आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १६ ऑगस्ट, २०२६

संस्कार विद्यालय गडब येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विविध देशभक्तीपर गीतांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन

गडब (अवंतिका म्हात्रे): संस्कार शिक्षण संस्था संचालित संस्कार विद्यालय गडब, ता. पेण या शाळेत ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहन सोहळा संपन्न झाला. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विविध देशपरगीतांचे सांस्कृतिक कार्यक्रम व चित्रकला प्रदर्शन भरविण्यात आले. शिशुवर्गापासून ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाषण सादर केले. विद्यार्थ्यांनी विविध मनोरे सादर करून सर्वांची मने जिंकली, चित्रकला स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रप्रमुख व संस्थेचे अजिव सदस्य श्री. विजय पाटील व तसेच प्रमुख अतिथी मात्री मुख्याध्यापक श्री-विष्णु कोठेकर यांनी विविध स्पर्धांचेही परीक्षण व मार्गदर्शन केले. संस्कार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री-संजय चवरकर यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून दिले. वृक्ष लागवड करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचे सूचित केले. ध्वजारोहण सोहळ्यासाठी संस्थेचे पदाधिकारी भी.व्यं गुः प्रामपंचायत सदस्या सौ. भाग्यश्री कडू, संख्येचे पदाधिकारी श्री. संदीप म्हात्रे, भी-दिनेश म्हजे श्री. विश्वनाथ पाटील श्रीन. प्रभावती मोकल, श्रीदेविदास कोठेकर, शालेय समिती पालक सदस्य शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री चिंतामणी मोकल यांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

स्वातंत्र्यदिनानिमित्त लेवा युथ फोरम आयोजित डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, हिंजवडी व चिंचवड (पुणे) येथे भव्य रक्तदान शिबिरे यशस्वीरित्या संपन्न

कल्याण : (सुनिल इंगळे ) 🩸🇮🇳 स्वातंत्र्यदिन विशेष रक्तदान — देशसेवेचा एक अनमोल संकल्प. ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, लेवा युथ फोरमच्या व...