आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२६

साई संस्था सम्राट सोसायटी येथे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

भांडुप (सुरेश पाटील) - येथील वैभव चौक परिसरातील साई संस्था सम्राट सोसायटी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा तसेच सोसायटीतील रहिवाशांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
     चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव देत स्वातंत्र्य दिन आणि देशभक्तीवर आधारित विविध चित्रे साकारली. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, देशप्रेम आणि कलात्मकतेला प्रोत्साहन मिळाले.
     तसेच रहिवाशांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तज्ज्ञांकडून नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली तसेच डोळ्यांच्या आरोग्याबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
      या दोन्ही उपक्रमांना नागरिक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गुणवंत कामगारांना एसटी प्रवास व टोलमाफीच्या सवलती द्या ;राज्य गुणवंत कामगार असोसिएशनची शासनाकडे मागणी; पुरस्कारप्राप्त कामगारांवरील अन्याय दूर करण्याचे आवाहन

मुंबई : सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रातील संघटना व आस्थापनांसाठी तसेच समाजातील वंचित आणि अपेक्षित घटकांच्या ...