आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २१ जून, २०२६

मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

भांडुप : श्री. मारूती मंदिर जिर्णोद्धार समिती, भांडूप, मुंबई या संस्थेचा शैक्षणिक साहित्य आणि शालेय फीचे वाटप कार्यक्रम नुकताच दि. २० जून रोजी श्री. मारूती मंदिर, टाटा पॉवर हाऊस, भांडूप येथे संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते परशुराम कोपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कोपरकर यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, त्याच बरोबर संस्थेचा उद्देश सांगितला. या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांमधून भविष्यात एखाद्या विद्यार्थाने आपल्या बुद्धीची चमक दाखवून आपल्या आईवडिलांचे नाव रोशन केले तरी आम्हाला याचा आंनद आहे, असे ते म्हणाले. 
     या संस्थेतर्फे प्रत्येक वर्षी विद्यार्थी दत्तक योजनेच्या माध्यमातून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शालेय फीचे वाटप केले जाते. यावर्षी १०० विद्यार्थ्यांना वह्या, दप्तर, गणवेश, सँडल, छत्री व शालेय फी यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी आमदार श्याम सावंत, साहित्यिक प्रा. जयवंत पाटील तसेच संस्थेचे संजीवा पुजारी, रमेश शेलार, पी. एस. नारायणन, अशोक शर्मा, श्याम सावंत सुदाम सुतार,आदि मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने उपसभापती विनोद मोरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न

मुंबई दि. २१ (रामदास धो. गमरे) बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती आणि कोकण प्रांताचे नेते विनोद सुदाम मोरे यांचा वाढदिवस १९ जून रोजी कार्याध्यक...