आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २७ जुलै, २०२६

मंगळवारी मानकोली नाका ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत विरार अलिबाग कॉरिडॉर प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा महामोर्चा!! उठ भूमिपुत्रा जागा हो...एकिचा धागा हो..!!

ठाणे (प्रतिनिधी ): भिवंडी तालुक्यातील विरार अलिबाग कॉरिडॉर प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा गावदेवी चॅरीटेबल शेतकरी संस्था दिवे- अंजुर यांच्या माध्यमातुन व 14 गाव कृती समिती च्या सहकार्याने मंगळवार दि. 28 जुलै रोजी सकाळी 9 वाजता मानकोली नाका ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत विरार अलिबाग कॉरिडॉर प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा महामोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी ठाणे, पनवेल, वसई, कल्याण, मुंबई येथील भूमिपुत्र सामाजिक संस्था व शेतकरी संघटना, आदरणीय लोकनेते दि बा पाटील कृती समिती सर्वांना आर्त हाक देण्यात येत आहे की या समर्थन द्या, सामील व्हा आणि आपल्या बांधवांना भगिनींना साथ द्या.
     आपल्या जमिनीवर पूर्वजांनी नांगर फिरवून सोना पिकवला आहे.आता सरकार अन्यायाचा ट्रॅक्टर फिरवून आपल्याला मातीत गाडत आहे.
शेतकरी संघटना भूमिपुत्रांच्या प्रत्येक लढाईत सामाजिक जाणीव ठेवून रस्त्यावर उतरत असते. आज आम्हाला तुमची साथ हवी आहे. एकत्र येऊन साखळी बनवून अन्यायाच्या बेड्या तोडून आपला हक्क मिळावा यासाठी कायदेशीर लढू या असे आवाहन या संस्थेने केले आहे.
जय भूमिपुत्र! जय दि बा..!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

खा. सुनिलजी तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कै मोरेश्वर भगत शैक्षणिक संस्थे मार्फत विविध सामाजिक उपक्रम

गडब(अवंतिका म्हात्रे):कै. मोरेश्वर भगत शैक्षणिक व सार्वजनिक वाचनालय खारपाडा तर्फे आदरणीय खासदार सुनील तट...