गडब (अवंतिका म्हात्रे): पेण शहरातील चिंचपाडा रिंगरोड वरील छत्रपती संभाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण करताना पेण नगरपरिषद प्रशासनाची बेफिक्री समोर आली आहे . महापुरुषांच्या नावाने चौक सुशोभीकरण करताना योग्य नियोजन तसेच ऐतिहासिक भान आणि स्पष्ट आकृतीबंध ठेवणे गरजेचे होते.परंतु नगर परिषदेने ते भान न ठेवल्याने समस्त पेण नगरवासीयांनी टीका केली.
नगर परिषद मध्ये या चौकात धातूचे प्रतीकात्मक शिल्प उभारले आहे.ज्यामध्ये वाघाशी लढा देणारी मानवी आकृती दर्शवली .मात्र छत्रपती संभाजी महाराजाच्या या शौर्याचे प्रतीक म्हणून हे शिल्प उभारताना स्पष्ट व आकर्षक, महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे असावे याचा कसलाही विचार प्रशासनाने केलेला दिसत नाही .वाद पेटल्यानंतर नगरपालिकेने हे केवळ एक प्रतिकात्मक रूप असून पूर्णकृती पुतळ्यास प्रशासकीय मान्यता असणे गरजेचे आहे असे स्पष्टीकरण दिले जात आहे .परंतु जर प्रशासकीय मान्यता नव्हती तर ,घाई घाईत अशा पुतळ्याचे अस्पष्टिकरण उभारून शिवप्रेमिंच्या भावनांशी का खेळले गेले असा सवाल संतप्त पेणवासीय विचारत आहेत .आमदार निधीतून मिळालेल्या या सार्वजनिक पैशांचा वापर करून लोकप्रतिनिधी आणि नगरपरिषद अधिकाऱ्यांनी या शिल्पाच्या डिझाईनची योग्य पाहणी का केली नाही.घाई गडबडीत लोकार्पण करून ... प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात ऐतिहासिक गांभीर्य बाजूला ठेवल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. .केवळ नावापुरते सुशोभीकरण करून अथवा अस्पष्ट आकृत्या उभारून महापुरुषांचा अवमान करणे हे खपवून घेतले जाणार नाही .नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ या चुकीची दुरुस्ती करावी आणि प्रशासकीय मान्यता मिळवून छत्रपती संभाजी महाराजांचे स्पष्ट व भव्य पुतळा चौकात उभारावा अशी तीव्र मागणी आता जोर धरत आहे.
या गोष्टीचा पेण शहरातच नाहीतर गावागावातून निषेध दर्शविला जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा