गडब (अवंतिका म्हात्रे)- ग्रामपंचायत वडवळ व तांबाटी ता. खालापूर जि. रायगड येथे चरई खुर्द ता. तळा जि. रायगड ग्रामपंचायतीचा अभ्यास दौरा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत वडवळ,तसेच तांबाटी ता. खालापूर येथे ग्रुप ग्रामपंचायत चरई खुर्द, ता. तळा, जि. रायगड यांच्या वतीने अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले.
वडवळ तांबाटी ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा, टीबी मुक्त ग्रामपंचायत, आर. आर. आबा स्मार्ट ग्राम, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आदी विविध शासकीय उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून पुरस्कार प्राप्त केलेली आहे. या पार्श्वभूमीवर वडवळ ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांची, नावीन्यपूर्ण उपक्रमांची तसेच लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांची पाहणी करून त्याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली.
यावेळी सरपंच श्री. ज्ञानेश्वर सुतार, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी श्री. प्रमोद पाटील, श्री. संदीप मोगरे व कर्मचारी यांनी अभ्यास दौऱ्यातील पथकाचे स्वागत करून ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच सरपंच तांबाटी श्री. अविनाश आमले, उपसरपंच, सदस्य-सदस्या व सहकारी कर्मचारी यांचीही उपस्थिती होती.
अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने बोलताना ग्रुप ग्रामपंचायत चरई खुर्दचे सरपंच श्री. प्रविण चंद्रकांत आंबार्ले यांनी सांगितले की, “आपल्या जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट काम केले आहे, त्या ग्रामपंचायतींना आपणच भेट देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक करणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या यशस्वी संकल्पना आत्मसात करणे, हा या अभ्यास दौऱ्यामागील मुख्य उद्देश आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींच्या अभ्यासासाठी नेहमी जिल्ह्याबाहेर जाण्याची गरज नाही. आपल्या रायगड जिल्ह्यातही अनेक ग्रामपंचायती आदर्शवत कार्य करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी परस्पर अभ्यास दौरे आयोजित करून एकमेकांच्या चांगल्या उपक्रमांची देवाणघेवाण करावी.”
यावेळी सरपंच श्री. आंबार्ले यांनी वडवळ व तांबाटी ग्रामपंचायतीने केलेल्या उल्लेखनीय कामाचे कौतुक करून त्यांच्या पुढील विकासात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच आपल्या ग्रामपंचायतीमध्येही या अभ्यासातून मिळालेल्या अनुभवांचा उपयोग करून नवीन व नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.
या अभ्यास दौऱ्यात सरपंच श्री. प्रविण आंबार्ले, उपसरपंच श्री. अजय सावंत, माजी उपसरपंच श्री. लक्ष्मण भोईर, श्री. दिनेश भोईर, सदस्य श्रीमती रश्मी आंबार्ले, श्रीमती जयश्री सकपाळ, श्रीमती सायली भोईर, ग्रामपंचायत अधिकारी श्री. राजेश खैरे व ग्रामपंचायत कर्मचारी श्री. विजय आंबार्ले सहभागी झाले होते.
वडवळ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, अधिकारी-कर्मचारी तसेच तांबाटी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व संपूर्ण ग्रामस्थ यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल ग्रुप ग्रामपंचायत चरई खुर्दच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
वडवळ,तांबाटी ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीचा अभ्यास, नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती आणि लोकसहभागातून झालेली विकासकामे यामुळे हा अभ्यास दौरा चरई खुर्द ग्रामपंचायतीच्या आगामी विकासासाठी निश्चितच प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा