आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १० ऑगस्ट, २०२६

प्रसिद्ध कामगार नेते अभिजित राणे यांच्या हस्ते पुरस्कार्थींचा सत्कार !!

मुंबई (पी.डी.पाटील ): नुकताच, गोरेगाव येथे "मैत्री संस्था व युवा सामाजिक प्रतिष्ठान" आयोजित पुरस्कार सोहळा निमित्त कामगार नेते अभिजित राणे यांच्या धडक कामगार युनियन मिनी हाॅल मध्ये उद्घाटक- मा दिलीप सेन (बाॅलीवुड संगीतकार), समारंभ अध्यक्ष- मा अभिजित राणे (प्रसिद्ध कामगार नेते व संपादक दै. मुंबई मित्र), स्वागताध्यक्ष- मा विलास खानोलकर (माजी सेन्सर बोर्ड सदस्य), प्रमुख पाहुणे- मा संभाजी जाधवराव (राजमाता माॅंसाहेब जिजाऊ यांचे वडील राजे लखोजी राजे जाधवराव यांचे १४वे वंशज, इतिहास अभ्यासक), सौ अनघा राणे (जेष्ठ कवयित्री व सामाजिक कार्यकर्त्या), पियु चव्हाण (अभिनेत्री) आणि सत्कारमूर्ती- मा सुरज भोईर (अध्यक्ष- मैत्री संस्था, सामाजिक कार्यकर्ता ‌व मुक्त पत्रकार) यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाच्या सुरुवातीला 'वंदे मातरम्' या राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण झाली. त्या बद्दल 'वन्दे मातरम्' या राष्ट्रगीताने झाली. प्रस्ताविक सुरज भोईर यांनी केले. 
       धडक कामगार मंचावरील मान्यवरांना तिरंगा गमजा गळ्यात घालून, सन्मानचिन्ह व एक गुलाब पुष्प देऊन 'स्वागत' केले. त्या नंतर "निवडक निमंत्रित कवी" विद्या डोंबे, मोहन जाधव, संतोष कांबळे असे पाच कविता सादर केली. आणि अक्षरश्री विलास देवळेकर यांनी सुरज भोईर यांच्या नावाने वाढदिवसानिमित्त "आपल्या म्युझिकल इक्को साऊंड सिस्टीम" मध्ये कविता सादर केली. आणि त्यास उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांच्या कडकडाटात पसंती दिली. त्या नंतर मा अभिजित राणे यांच्या हस्ते पुरस्कार्थीना "सन्मानचिन्ह व सन्मानपत्र" देऊन 'सत्कार' करण्यात आले. तर काहींना पदक गळ्यात घालून "विशेष सन्मान" करण्यात आले.सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन करताना, मैत्री दिनाच्या आणि सुरज भोईर यांना "वाढदिवसाच्या शुभेच्छा" दिल्या. आणि सत्कार मूर्ती सुरज भोईर यांचा वाढदिवस, मान्यवरांच्या व सहकारी यांच्या उपस्थितीत "उत्साहात केक कापून" साजरा करण्यात आला. आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गारगाई प्रकल्पग्रस्तांचे सुंदर गाव वसवा.. दलालांना दूर ठेवा

  गारगाई प्रकल्प कोणत्याही परीस्थीतीमधे पूर्ण करायचाच, असा निर्धार महाराष्ट्र शासनाने केलेला दिसतोय. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्...