आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २७ जुलै, २०२६

खा. सुनिलजी तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कै मोरेश्वर भगत शैक्षणिक संस्थे मार्फत विविध सामाजिक उपक्रम

गडब(अवंतिका म्हात्रे):कै. मोरेश्वर भगत शैक्षणिक व सार्वजनिक वाचनालय खारपाडा तर्फे आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेब ह्यांच्या वाढदिवसाचे अवचित साधून ई. 10 वी उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थी ह्यांचा भेट वस्तू देऊन सत्कार तसेच cfi संस्था पेण ह्यांच्या मार्फत गरीब गरजू विध्यार्थी ह्यांना शैक्षणिक साहित्य वाटप संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी ना उत्त्पन्न दाखले फार्म वाटप कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक समाजसेवक कृष्णा नागोजी ठाकूर ह्यांचे हस्ते करण्यात आले असून कार्यक्रमाचे अध्यक्ष पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा मोरेश्वर भगत वाचनालय सदस्य प्रकाश ठाकूर ह्यांनी भूषविले.आदरणीय तटकरे साहेब ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दर वर्षी पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दयानंद भगत व मोरेश्वर भगत संस्थेच्या अध्यक्ष माजी सरपंच रश्मी भगत ह्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबिवले जातात.तसेच तटकरे साहेब ह्यांना वाढदिवसाच्या सर्वांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी पेण विधानसभा महिला राष्ट्रवादी काँग्रेस चिटणीस ललिता ठाकूर, cfi संस्थेच्या रिया मॅडम,खारपाडा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष माजी उपसरपंच नितेश घरत, राष्ट्रवादी काँग्रेस खारपाडा महिला अध्यक्ष मालती म्हात्रे,खारपाडा युवती अध्यक्ष मेघा पाटील, संस्था सदस्य अरुणा ठाकूर,ठाकुरपाडा युवती अध्यक्ष दर्शना ठाकूर,वाचनालय सदस्य देवराम घरत,वाचनालय सदस्य रमेश ठाकूर,विराज भगत, अविनाश मोरे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

खा. सुनिलजी तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कै मोरेश्वर भगत शैक्षणिक संस्थे मार्फत विविध सामाजिक उपक्रम

गडब(अवंतिका म्हात्रे):कै. मोरेश्वर भगत शैक्षणिक व सार्वजनिक वाचनालय खारपाडा तर्फे आदरणीय खासदार सुनील तट...