आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, १८ जुलै, २०२६

लायन्स इंटरनॅशनल 3231 A1 लायन्स क्लब ऑफ मुंबई,सॅफ्रॉन व हंसराज दामोदर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्तानंद हायस्कूल सुभाष नगर येथे डिजीटल(बोर्ड) क्लास रूम व संगणक संच उद्‌द्घाटन सोहळा संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर ) : लायन्स इंटरनॅशनल 3231 A1 लायन्स क्लब ऑफ मुंबई, सॅफ्रॉन व हंसराज दामोदर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सुभाषनगर एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी मुक्तानंद हायस्कूल, सुभाष नगर,चेंबूर येथे शुक्रवार,दि. १७ जुलै २०२६ डिजीटल(बोर्ड) क्लास रूम व संगणक संच उद्‌द्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.लायन्स क्लब ऑफ मुंबई सॅफ्रन च्या वतीने, "प्रोजेक्ट सक्षम - डिजिटल शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना सक्षम करणे" या उपक्रमाच्या अंतर्गत आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात शिक्षण हे केवळ पुस्तके आणि फळ्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. भविष्य हे तंत्रज्ञान, नावीन्य आणि डिजिटल शिक्षणाचे आहे. म्हणूनच शिक्षणाला प्रोत्साहन देण्याबरोबरच ते आधुनिक, संवादात्मक आणि डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देणे ही देखील आपली जबाबदारी समजून व या दृष्टिकोनातूनच 'प्रोजेक्ट सक्षम' करण्यात आला त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे लायन्स इंटरनॅशनल डिष्ट्रिक्ट ३२३१-ए-१ चे डिष्ट्रिक्ट गव्हर्नर लायन मा.पवन के अग्रवाल,विशेष अतिथी नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या व जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सन्मा.मेधा पाटकर,हंसराज दामोदर चॅरिटेबल ट्रस्ट चे विश्वस्त श्री.पीयूष जेसराणी, लायन्स क्लब ऑफ मुंबई सॅफ्रन चे एक्सटेंशन चेअरमन लायन विजय रायमने व लायन मोहन वायदंडे, क्लबचे अध्यक्ष लायन जितेंद्र दगडूदादा सकपाळ,प्रोजेक्ट कॉर्डिनेटर लायन वीणा दोरवणकर मॅडम शाळेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री.एकनाथ आव्हाडकर,लायन्स क्लब च्या लायन भाग्यश्री वर्तक,लायन नितीन पन्हाळकर, लायन सचिन राऊत,लायन नीरजा सकपाळ,सुषमा सकपाळ, राऊत, राजेश जैन,शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: