मुंबई : इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत असामान्य गुण मिळवणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मनसे (घाटकोपर पश्चिम) तर्फे नुकतेच मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमात सेंट मलंकारा स्कूल, साकीनाका या शाळेची कुमारी सोनाक्षी राजेश कांबळे हिला एस. एस. सी. परीक्षेत ९८.८० टक्के गुण मिळवून विभागात पहिला क्रमांक पटकावला. तिच्या यामुळे यशाबद्दल एक स्कुटी बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय इतर अनेक विद्यार्थ्यांना लॅपटाॅप देण्यात आले. 
        कार्यक्रमाला आदरणीय श्री. समीर रामटेके साहेब, मनसे नेते श्री. गणेश चुककल साहेब आणि माजी आमदार बाळा नांदगावकर साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाची संपूर्ण संकल्पना आणि जबाबदारी आदरणीय मनसे नेते श्री गणेश चुककल साहेब यांची होती. विद्यार्थ्यांचे सर्व मान्यवरांनी भरभरून कौतुक केले आणि भविष्यात यापेक्षाही अधिक चांगले यश संपादन करण्याचे आवाहन केले. पुढील कार्यक्रमात अधिकाधिक मुलांना चांगली बक्षिसे देण्यात येतील असे आश्वासन श्री राज साहेब ठाकरे आणि मनसे नेते गणेश चुककल साहेब यांनी दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

सोनाक्षी राजेश कांबळे हिचा मनसे तर्फे सत्कार

मुंबई : इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत असामान्य गुण मिळवणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मनसे (घाटकोपर पश्चिम) तर्फे नुकतेच मन...