सोमवार, २० जुलै, २०२६
दुसऱ्या राज्यस्तरीय मराठी भाषा साहित्य संमेलनात शिवरायांच्या मावळ्याची रणगर्जना !
मुंबई प्रतिनिधी (विलास देवळेकर): दि. १९ जुलै : कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) आणि स्वर्णिका पुस्तक प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने रामानंद आर्य डी.ए.व्ही. महाविद्यालय, भांडुप येथे आयोजित राज्यस्तरीय मराठी भाषा साहित्य संमेलन 'उत्साहपूर्ण' वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात वारकरी परंपरेतील ग्रंथदिंडी आणि सुमधुर वाद्यसंगीताने झाली. या ग्रंथदिंडीमुळे संमेलनाला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असा आगळावेगळा साज चढला. या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे नियोजन व आयोजन स्वर्णिका प्रकाशनचे संपादक, माजी शिक्षणाधिकारी तसेच कोकण मराठी साहित्य परिषद, भांडुप विभागाचे अध्यक्ष प्रा. डॉ. जिवबा रामचंद्र केळुसकर यांनी अत्यंत नेटके, शिस्तबद्ध आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने केले. मराठी भाषा, साहित्य आणि नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय मानले जाते. त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव उपस्थित मान्यवरांनी मुक्तकंठाने करत, मराठी साहित्य चळवळीला बळ देणारे त्यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काढले. संमेलनाच्या समारोपावेळी पार्थ मिलिंद भगरे यांनी सादर केलेली 'शिवगर्जना' आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यावर आधारित "अफझलखान वध" हा ओजस्वी पोवाडा डफ न वाजवता उपस्थितांच्या विशेष आकर्षणाचा विषय ठरला. त्यांच्या दमदार सादरीकरणाला सभागृहात टाळ्यांचा कडकडाट आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी पार्थ मिलिंद भगरे तसेच, त्यांच्या मातोश्री सौ. विभा मिलिंद भगरे यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित 'सत्कार' करण्यात आला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
साई परिवार सेवाभावी ट्रस्टतर्फे मान - विक्रमगड आश्रम शाळेत मुलांना शैक्षणिक साहित्य , खाऊ वाटप
मुंबई (शांताराम गुडेकर /मोहन कदम ): आपला समाज पुढे येण्यासाठी शिक्षणात मागे न राहण्यासाठी व आपल्यावर अस...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा