आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १६ ऑगस्ट, २०२६

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा ; देशभक्ती व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

अनेक दिग्गज स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित
मुंबई प्रतिनिधी: (सतिशपाटील)
यावेळी मनोगत व्यक्त करताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, महापौर हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांनी उपस्थित नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशाच्या प्रगतीसाठी राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमुळे कल्याण-डोंबिवली परिसरात दिवसभर देशभक्तीपूर्ण आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शहीद जवानांना अभिवादन, विविध ठिकाणी झालेले ध्वजारोहण, विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि दत्तनगर येथे फडकविण्यात आलेला १५० फूट उंच राष्ट्रध्वज हे यंदाच्या स्वातंत्र्यदिनाचे प्रमुख आकर्षण ठरले.
    तिरंगा रॅलीतून नागरिकांनी देशप्रेमाचा जागर करत राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि देशाच्या विकासासाठी एकजुटीचा संदेश दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पवईत आयुष्य फाऊंडेशन तर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न

मुंबई : रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान.बघायला गेलात तर रक्ताचा पुरवठ्यासाठी ठिकठिकाणी बऱ्याचदा संघटनेच्या वतीने किंवा राजकीय पक्षांच्या वतीने र...