आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २८ जुलै, २०२६

ज्येष्ठाना बेस्ट मध्ये सवलतीच्या दरात प्रवास होणार.... सुरेश पोटे (फेस्कॉम )

मुंबई : बृहन्मुंबई क्षेत्र व परिसरातील बेस्ट सेवा, ज्येष्ठा करिता विनामूल्य अथवा सवलतीच्या दरात प्रवास सुरु करण्या बाबत, फेस्कॉम च्या वतीने, म न पा नियोजन विभाग यांना प्रस्ताव सदर केला, त्याला अनुसरून, सवलतीच्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यासाठी रु.१ कोटी ची तरतूद बेस्ट कडून झाली आहे व लवकरच ज्येष्ठाना सवलतीच्या दरात प्रवास सुरु होईल. तसेच ज्येष्ठा साठी आरोग्य, विमा, शिबीरे, हॉस्पिटल, आयोजित करण्यासाठी साठी पाठपुरावा चालू असल्याचे, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम )मुंबई प्रादेशिक विभाग चे अध्यक्ष - सुरेश पोटे यांनी ज्येष्ठाना मार्गदर्शन करताना सांगितले.
    विसावा ज्येष्ठ नागरिक संघ यांनी आयोजित केलेल्या मासिक वाढदिवसाच्या कार्यक्रमात मुंबई प्रादेशिक विभाग अध्यक्ष - सुरेश पोटे, मुंबई ज्येष्ठ नागरिक संघांचे सदस्य - दिलीप धारकर, संकल्प ज्येष्ठ नागरिक संघांचे उपाध्यक्ष - शांताराम खामकर, विसावा ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष - हिदुराव वाडते, सोनू वारंग, बाळकृष्ण हळदणकर व पत्रकार - बाळ पंडित, व्यासपीठावर उपस्थित होते. 
      कार्यक्रमाची सुरुवात विजय केसरकर व परेश कोलले यांच्या भावगीताने व भक्ती गीताने झाली. उपस्थित २० ज्येष्ठाना मान्यवरच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मानीत करण्यात आले.
      सूत्रसंचालन मंगेश पाटनाईक यांनी केले व हिंदुराव वाडते यांनी आभार मानले. पदाधिकारी - रमेश शेलार, रोहिदास बुद्धिवंत,आप्पासाहेब पाटील, शैलजा बोन्द्रे व बबन बोले यांनी फारच मेहनत घेतली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

समाजसेवेच्या निःस्वार्थ प्रवासाला मानाचा मुजरा; पत्रकार बाळकृष्ण कासार यांना 'सर्वोत्कृष्ट समाजसेवक – २०२६' पुरस्काराने सन्मानित

पत्रकारिता आणि समाजकार्यातील अविरत योगदानाचा नामांकित शिर्के जनकल्याण प्रतिष्ठानकडून गौरव मुंबई(शांताराम गुडेकर): समाजासाठी झटणाऱ्या व्यक्ती...