आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २८ जुलै, २०२६

सर्वोकृष्ट समाजसेवक पुरस्कार 2026 ने शरद नामदेव बनसोडे सन्मानित

मुंबई - शरद नामदेव बनसोडे हे मुंबईच्या पश्चिम उपनगरात सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक जीवनात महत्वपूर्ण योगदान देणारे व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहे, पत्रकारिता वृतपत्रलेखन क्षेत्रात रोखटोक लिखाण करणारे म्हणून ओळख आहे. समाजहिताचे अनेक उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला आणि विविध क्षेत्रातील व्यक्तीना एकत्रित आणण्याचे काम केले, तसेच समजप्रभोनत्मक कार्य केले आहे.
शरद बनसोडे यांच्या व्यक्तिमत्वतील साधेपणा नम्रता आणि लोकांशी आपुलकी ही वृत्ती उल्लेखनिय आहे.सर्व जातीधर्म समाजाशी प्रेमाचा संबंध आहे.निस्वार्थी समाजसेवेची पोचपावती म्हणून मुंबईतील प्रतिष्टीठ शिर्के जनकल्याण प्रतिष्टान च्या वतीने यंदाचा सर्वोकृष्ट समाजसेवक पुरस्कार बॉलिवूड चे सिने अभिनेता गणेश यादव यांच्या हस्ते दादर येथील मुंबई ग्रंथसंग्रालय मध्ये देण्यात आला.
या वेळी मुंबई चे माजी नगरपाल जगन्नाथ हेगडे जेष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर माजी विधानसभा सचिव अनंत कळसे शिर्के जनकल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष सुनील शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

समाजसेवेच्या निःस्वार्थ प्रवासाला मानाचा मुजरा; पत्रकार बाळकृष्ण कासार यांना 'सर्वोत्कृष्ट समाजसेवक – २०२६' पुरस्काराने सन्मानित

पत्रकारिता आणि समाजकार्यातील अविरत योगदानाचा नामांकित शिर्के जनकल्याण प्रतिष्ठानकडून गौरव मुंबई(शांताराम गुडेकर): समाजासाठी झटणाऱ्या व्यक्ती...