आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २६ जुलै, २०२६

ज्येष्ठ नागरिकांचे मोफत आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न!

मंबई : सामाजिक न्याय आणि विशेष सहाय विभाग महाराष्ट्र शासन, श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विभाग मंडळ, सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्र, व प्रदेशिक संसाधन आणि प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने, ज्येष्ठ नागरिका साठी भव्य मोफत आरोग्य शिबीर, गोरेगाव पूर्व, विसावा ज्येष्ठ नागरिक संघ, नागरी निवारा संघ, येथे मोठया उत्साहात संपन्न झाले.
       शिबिराची सुरुवात, मुंबईच्या माजी महापौर निर्मलाताई प्रभावळकर, व योगेश पाटील- समन्वयक (CSSC), (RRTC), निलीमा एसकर, यांच्या दिप प्रज्वलाने झाली. डॉ प्रशांत सकपाळ यांनी योगा ची माहिती देऊन प्रत्यक्षिते करून घेतली. संकल्प ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष - शांताराम खामकर हे उपस्थित होते.
     सदर शिबिरात, बीपी, डोळे तपासणी, शुगर, नाक - कान -घसा, CBC व ECG तपासणी करण्यात आली. तसेच आरोग्य व जीवनशैली चे डॉक्टरनी मार्गदर्शन केले.
शिबिरात एकूण १२० ज्येष्ठानी सहभाग घेतला.शिबिरात डॉ. अक्षय हावले, डॉ. प्रशांत सकपाळ, डॉ. विशाल मणियार, सह शोभा मोरे, श्रेया चव्हाण, निकिता राहाटे, वैभव पाखड, दिशानी पवार, व नीलिमा येतकर यांनी ज्येष्ठाची तपासणी केली.
     विसावा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हिंदुराव वाडते यांनी उपस्थित डॉक्टर व त्यांच्या सहका-याचे आभार मानले. सूत्रसंचालन - मंगेश फटनाईक यांनी केले. तसेच श्री.रमेश शेलार,रोहिदास बुद्धिवंत, अप्पासाहेब पाटील, शैलजा बोन्द्रे, व बबन बोले यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी फारच मेहनत घेतली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मन्नत मल्टीपर्पज असोसिएशन संस्थेत लोकनेते आदरणीय स्व अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुषवगुच्छ अर्पण करून विनम्र अभिवादन!

गडब (अवंतिका म्हात्रे): पेण तालुक्यात मन्नत मल्टीपर्पज असोसिएशन संस्थे मध्येलोकनेते आदरणीय अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त...