मुंबई (शांताराम गुडेकर /मोहन कदम ): आपला समाज पुढे येण्यासाठी शिक्षणात मागे न राहण्यासाठी व आपल्यावर असलेले समाज ऋण फेडण्यासाठी बरेच लोक, सामाजिक संस्था सतत धडपडत असतात.त्यातीलच एक संस्था म्हणजे साई परिवार सेवाभावी ट्रस्ट होय.गेली अनेक वर्ष ही ट्रस्ट आदिवासी भागात काम करत आहे.या संस्थेमार्फत आदिवासी समाजास अन्नदान करणे, मुलांना शैक्षणिक सामान, खाऊ वाटप, क्रीडा साहित्य, झाडे लावणे इत्यादी उपक्रम करतात.आज मान-विक्रमगड आश्रम शाळेत भेट दिली असता मला ही मंडळी भेटली.तेथे साहित्य वाटपाचा व खाऊ वाटपाचा कार्यक्रम चालू होता.मी विचारपूस केली असता कळले की मान.रामया मुदलवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त हा कार्यक्रम आहे. त्यांनीच शैक्षणिक व खाऊ व क्रीडा साहित्य उपलब्ध केले.आजही काही अशी मंडळी आहेत की,जी अशा आदिवासी शाळामध्ये जाऊन मुलांना मदत करतात.खरोखरच यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे.मान.रामया मुदलवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता.त्यांनी मुलांना शैक्षणिक साहित्य खाऊ व क्रीडा साहित्य दिले.यामध्ये साई परिवार श्री. मंगेश अंकुश रासम श्री.अनिल वडके श्री. संतोष बंडबे,सौ.मनीषा रासम,श्री.अंकुश रासम,समीर सागवेकर, डॉ.तारा पाटील, शिवानी मेनन,श्री.तुलसीदास तांडेल,श्री.यशवंत वातास, श्री. महेश वर्मा,श्री.रामकिरत गुप्ता,मुख्याध्यापक, शिक्षक व सर्व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
साई परिवार सेवाभावी ट्रस्टतर्फे मान - विक्रमगड आश्रम शाळेत मुलांना शैक्षणिक साहित्य , खाऊ वाटप
मुंबई (शांताराम गुडेकर /मोहन कदम ): आपला समाज पुढे येण्यासाठी शिक्षणात मागे न राहण्यासाठी व आपल्यावर अस...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा