आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २८ जुलै, २०२६

शिर्के जनकल्याण प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

मुंबई (प्रतिनिधी ): शिर्के जनकल्याण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा – २०२६ रविवार दि. २६ जुलै  रोजी दादर, मुंबई येथे उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. सर्व उपस्थितांना अल्पोपहार व चहा वाटप करण्यात आले. अक्षरश्री विलास देवळेकर यांच्या ६ फूट कविता फ्लेक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
     कार्यक्रमाला माजी नगरसेवक डॉ. जगन्नाथ हेगडे, ज्येष्ठ संपादक व राजकीय विश्लेषक डॉ. सुकृत खांडेकर, माजी प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, ज्येष्ठ अभिनेते व समाजसेवक गणेश यादव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष ॲड. सुनील भार्गवराम शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
       यावेळी ज्येष्ठ अभिनेते गणेश यादव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, "प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळे कलागुण असतात. त्यांच्या कलागुणांची ओळख करून पालकांनी त्यांना योग्य दिशा आणि प्रोत्साहन दिल्यास ती मुले भविष्यात नक्कीच मोठे यश संपादन करू शकतात."
       माजी नगरपाल डॉ. जगन्नाथ हेगडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, "मुंबईकर जनतेने मला दोन वेळा नगरपाल म्हणून संधी दिली. त्याचबरोबर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही माझ्यावर सोपविण्यात आल्या आणि त्या मी यशस्वीपणे पार पाडल्या. चांगले काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला मुंबईकर जनता कधीही निवृत्त होऊ देत नाही. मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले असून, जनतेने मला भरभरून प्रेम आणि साथ दिली ह्या बाबीचा मला आनंद व अभिमान आहे"
       ज्येष्ठ संपादक व राजकीय विश्लेषक डॉ. सुकृत खांडेकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, "मुलांशी संवाद साधताना त्यांच्या भावना आणि विचार समजून घेतले पाहिजेत. त्यांची बाजू शांतपणे ऐकून घेतल्यानंतरच निर्णय घेतल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होइल."
        यावेळी ॲड. विकास नागवंशी यांनी प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष ॲड. सुनील भार्गवराम शिर्के यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, "आज मी वकील, उद्योजक आणि शाळा चालक म्हणून जे काही आहे, त्यामागे ॲड. सुनील शिर्के यांचे मोठे योगदान आहे. ते माझ्या आयुष्याचे इंजिन आहेत आणि मी त्या इंजिनचा डबा आहे."असे मैत्री विषयक भावनिक मत व्यक्त केले.
      तसेच महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पाटकर, जे जे हॉस्पिटल येथील संत गाडगेबाबा धर्मशाळेचे व्यवस्थापक एकनाथ ठाकूर, संपादक दत्ता खंदारे, संपादक आण्णासाहेब आहेर, संपादक दिलीप शेडगे, संपादक पंकजकुमार पाटील, ॲड. विकास नागवंशी, ज्येष्ठ पत्रकार, कवी शशिकांत सावंत, कवी विलास देवळेकर, कलाकार महेश्वर तेटांबे, समाजसेविका रेवती आळवे, डॉ .सूर्यभान डोंगरे, ॲड.सोपानबुडवाडकर यासह सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच शिर्के जनकल्याण प्रतिष्ठान सामाजिक, शैक्षणिक, पत्रकार, सांस्कृतिक आणि जनकल्याणाच्या क्षेत्रात करत असलेले कार्य भविष्यातही अशाच जोमाने आणि व्यापक स्वरूपात सुरू राहावे, अशा शुभेच्छाही व्यक्त केल्या.
       विविध क्षेत्रांतील मान्यवर, पुरस्कार विजेते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात आणि उत्कृष्ट काव्यमय सूत्रसंचालन सौ पुजा काळे यांच्या मुळे संस्मरणीय वातावरणात संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

समाजसेवेच्या निःस्वार्थ प्रवासाला मानाचा मुजरा; पत्रकार बाळकृष्ण कासार यांना 'सर्वोत्कृष्ट समाजसेवक – २०२६' पुरस्काराने सन्मानित

पत्रकारिता आणि समाजकार्यातील अविरत योगदानाचा नामांकित शिर्के जनकल्याण प्रतिष्ठानकडून गौरव मुंबई(शांताराम गुडेकर): समाजासाठी झटणाऱ्या व्यक्ती...