आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १६ ऑगस्ट, २०२६

पवईत आयुष्य फाऊंडेशन तर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न

मुंबई : रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान.बघायला गेलात तर रक्ताचा पुरवठ्यासाठी ठिकठिकाणी बऱ्याचदा संघटनेच्या वतीने किंवा राजकीय पक्षांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते.याच उद्दिष्टाने  समाजसेवेसाठी अग्रेसर असलेली पवईतील तरुणांची संघटना "आयुष्य फाऊंडेशन" यांच्या वतीने दरवर्षी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते.
      यंदा देखील त्यांनी सहाव्या वर्षी सालाबादप्रमाणे रविवारी १६ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन विश्र्वशांती बुद्ध विहाराच्या प्रांगणात करण्यात आले होते‌.आयुष्य फाऊंडेशन यांना  बाळासाहेब ठाकरे ट्रोमा सेंटर यांची रक्तपेढी लाभली.सकाळी ९ ते सायं ६ वाजेपर्यंत एकुण ११२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी रक्तदात्यांना रक्तदान केल्यानंतर आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.सदर कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न करण्यासाठी संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पवईत आयुष्य फाऊंडेशन तर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न

मुंबई : रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान.बघायला गेलात तर रक्ताचा पुरवठ्यासाठी ठिकठिकाणी बऱ्याचदा संघटनेच्या वतीने किंवा राजकीय पक्षांच्या वतीने र...