आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, १८ जुलै, २०२६

'व्हेल्वेट व्हॉइसेस – संगीत, मैत्री आठवीनींनी मैफिल उत्साहात संपन्न!

मुंबई : रश्मिन कराओके स्टुडिओच्या यशस्वी सांगीतिक प्रवासाला नवी दिशा देत "Rhythmic Symphony – Uniting Voices... Enriching Souls" या नव्या नावाने आयोजित करण्यात आलेल्या "Velvet Voices – Memories and Beyond" या भव्य संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.
      जोगेश्वरी येथील मीनाकुमारी हॉल, सौभाग्य मंगल कार्यालयात नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाला संगीतप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाला कै. शाहीर श्री विठ्ठल उमप यांचे सुपुत्र प्रसिद्ध गायक श्री उदेश उमप यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
     कार्यक्रमात हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर गीतांचा सुरेल प्रवास सादर करण्यात आला. सुवर्णयुगातील गीतांपासून ते गाजलेल्या युगुलगीतांपर्यंत, गझल, मराठी भावगीत आणि उत्साही गीतांनी सजलेल्या या मैफलीने उपस्थित रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. प्रत्येक सादरीकरणाला उत्स्फूर्त टाळ्यांची दाद मिळाली.
        कार्यक्रमात वृशाली देसाई, शर्मिला देसाई, दिलीप डोके, रश्मिन मोरे, नलिनी भारद्वाज, डॉ. स्वाती परब, नंदकिशोर माजाळीकर, राजश्री इंगवले, रंजना शेट्टी, राजेंद्र मुणगेकर, विनय वाघ, आशा खैरे, विजय चारी, अर्चना सावंत, डॉ. निशा अरवंदेकर, डॉ. सतीश परब, ॲड. वनीता परब, रंजना मुंज, शालिनी शेट्टी, अशोक बाटे, नूतन साईल, सुधीर तावडे आणि सुधीर कुटे यांनी आपल्या दर्जेदार गायनाने कार्यक्रमाला चार चाँद लावले.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपेक्षा कदम आणि सीमा सावंत यांनी केली.
    सर्व कलाकारांना, प्रशस्तिपत्रक, सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सन्मानीत करण्यात आले.
      या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना, नियोजन रश्मिन मोरे आणि विनय वाघ यांचे अथक परिश्रम लाभले. या दोघांना डॉ. स्वाती परब, भारती वाघ आणि रश्मिन मोरे यांच्या अर्धांगिनी सौ. ऋतुजा रश्मिन मोरे यांची मोलाची साथ आणि प्रभावी समन्वय लाभल्याने कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत दर्जेदार पद्धतीने साकार झाला.
         संगीताच्या माध्यमातून माणसे जोडणे, नवोदित व हौशी गायकांना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि सांगीतिक संस्कृती अधिक समृद्ध करणे, हा या संस्थेचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: