मुंबई ( प्रतिनिधी) विक्रोळी टागोर नगर येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयात 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ टागोरनगर कार्यालय प्रमुख संजना कोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली झेंडावंदन कार्यक्रम तसेच लहान मुलांना अल्पोपहार (लाडू ) वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर उपस्थिती मध्ये बबनराव मोरे सेवानिवृत्त अवर सचिव सहकार विभाग महाराष्ट्र शासन व मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त गुणवंत कामगार व विशेष कार्यकारी अधिकारी, तसेच राज्य गुणवंत कामगार असोसिएशन चे मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. प्रभाकर तुकाराम कांबळे, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या हस्ते गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त राजेंद्र ज्ञानदेव कांबळे सर यांच्या हस्ते ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले असून भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो च्या घोषणा देत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण फडकविण्यात आला.
सर्व नागरिकांना जेव्हा समानतेचा हक्क मिळेल त्यातच स्वातंत्र्य दिनाची सार्थकता आहे उत्तम शिक्षण आणि उत्कृष्ट उपचार हा केवळ श्रीमंताचा नव्हे तर सर्वसामान्यांचा ही मौलिक हक्क आहे. आरोग्य आणि शिक्षण हे मजबूत देशाचा पाया आहे तसेच महाराष्ट्र कामगार कामगार कल्याण मंडळातील योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व कामगारांनी व त्यांच्या मुलांनी कामगार कल्याण मंडळ कार्यालयात जाऊन त्याचा पुरेपूर लाभ घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रमुख मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्त शिक्षित आणि आरोग्यपूर्ण भारत बनविण्याचा संकल्प करूया असेही सांगितले.
कामगार कल्याण मंडळाच्या केंद्र महिला कल्याण सहायिका संजना कोळकर मॅडम यांच्या हस्ते सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ ऐवजी तुळशीचे रोपटे देऊन स्वागत केले. प्रमुख मान्यवरानी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पालक वर्ग ,शिशु मंदिर ची मुले शिवण क्लास केंद्र सभासद महिला आदींना मार्गदर्शन केले. तसेच शिशु मंदिर च्या मुलांना लाडू व चॉकलेटचे वाटप प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले असून कार्यक्रमाला महिला वर्ग . ज्येष्ठ नागरिक शिशूमंदिर ची मुले ,मुली व पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कामगार कल्याण मंडळाचे कर्मचारी राजेंद्र गायकवाड ,स्वाती केदारे व शिवण क्लास मधील महिला सभासदांनी विशेष परिश्रम घेतले असून शेवटी सर्वांचे आभार संजना कोळकर मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम व राष्ट्रगीताने करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा