रत्नागिरी : खेड तालुक्यातील कुंभाड येथील ग्रामविकास संघाला कै . नानासाहेब शेट्ये सन २०२६ उत्कृष्ट संस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला . साखरपा येथे १ ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमात आमदार किरण सामंत यांच्या हस्ते संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
नानासाहेब शेट्ये स्मारक समिती, साखरपा यांच्यातर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना पुरस्कार देण्यात येतात . यंदा उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार लांजा येथील शांताराम सुर्वे यांना, तर उत्कृष्ट संस्था पुरस्कार ग्रामविकास संघ, कुंभाड यांना प्रदान करण्यात आला .
ग्रामविकास संघाची स्थापना होऊन ६७ वर्षे झाली असून संस्था सातत्याने सामाजिक व ग्रामविकासाच्या क्षेत्रात कार्यरत आहे संस्थेला मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे . पुरस्काराबद्दल श्री छत्रपती शिवाजी महाराज समिती, ग्रामविकास संघ कुंभाडच्या पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा