आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १९ जुलै, २०२६

इंडियन कॉपीराईट प्रोटेक्शन ( अँटी पायरसीस सेत्न मुंबई तर्फे जितु गुप्ता यांच्या संकल्पनेतून खारपाले शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

गडब (अवंतिका म्हात्रे): इंडियन कॉपीराईट प्रोटेक्शन ( एटी पायरासिससेलचे मुख्य तपासी अधिकारी ) श्री रामजीत उर्फ जितू गुप्ता यांच्या संकल्पनेतून दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना नेहमी शैक्षणिक साहित्याचे वाटप हे करीत असतात .
    त्यांची ही संकल्पना म्हणजेच एक हात मदतीचा पूर्ण महाराष्ट्रात ते राबवत असून प्रत्येक दुर्गम भाग व तेथे असणाऱ्या शाळा यांना लागणारे गरजू साहित्य तसेच गरजू विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक साहित्याचे ते नेहमी वाटप करीत असतात.
        आज आपल्या रायगड जिल्ह्यातील खारपाले गावातील प्राथमिक शाळा येथे त्यांनी भेट देऊन पहिली ते पाचवी व यंदाच्या वर्षात दहावी मध्येजास्त गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले व पुढील वर्षी दहावी मध्ये सर्वात जास्त गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्याचेही त्यांनी कार्यक्रमादरम्यान बोलताना सांगितले .
          प्रथम शाळेतील मुलांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून इशस्तवन म्हणून मोठ्या उत्साहाने स्वागत केले. गुप्ता सरांच्या या संकल्पनेतून मुलांमध्ये अभ्यासू वृत्ती निर्माण होऊन ते अधिक गतिमान जीवन घडवून आपापल्या कला कौशल्यांना वाव देण्यासाठी प्रयत्न करतील व त्यांना लागणाऱ्या यापुढेही कोणत्याही प्रकारच्या गरजू शैक्षणिक सामान व सध्या वॉटर प्युरिफायचे त्यांनी शाळेला देण्याचे ठरविले आहे तसेच मुलांची अभ्यास करण्याची वृत्ती व त्यांना एवढ्या गर्मीत होणारा त्रास लक्षात घेता चार फॅन लावण्याचेही त्यांनी कार्यक्रमादरम्यान सांगितले .
     त्यांची गरजू व दुर्गम भागातील मुलांना मदत करण्याची प्रवृत्ती लक्षात घेता त्यांनी रायगड जिल्ह्यात आतापर्यंत अनेक शाळा तसेच शाळेला लागणाऱ्या उपयोगी वस्तू त्यांनी दिल्याचे समजते .त्यांच्या या कार्यात त्यांच्यासोबत गुरुनाथ मधुसूदन तीरपणकर संस्थापक अध्यक्ष जनजागृती संस्था , तसेच राजकुमारी रामजीत गुप्ता समाजसेविका , उत्तम भिकाजी बंगाले संस्थापक अध्यक्ष- शिव फुले शाहू आंबेडकर ,मनीषा गोडसे संस्थापिका अध्यक्ष - कुसुम चोभे, राजेश कोठेकर, अनंत चवरकर, रायगडची शानच्या संपादिका अवंतिका म्हात्रे, सरपंच कविता गावंड, उपसरपंच पांडुरंग तुरे,सदस्य सुवर्णा कडू तसेच गावातील महिलावर्ग व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   याच कार्यक्रमा दरम्यान खारपाले गावच्या तसेच उत्तम समाजसेविका सौ. शैला प्रमोद तुरे यांना रायगड कन्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांनामिळालेल्या या पुरस्काराने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

साई परिवार सेवाभावी ट्रस्टतर्फे मान - विक्रमगड आश्रम शाळेत मुलांना शैक्षणिक साहित्य , खाऊ वाटप

मुंबई (शांताराम गुडेकर /मोहन कदम ): आपला समाज पुढे येण्यासाठी शिक्षणात मागे न राहण्यासाठी व आपल्यावर अस...