आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १६ ऑगस्ट, २०२६

आयुर्वेद व हॉलिस्टिक मेडिसिन क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. वैभव देवगीरकर यांना ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ प्रदान

मुंबई(शांताराम गुडेकर )  आयुर्वेद आणि हॉलिस्टिक मेडिसिन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. वैभव आर. देवगीरकर यांना प्रतिष्ठित ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. १५ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथील NDMC Convention Center येथे आयोजित विशेष समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी सैन्य अधिकारी सी. के. सक्सेना आणि YSS India चे अध्यक्ष कमल चौधरी यांच्या हस्ते डॉ. वैभव देवगीरकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी YSS चे पदाधिकारी तसेच निवड समितीचे सदस्य ग्रुप कॅप्टन आर. सी. त्रिपाठी (निवृत्त वायुसेना अधिकारी), विजय पालं जी (निवृत्त सैन्य अधिकारी), रौतांश कुमार, मंगे रामजी आणि मुकेश कुमार (निवृत्त सैन्य अधिकारी) यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. आयुर्वेदिक उपचारपद्धती, हॉलिस्टिक आरोग्यदृष्टी, आरोग्य संवर्धन तसेच रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजाच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी डॉ. देवगीरकर सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्रदान करण्यात आला.
           पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. वैभव आर. देवगीरकर यांनी सांगितले की, “होलिस्टिक उपचार, आरोग्य संवर्धन आणि रुग्णांची अविरत सेवा यासाठी मिळालेली ही पोचपावती केवळ एक पुरस्कार नसून, भविष्यात अधिक सक्षमतेने समाजसेवा करण्याची प्रेरणा आहे.”तसेच त्यांनी आपल्या कार्यात सहकार्य करणाऱ्या सर्व रुग्ण, हितचिंतक आणि मित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या प्रेम, विश्वास आणि सहकार्यामुळेच आरोग्यसेवेच्या क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या पुरस्कारामुळे आयुर्वेद आणि हॉलिस्टिक मेडिसिनच्या माध्यमातून आरोग्यसेवेला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी कार्यरत असलेल्या डॉ. देवगीरकर यांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर एक महत्त्वाची दखल मिळाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पवईत आयुष्य फाऊंडेशन तर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न

मुंबई : रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान.बघायला गेलात तर रक्ताचा पुरवठ्यासाठी ठिकठिकाणी बऱ्याचदा संघटनेच्या वतीने किंवा राजकीय पक्षांच्या वतीने र...