आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२६

स्वातंत्र्यदिनानिमित्त लेवा युथ फोरम आयोजित डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, हिंजवडी व चिंचवड (पुणे) येथे भव्य रक्तदान शिबिरे यशस्वीरित्या संपन्न

कल्याण : (सुनिल इंगळे ) 🩸🇮🇳 स्वातंत्र्यदिन विशेष रक्तदान — देशसेवेचा एक अनमोल संकल्प.
८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, लेवा युथ फोरमच्या वतीने डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, हिंजवडी व चिंचवड (पुणे) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या सर्व केंद्रांवरून एकत्रितपणे २३८+ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले अमूल्य योगदान देशसेवेला समर्पित केले. विशेष म्हणजे, यंदाच्या शिबिरात “नवीन संकल्पित रक्तदान” हा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.  
        रक्तदानाची गरज केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता, नियमित रक्तदानाचा संकल्प समाजात रुजावा,हा या उपक्रमामागचा सुंदर हेतू आहे.रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचे मनःपूर्वक अभिनंदन आणि कृतज्ञ अभिवादन!आपण दिलेला रक्ताचा एक थेंब कुणाच्या तरीआयुष्यातील अंधार दूर करून जगण्याची नवी पहाट घेऊन येऊ शकतो.  
आपल्या रक्तात वाहणारी माणुसकी आज अनेक जीवांसाठी आशेचा किरण ठरली आहे.देशभक्ती केवळ तिरंगा फडकवण्यात नाही,तर गरजेच्या वेळी देशबांधवांच्या जीवनासाठी उभे राहण्यात आहे.आजचा हा रक्तदानाचा उपक्रम म्हणजे स्वातंत्र्यदिनाचा उत्सव नव्हे, तर स्वातंत्र्याची खरी भावना जगण्याचा एक सेवाभावी संकल्प आहे. २३८+ रक्तदाते | एकच संकल्प — जीवनदान!. देशसेवेला समर्पित रक्तदान - सेवा, समर्पण, माणुसकी.लेवा युथ फोरम परिवारातर्फे  
सर्व रक्तदात्यांना मनःपूर्वक सलाम!🙋

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

कुमशेत महिला हितवर्धक मंडळ आणि जनजागृती सेवा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रायगड जि.प.कुमशेत या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

माणगाव(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) देशभरात१५ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सर्व शाळांमध्ये मुख्याध्यापक, श...