गडब ( अवंतिका म्हात्रे) स्वामींचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास करत असताना तमलवाडी येथील CA Patil टोल प्लाझावर टोल कर्मचाऱ्याकडून वाहनचालक व नागरिकांशी अरेरावी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी संबंधित कर्मचाऱ्याच्या वर्तनाचा तीव्र निषेध केला.
या प्रकाराची माहिती मिळताच रायगड पेण येथील रुपेश पाटील यांनी ठिय्या आंदोलन करत संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. टोल प्रशासनातील कर्मचाऱ्यांकडून सर्वसामान्य नागरिकांशी अशा प्रकारे उद्धटपणे वागणे योग्य नसून, संबंधित कर्मचाऱ्याने आपली चूक मान्य करून जनतेची माफी मागावी, अशी भूमिका रुपेश पाटील यांनी घेतली.
दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर परिसरात नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. नागरिकांचा वाढता संताप पाहता टोल नाक्यावरील संबंधित कर्मचाऱ्यांनी अखेर आपली चूक मान्य करत रुपेश पाटील आणि उपस्थित नागरिकांची माफी मागितली.
"चूक झाली असेल तर ती मान्य करा" अशी रुपेश पाटील यांची भूमिका स्पष्ट होती की, संबंधित कर्मचाऱ्याकडून चूक झाली असेल तर त्याने ती मान्य करून जनतेची माफी मागावी. अखेर कर्मचाऱ्यांनी माफी मागितल्याने त्यांच्या ठिय्या आंदोलनाला यश आले.
टोल नाक्यावर नागरिकांकडून शुल्क आकारले जाते. त्यामुळे नागरिकांशी सन्मानाने वागणे ही टोल कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. टोल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून अरेरावी किंवा मुजोरी होत असेल तर त्यांच्यावर प्रशासनाने योग्य ती कारवाई करून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घेणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
"हा महाराष्ट्र आहे, येथे सर्वसामान्य जनतेचा सन्मान झाला पाहिजे," अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.टोल कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर प्रशासनाचा वचक असावा आणि नागरिकांशी गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
जनतेच्या ठिय्या आंदोलनाला यश!
सर्व प्रकारानंतर टोल कर्मचाऱ्यांनी माफी मागितल्याने रुपेश पाटील यांच्या ठिय्या आंदोलनाला अखेर यश आले. मात्र, भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, यासाठी टोल प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना नागरिकांशी सभ्यपणे वागण्याच्या स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा