घणसोली: नवी मुंबई येथील जेष्ठ नागरिक सेवाभावी संस्था (रजिस्टर ) तर्फे आषाढी एकादशी निमित्त शनिवार दिनांक २५ जुलै रोजी सकाळी ७ वाजता "हरिनाम दिंडी सोहळा "चे आयोजन करण्यात आले होते. .संस्थेचे अध्यक्ष भास्कर आव्हाड व रमेश रणपिसे यांच्या आवाहना नुसार घणसोली सेक्टर १२ मधील श्रीं साईबाबा मंदिर ते सेक्टर ९मधिल आदर्श सोसायटी स्थित श्रीं विट्ठल रखुमाई मंदिर पर्यंत पामबीच मार्ग ,मेघमल्हार ग्रुह्सन्कुल मार्गे "हरिनाम दिंडी "आयोजित केली होती. या हरिनाम दिंडीत जेष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी ,कार्यकारिणी सदस्य व जेष्ठ नागरिक सदस्य व महिला मोठ्या संख्येनं उत्साहाने सहभागी झाले होते .
जेष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेच्या सर्व पदाधिकारी ,व सदस्यांनी विशिष्ट पांढरा पोशाख व पांढरी टोपी परिधान करून व कपाळी टिळा लावून अगदी शिस्तबद्ध पद्धतीने "हरिनाम दिंडी चे "संचलन केले. .दिंडी" विट्ठल विट्ठल जय हरी विट्ठल "या हरिनामाच्या गजराने तसेच श्रीं दगडे यांच्या भजनी मंडळच्या भजनाने सर्वत्र दुमदुमली होती .श्रीं भास्कर आव्हाड ,श्रीं प्रमोद गायकवाड ,श्रीं संतोष कुलकर्णी ,श्रीं अर्जुन घुले यांनी सातत्याने विट्ठल नामाचा जयघोष करीत पहाटेचे वातावरण हरिनामाचा गजर व तेही टाळ मृदूंग साथीने अत्यंत भक्तिमय व आनंदमय केले होते .या हरिनाम दिंडीत जवळपास 100 भक्तगण सहभागी होऊन विठुमाऊली च्या नामस्मरणात मनोभावे व श्रद्धेने तल्लीन व दंग होऊन ठेक्यात ताल धरून नाचत आनंद घेत होते .या हरिनाम दिंडीत श्रीं प्रदीप पंढरीनाथ जोशी जेष्ठ वृत्तपत्रलेखक व मुक्त पत्रकार यांनी पण सहभाग घेवून या भक्तिमय रसाचा आनंद घेतला.हरिनाम दिंडी मेघमल्हार गृहसंकुल येथील विट्ठल मूर्तीचे दर्शन घेण्यास थांबली सर्वांनी दर्शन घेवून आरती ,हरिनामाचा पाठ म्हणून दिंडी पुढे मार्गस्थ झाली.
नंतर दिंडी सेक्टर ९ मधील आदर्श सोसायटी स्थित श्रीं विट्ठल रखुमाई मंदिर परिसरात पोहोचताच तेथील पदाधिकारी व सदस्यांनी दिंडीचे व सहभागी भक्तांचे उत्साहात स्वागत केले. त्या प्रसंगी दळवी अकॅडेमी चे जवळपास 100 विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेवून हरिनामाचा गजराने वातावरण अधिक भक्तिमय व प्रसन्न केले .आषाढी एकादशी निमित्त श्रीं विट्ठल रखुमाई मंदिरात पूजाअर्चा ,महाआरती ,आकर्षक फुलांची व डेकोरेशन सजावट करण्यात आली होती. सर्व भक्तगण यांनी शिस्तबद्ध रांगेत उभे राहून विठुमाऊली व रखुमाई माऊलींचे दर्शन घेतले व सोसायटी तर्फे वाटप करण्यात येत असलेल्या केळी ,राजगिरा लाडू व वेफर आणि चहा या महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच जेष्ठ नागरिक सेवाभावी संस्था तर्फे साबुदाणा खिचडी ,चिवडा ,व चहा तसेच मेघमल्हार सोसायटी तर्फे केळी व चहा भक्तगण यांना वाटप करण्यात आले ."हरिनाम दिंडी सोहळा "ची जबाबदारी जेष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष भास्कर आव्हाड ,सचिव महादेव शिंदे ,उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड , संतोष कुलकर्णी ,रमेश रणपिसे ,प्रभाकर देशमुख ,दत्तात्रय झगडे , आमोणकर ,अशोक जाधव , बाळकृष्ण घाडगे व अन्य पदाधिकारी यांनी उत्तम रित्या पार पाडून दिंडी सोहळा उत्साहात यशस्वी केल्याबद्दल संस्थांचे अध्यक्ष भास्कर आव्हाड यांनी सर्वा सहभागी भक्तगण यांचे आभार मानून दिंडी कार्यक्रमाची सांगता केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा