आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २६ जुलै, २०२६

हास्याची भेट... आपुलकीची साथ...विशेष मुलांसवे आनंदाची वाट !

 
मुंबई : गणेशोत्सव व पंढरीच्या वारी पूर्व संध्येला, आर्थर रोड येथील पारशीवाडी मित्र मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने, कला दिग्दर्शक - डॉ. सुमित पाटील, यांच्या सहकार्याने, परेल कामगार मैदान येथील, नरेपार्क मनपा विशेष शाळेला,भेट देऊन मुलांचा आनंद द्विगुणित केला.
   मंडळाचे हे ५४ वे वर्ष असून, मूक - बधिर मुलांना पंढरीच्या वारी निमित्त, खाऊ, दप्तर,शालेय वस्तू, फळे, विठ्ठलाची कलाकृती असलेल्या कापडी पिशव्या देऊन आनंदोत्सव साजरा केला. वारीचे वातावरण निर्माण करून, मुलांनी विविध खेळ, गाणी, पारंपरिक नृत्ये सदर केली. 
    मुलांना झालेला आनंद, त्यांच्या चेह-यावर उमललेले हास्य, मिळालेला आनंद पाहून, मंडळाचे अध्यक्ष - अमित नाटेकर व सरचिटणीस - अतुल देसाई यांनी मुलांचे कौतुक करून नरेपार्क मनपा विशेष शाळेतील शिक्षिका - माधवी मिलिंद राहुरकर, समीक्षा सुनील मोहिते, उल्का मारुती लोक, श्रद्धा गोरखनाथ ढमाले, कर्मचारी वर्ग, तसेच या कार्यक्रमाचे आयोजन करणारे कला दिग्दर्शक डॉक्टर सुमित पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार मानले. या उत्सवात मंडळाचे उपाध्यक्ष - गौरव चव्हाण, सहकार्याध्यक्ष - अथर्व चव्हाण, कार्यकारिणी सदस्य - सचिन चव्हाण, परेश परब, अमय पालव, जयेश परब, शिरीष संकपाळ, श्रेयस नलावडे व सुरज घाटकर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मन्नत मल्टीपर्पज असोसिएशन संस्थेत लोकनेते आदरणीय स्व अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुषवगुच्छ अर्पण करून विनम्र अभिवादन!

गडब (अवंतिका म्हात्रे): पेण तालुक्यात मन्नत मल्टीपर्पज असोसिएशन संस्थे मध्येलोकनेते आदरणीय अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त...