मुंबई - ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था, नाशिक या प्रतिथयश संस्थेतर्फे, गेल्या २१ वर्षांतील शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन, शिक्षक , पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ सुरेश भिवाजी पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे पत्रकारिता विभागाचे समन्वयक प्रा. श्रीकांत सोनवणे यांच्या हस्ते डॉ सुरेश पाटील सर यांना मेडल, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
डॉ सुरेश भिवाजी पाटील यांना "ग्लोबल ह्युमन पीस युनिव्हर्सिटी" कडून मानद डॉक्टरेट प्राप्त झाली आहे तसेच महाराष्ट्र शासना तर्फे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. तसेच वैभववाडी तालुका विकास संस्था संघटनेचे ते संस्थापक - अध्यक्ष आहेत, तसेच साई एज्युकेअर ट्रेनिंग स्कूल या संस्थेचे संचालक आहेत. डॉ सुरेश पाटील यांचे "माय इंग्लिश ग्रामर बुक" नावाचे पुस्तक प्रकाशित आहे. डॉ सुरेश पाटील यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल समाजातील सर्वच स्तरांतून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा