आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २० जुलै, २०२६

गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या,मराठा समाज्यातील मुले /मुली, बी एस सी ( आय टी ) /कॉम्पुटर), सी ए. अग्रीकलचरलं, फार्मसी, पदवी, पदविका, इंजिनिरिंग तसेच मेडिकल क्षेत्रात शिक्षण घेत आहेत, तसेच नर्सिंग शिकत असलेल्या, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहेत. त्याकरिता विद्यार्थ्यां कडून, संस्थेच्या छापील फॉर्मवर अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक विद्यार्थीनी छापील फॉर्म करिता संस्थेच्या मुंबई कार्यालयात, संपर्क करावा. पत्ता : सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई, स्टार मॉल, ३ रा मजला, न चिं. केळकर मार्ग, दादर (पश्चिम ) मुंबई ४०००२८, मोबाईल : +91 9137469348 वर सोमवार सोडून, दुपारी १ ते सायं. ६ पर्यंत, दि ३० ऑगस्ट २०२६ पूर्वी संपर्क साधावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रहाणा-या मुलांनी कुडाळ व सावंतवाडी येथील कार्यालयात संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

साई परिवार सेवाभावी ट्रस्टतर्फे मान - विक्रमगड आश्रम शाळेत मुलांना शैक्षणिक साहित्य , खाऊ वाटप

मुंबई (शांताराम गुडेकर /मोहन कदम ): आपला समाज पुढे येण्यासाठी शिक्षणात मागे न राहण्यासाठी व आपल्यावर अस...