आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २७ जुलै, २०२६

श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर (मुंबई ) येथे मित्र पक्ष ग्रुप आयोजित कलगी तुरा दोन नामांकित शाहिरांचा महामुकाबला.

मुंबई (सौ. मनस्वी मणवे ):  आपल्या कोकनची लोककलेची म्हणजेच, कलगी तुरा ह्या लोककलेची परंपरा प्रामाणिकपणे जोपासायची धुरा नव्या युवा शाहीरांनी हाता मध्ये घेतलेली असुन, हे शाहीर गावोगावी आपली कला सादर करुन मुंबई च्या रंगमंच्यावर ही कला सादर करत आहेत. खरंच आपल्या आपल्या ह्या कलेचा आदर करुन सर्वांनी सहकार्य करावे.
         सर्व रसिक मायबाप यांच्या आग्रहस्तव रविवार दि. ०२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ०७:३० वाजता एक प्रतिष्ठित असा, ग्रुप तो म्हणजे मित्र पक्ष ग्रुप यांनी दादर मधील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर या हॉल येथे शक्तिवाले शाहीर सुशांत मणवे ( शाखा - श्री.आई महालक्ष्मी नृत्य कलापथक, मौजे असुर्डे, मणवेवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी)तसेच त्यांचे प्रतिस्पर्धी तुरेवाले शाहीर तेजस वीर (शाखा - मठवाडी नृत्य कलापथक रुण (मठवाडी), ता. लांजा, जि. रत्नागिरी ) या दोन नामांकित शाहीरांचा महामुकबला आयोजित केलेला आहे.चला तर सर्वांनी उपस्थित राहून ह्या दोन्ही शाहीरांचा कलगी तुरा सामना पाहूया.. कोण मारणार बाजी....!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

खा. सुनिलजी तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कै मोरेश्वर भगत शैक्षणिक संस्थे मार्फत विविध सामाजिक उपक्रम

गडब(अवंतिका म्हात्रे):कै. मोरेश्वर भगत शैक्षणिक व सार्वजनिक वाचनालय खारपाडा तर्फे आदरणीय खासदार सुनील तट...